Skip to main content

विचार

उमेद

लेखक फटू यांनी सोमवार, 06/10/2008 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुझ्या जगात उलथापालथ होताना कुणी तुझ्या हाकेला ओ दिलीच नाही, तुला आधाराची नितांत गरज असताना निसटत्या क्षणी मदत मिळालीच नाही, कातरवेळी दूर जाणा‍र्‍या वाटेकडे पाहूनही मायेचा स्पर्श करणारं कुणी आलंच नाही, नजरेमध्ये गगनभरारीचं स्वप्न असताना तुझ्या पंखांना कुणी जर बळ दिलंच नाही, जर कधी झाकोळून गेलं निळं आभाळ सारं तू भर दर्यात अन कधी बेईमान झालं वारं, निरव एकाकी वाटेत तू अडखळत असताना कुणीच नसेल बाजुला तुला आधार देणारं, माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरू
Taxonomy upgrade extras

आत्मसमर्पण

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 04/10/2008 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी नोकरीची संधी चालून आलेला मुलगा आई वडिल इथ एकटे पडतिल म्हणुन संधी नाकारायला निघतो,तेव्हा वडिल त्याला सागत आहेत..........
माझ्या बेड्या तुझ्या पायी उगाच अडकवु देणारनाही घे भरारी उंच अंबरी तुझेच आकाश अन दिशा दाही म्हातारपणि आम्हाला विचारले पाहिजेच असे नाही जन्म देताना तुला आम्ही सुद्धा विचारले नाही माणुसकीला धरुन नाही असेही तु मानु नकोस नव्या युगाची ग
Taxonomy upgrade extras

मराठी लेखनावर इंग्रजीचा प्रभाव

लेखक मी_ओंकार यांनी शनिवार, 04/10/2008 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
मराठी भाषेवरील इंग्रजीचा प्रभाव, इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द, ते शोधताना संस्कृतातील जड शब्दांचा होणारा वापर या आणि अशा बर्‍याच मुद्द्यांवर बर्‍याच ठिकाणी बर्‍याच वेळा काथ्याकूट झालेला आहे. तरीही या नवीन काथ्याकूटास सुरवात करण्याचे मागील काही दिवस विचार घोळत होते. याचा उद्देश वर सांगितल्यापैकी पहिला म्हणजे मराठी भाषेवरील इंग्रजीचा प्रभाव आणि प्रामुख्याने लेखनावरील प्रभाव हा आहे.

काळ थांबला कधीचा...

लेखक राघव यांनी गुरुवार, 02/10/2008 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
या दोन्ही कविता मी बर्‍याच आधी लिहिलेल्या आहेत. माझ्या एका जिवलग मित्राच्या मनःस्थितीचे वर्णन पहिल्या कवितेत करण्याचा प्रयत्न मी केलेला. सोबतची दुसरी कविता कदाचित त्या मनःस्थितीतून बाहेरची पडण्याची एक वाट असावी.

चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!

लेखक घाटावरचे भट यांनी गुरुवार, 02/10/2008 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, धाग्याच्या नावाने बिचकून जाऊ नका!!! कृपया एकवार वाचण्याचे कष्ट घ्या... तर मंडळी, आपलं शास्त्रीय संगीत बर्‍याच लोकांना वाटतं तसं दुर्बोध आणि क्लिष्ट मुळीच नाही. किंबहुना, ते अत्यंत मनोरंजक आहे. आंतरजालामुळे संगीताची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होउ लागली आहे. याचा माझ्या सारख्या शास्त्रीय संगीताच्या पंख्यांना मोठा फायदा झालेला आहे. आणि ईस्निप्स.कॉम सारख्या अनेक संस्थळांवर संगीत अपलोड करण्याची सुविधा आहे, ज्याचा आपण फायदा घेणार आहोत. या धाग्याचा उद्देश असा आहे, की आपल्याला आंतरजालावर शास्त्रीय संगीताचा एखादा उत्तम तुकडा सापडला, तर त्याचा दुवा कृपया द्यावा.

मी!!!

लेखक स्व यांनी बुधवार, 01/10/2008 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
व्यावहारिकदृष्ट्या बिनकामाच्या माहितीचा अफाट खजिना ......

सार्थक्..(एक मुक्त प्रवाह)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 01/10/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अलवार जाग आली.. उठून बाहेर आले. सहज पॅटीओचं दार उघडलं..समोर पसरलेली हिरवळ डोळ्यात साठवत तशीच बसून राहिले त्या खुर्चीवर.. ४ दिवसापूर्वीच तो येऊन गवत छाटून गेला होता आणि आज परत.. एकेक पातं जणू तलवार.. !!!!:) पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??" अचानक एखादी वार्‍याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत...

आठवणीतलं नवरात्र

लेखक भाग्यश्री कुलकर्णी यांनी सोमवार, 29/09/2008 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक गावचा नवरात्रोत्सव हा निरनिराळा असतो. मिरजेत असताना सोवळ्यातला स्वयंपाक हा विषय सोडला तर इतर कर्मकांड फारशी नव्हती. आजी गं. भा. होती. तर आजीचे मोठे दीर दशग्रंथी ब्राह्मण. त्यांना तर आजीच्या हातचे पाणी देखील चालायचे नाही. पण म्हणून माझ्या मैत्रिणी इतर जातीच्या आहेत (म्हणजे ब्राम्हणेतर) म्हणून त्यांना घरी मज्जाव नव्हता. मी ही त्यांच्याकडे मुक्त संचार करत असे. गावात एक अंबाबाईचं मोठं मंदिर होतं. (आजही आहे) वर्षभरातून कधी तरी त्या मंदिरात जाणारे आम्ही मात्र नवरात्रात दररोज जायचो. मंदिराच्या बाजूला जत्रा भरायची.

पिंडी ते ब्रह्मांडी उर्फ भुदरगड ते लेहमन

लेखक शेखस्पिअर यांनी सोमवार, 29/09/2008 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या घरामागे कोणे एके काळी एक 'भुदरगड' नावाची पतसंस्था होती... आमच्या शहरातील काही बडी प्रस्थं आणि मान्यवर त्या 'पतसंस्था' नावाच्या 'दुकानाशी' बांधून होते. त्या सगळ्यांच्या 'पुण्याई'मुळे बरेच छोटे छोटे गरजू गुंतवणूकदार गोळा झाले. आणि पतसंस्थेला प्रचंड बरकत आली. मग काय धडाधड कर्ज वाटप सुरु झाले..सगळीकडे कसा आणंदी आणंद झाला. पण एके दिवशी एकाएकी बातमी आली की पतसंस्था बुडाली. मग काय ..लोकांचे थवेच्या थवे ,झुंडीच्या झुंडी,जथ्थेच्या जथ्थे 'दुकानासमोर' आल्या.. पुरुषांच्या शिव्या,, बायकांचे करवादणे,,याचा एकच हलकल्लॉळ झाला.. आमच्या ओळखीतले किमान १००-१५० जण असे होते की त्यांचे सुमारे रु.१०,००० - २,०

कचेरी ते कॉर्पोरेट ऑफीस : एक मनकल्लोळ !!!

लेखक छोटा डॉन यांनी शनिवार, 27/09/2008 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता "जर्मनीला" येऊन २ आठवडे झाले. सगळा वेळ सेटलमेंटमध्येच गेला. भारतातुन निघायच्या १ आठवडा आधी व इथे आल्यावर पहिला आठवडा फ़ार जोशात गेला. नविन जागा, नवा देश, नवी भाषा, नवी संस्कॄती व राहणीमान आणि विचारसारणी व सगळ्यात महत्वाचे म्हणजे "नवे ऑफीस " .... फारच फरक पडला या सर्व गोष्टीत, त्यामुळे मनात एक सुप्त आकर्षण, एक दडपण, एक उत्साह व तेवढाच नव्हर्सनेस अशा भावनांनी पार डोक्यात गोंधळ उडाला होता. असो.