Skip to main content

विचार

चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 07/05/2018 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
चार्ली चाप्लीन – प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट! Simple, Free Image and File Hosting at MediaFire ( एका थोर व्यंगचित्रकाराने म्हणजे बाळासाहेब ठाकरे ह्यांनी चार्लीचे काढलेले व्यंगचित्र ) नुकत्याच संपलेल्या साली म्हणजे २० डिसेंबर २०१७ रोजी पु लं च्या घरी चोरी झाल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि अगदी सहजच पु लं ज्याचे निस्सीम चाहते त्या चार्ली चॅप्लिनच्या घराच्या चोरीची कथा आठवली.

कोहम्

लेखक अबोलघेवडा यांनी सोमवार, 07/05/2018 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
मी व्यक्तीशः या पृथ्वीवर का आलो? येऊन नक्की काय करायचा प्रयत्न करतोय? मी नसतो आलो इथे तर या पृथ्वीमध्ये म्हणा किंवा कोणाच्याही आयुष्यात म्हणा काय फरक पडला असता? जर आपण निमित्तमात्र आहोत आणि आपली दोरी त्या विधात्याच्या हातात आहे (आठवा तो आनंद सिनेमातला राजेश खन्ना चा प्रसिद्ध डायलॉग!) तर तुम नही तो कोई और सही असं म्हणून परमेश्वराने दुसऱ्या कोणाकडून तरी कामे करवून घेतली असती. म्हणजे थोडक्यात मदाय्राने दोरीने बांधलेल्या माकडासारखी माझी अवस्था आहे तर. असे काही बाही विचार हल्ली माझ्या डोक्यात येत असतात.

गर्दीमधले एकटेपण

लेखक अबोलघेवडा यांनी सोमवार, 07/05/2018 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
माणसांचा घोळका आजूबाजूला असतो. आपली (म्हणजे केवळ नात्याने आपली. ती खरोखरंच आपली असतात का हे कोडंच!) म्हटलेली माणसं आपल्या जवळ असतात. सोशल मिडिया वर शे-दोनशे माणसं ‘कनेक्टेड’ असतात. आणि तरी देखील आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा या भाऊगर्दीत मी एकटा आहे असं वाटायला लागतं. कशामुळे होत असावं हे असं? जरी आपण या जगात कोणीच नाही हे जरी मनाला पटविण्याचा प्रयत्न केला तरी ते मनोमन स्वीकारणं कठीण असतं. आपल्या सुखदुःखांशी कोणालाच म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे आपल्या म्हटलेल्या माणसांना देखील काहीच देणंघेणं नाही हे वाटणं ही माणसाला मिळालेली सगळ्यात मोठी शिक्षा असते असं मला वाटतं.

कर्मण्येवाधिकारस्ते...

लेखक अबोलघेवडा यांनी रविवार, 06/05/2018 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्ष भगवंतांनी सांगितलेल्या या वाक्याचा अर्थ लावतोय... हो बरोबरच वाचलत. कित्येक वर्ष.... अहो, भगवद्गीता ही गोष्टच अशी आहे की जितके वेळा ती वाचू तितके वेळा वेगवेगळे अर्थ लक्षात यायला लागतात. जितक्या प्रमाणात कर्म करू तितक्या प्रमाणात फळ मिळालं पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यात काय चुकलं माझं असं माझं मन मला सारखं विचारायचं. या श्लोकात ४ गोष्टी श्रीकृष्णांनी सांगितल्या आहेत. १) फक्त कर्म करण्याचा तुला अधिकार आहे २) कर्माच्या फळांवर तुझा अधिकार नाही. ३) मिळालेल्या फळाला तू कारणीभूत आहेस असे समजू नकोस.

ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर-१ 

लेखक शाली यांनी शुक्रवार, 04/05/2018 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
काही मित्रच असे असतात की ते कधीही भेटले तरी मन कसं प्रसन्न होवून जातं. पण माझ्या या मित्राची जातकुळी जरा वेगळी. मनःस्थिती चांगली असताना भेटला तर वेळ मजेत जातो पण एऱ्हवी मात्र याला पाहीले की ‘कुठून ही ब्याद आली’ असे होते. कारण हा वृत्तीने प्रचंड नास्तीक. नास्तीक असल्याने नास्तीकांचे ‘स्वयंघोषीत अधिकार’ याला प्राप्त. त्यामुळे हा सदैव हातात एक अदृष्य तलवार घेऊन हिंडत असतो. म्हणजे कुणाला चतुर्थीचा ऊपवास असला की याचा लगेच वार. कुणी सोमवारी पिंडीवर अभिषेक केला की याचा लगेच हल्ला. असेन का नास्तीक. काय लक्ष द्यायचे. असंही म्हणता येत नाही. कारण या प्राण्याचा व्यासंग मोठा दांडगा.

अंतर्मुख!

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 04/05/2018 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंधेरी स्टेशनच्या तीन नंबर फलाटावर तीस सेकंद थांबून गाडी पुढे सरकली, आणि दरवाजाशी उभ्या असलेल्या त्या दोघांच्या नजरा सरसावल्या. पलीकडच्या, चार नंबर फलाटावरचं काहीतरी शोधू लागल्या. गाडी जोगेश्वरीच्या दिशेने निघाली. समोरचा फलाट संपला आणि दोघांचे डोळे चमकले. त्यांनी एकमेकांकडे पाहून खुशी व्यक्त केली. म्हणून माझेही लक्ष त्या फलाटाकडे, त्या जागेवर खिळले. फलाटावर टोकाला असलेल्या एका बांधकामाच्या भिंतीवर एक चित्र होते... अगदी साधे. बंदूक हातात धरलेल्या युद्धसज्ज जवानाचे! त्यावर एक वाक्य होते- ‘एक जिम्मेवार नागरिक बनो ताकि हम आपके लिये गर्वसे लड सकें!’ ...

वाचकांचा पत्रव्यवहार अर्थात जनमानस

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 03/05/2018 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्वजण इथे वाचन आणि लेखन करण्यासाठी जमतो. अनेक विषयांवर चर्चा होतात, रंगतात, वादविवाद अन काथ्याकूटही होतो. या माध्यमाव्यतिरिक्तही आपण इतर वाचन करतो. रोजचे वृत्तपत्र वाचन हा आपल्या दिनक्रमाचा एक भाग असतो. त्यावरून एक नजर फिरवल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आज जरी इ-माध्यम प्रस्थापित झालेले असले तरी आपल्यातील बहुतेकांना एखादे तरी छापील वृत्तपत्र वाचायला आवडतेच. जेव्हा आपण ते चाळू लागतो तेव्हा त्याच्या पानांमध्ये आपल्याला विविध विषयांची विभागणी केलेली दिसते. मग आपल्या आवडीनुसार आपण हव्या त्या पानावर रेंगाळतो. संपादकीय पान हा वृत्तपत्राचा आत्मा असतो.

माझा आजोळ बेळगाव २

लेखक स्वप्निल रेडकर यांनी बुधवार, 02/05/2018 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
बेळगाव म्हटलं कि खूप साऱ्या गोष्टी माझ्या मनाभोवती रुंजी घालू लागतात. कॅलिडोस्कोप सारखा वेगवेगळ्या आठवणी,माणसं ,जागा ,चवी नॉस्टॅल्जिक बनवतात .

बालाशिष स्तोत्र

लेखक खिलजि यांनी सोमवार, 30/04/2018 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच खूप दुःख वाटतेय आजकालच्या बातम्या ऐकून ऐकून . वृत्तांकनामधून आजकाल लहान मुलांवरील अत्याचाराच्या बातम्या जरा जास्तच येत आहेत . खूप विषन्न व्हायला होते हे सारे ऐकून . मला जे वाटते ते मी आतापर्यंत करत आलोय . माझ्या मुलाचा जन्म झाल्यापासून मी नित्यनेमाने बालाशिषः स्तोत्र म्हणतो . जेणेकरून खरंच दत्तगुरूंचे रक्षकवच असेल तर ते माझ्या मुलांना लाभावे म्हणून . या स्तोत्राची संख्या ५ आहे . म्हणजे किमान आपल्या मुलांच्या रक्षणासाठी ते दिवसातून किमान पाच वेळा तरी म्हणावे . वरील लिखाणावरून अभिप्रायांची राळ उडू शकते . मला पुन्हा नास्तिक नि आस्तिक वादामध्ये पडायचे नाही आहे .

भारतीय न्यायपालिकेची विक्षिप्तता

लेखक arunjoshi123 यांनी शनिवार, 28/04/2018 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित कोणतंच नियंत्रण नसल्यामुळं भारतीय न्यायपालिका रसातळाला गेलेली असू शकते. कदाचित इतर देशांच्या मानाने खूप चांगली असू शकते. कदाचित इतर अन्य संस्थांपेक्षाही बरबटलेली असू शकते. देशात न्याय आहे अशी सर्वसाधारण जनभावना केवळ एक चालत आलेली प्रथा म्हणून जीवंत असावी. तसं न्यायपालिकेच्या बाबतीत "संस्था विथ डिफरन्स" नावाचा काही प्रकार नसावा. मला इथे विक्षिप्त म्हणजे चांगल्या, वाईट, लॉजिकल, इल्लॉजिकल, परस्परविरोधी, आपल्याच अन्य न्यायालयाच्या वा बेंचच्या विरोधी, संविधानविरोधी, देशविरोधी, इ इ घटना अभिप्रेत आहेत.