Skip to main content

विचार

स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 03/01/2009 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
Bheemasen पं.भीमसेन जोशी यांचे नांव मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा मी चौथी किंवा पांचवी इयत्तेत शिकत होतो. त्या काळात टेलीव्हिजन आणि टेपरेकॉर्डर नव्हतेच, ट्रान्जिस्टरसुध्दा आले नव्हते. आमच्या लहान गांवात आमच्याच नव्हे तर माझ्या कोणा मित्राच्या घरी व्हॉल्व्हचा रेडिओ देखील नव्हता. त्यामुळे तोपर्यंत माझ्या कानावर शास्त्रीय संगीत कधीच पडलेले नव्हते.

मनाच्या कुपीतले-कोऽहमचा पुकारा

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 01/01/2009 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो नववर्षाच्या शुभ प्रसंगी आपणा सर्वाना वास्तवदर्शी शुभेच्छा देणारा हा लेख . हे लिखाण थेट मनाच्या कुपीतुन उतरलेले.
कोऽहमचा पुकारा
3........ 2......... 1 .......... आणि 2008 साल संपले. वर्तमानातून इतिहासात गेलं. नव्या कॅलेंडरसोबत सर्वांनी नव्या आवेशाने, उमेदीने, जिद्दीने नवे आयुष्य जगायला सुरूवात केली आणि या सालाचा श्री गणेश करताना बहुतेक जण भूतकाळात डोकावले. भूतकाळातल्या घटना भविष्य घडवतात हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच वर्षाअखेरीला घेतल्या जाणाऱ्या या आढाव्याला महत्व आहे.

थर्टीपस्ट नाईट २००७

लेखक ब्रिटिश यांनी बुधवार, 31/12/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
थर्टीपस्ट नाईट कदीची वाट बगत होतू ह्या दीवसाची. रम्या, सूर्‍या, म्हादेव न मी चौगांनी पक्का बेत ठरवलावता.सगली तयारी केलती. बॅगपायपरचे दोन खंबे,चाकन्याला अंडी, शेंगदाने,स्टार्,बॉईल चना आनुन ठीवल व्हत.बारक्याला मटन आनाला पाटवला. सूर्‍याच्या शेतात बरूबर सात वाजता जमाच ठरल होत. अंगात येगलाच वारा येत व्हता. संद्याकाली साडेसा ला सूर्‍याची शीटी आली. मी भायेर नींगालू. शेतात पोचलु. रम्या न म्हादेव वाटच बगीत व्हते. आमाला बगीतल्या बगीतल्या 'थर्टीपस्ट नाईट येन्जाय ~~~' रम्यान बोंब ठोकली. आर कूट होता र आवरा टाईम ? कती वाट बगाची तूमची ?

स्लमडॉग मिलिनेअर

लेखक अनामिक यांनी बुधवार, 31/12/2008 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
स्पॉइलर अलर्ट : चित्रपटातील कथानक ज्यांना माहीत करून घ्यायचे नाही त्यांनी लेख वाचण्याची तसदी घेउ नये. झोपडपट्टीत राहणाऱ्या कोण्या एका चहावाल्या मुलाने 'कौन बनेगा करोडपती' मध्ये एक करोड रुपये जिंकलेत तर तुमचा विश्वास बसेल? नाही बसणार ना? वाटलंच! कारण काहीही असो, सामान्य माणसाच असामान्य कृत्य पाहून आपल्या मनात कौतुक नंतर, संशय पहिले येतो. कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय असं वाटतं. आणि असंच होतं स्लमडॉग मिलिनेअर या चित्रपटात. (या वीकएंड ला पाहिला आणि खरंच खूप आवडला!!) चित्रपटातला नायक जमाल मलिक कॉल सेंटरमध्ये चहावाल्याचं काम करत असतो.

विसंगतींचे संदर्भ...!

लेखक झेल्या यांनी सोमवार, 29/12/2008 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
कळून इतके काय कळे हे नकळे मजला का न कळे ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! भास भाबडे रंग रूप हे भास भावना भास चेतना, भास सत्य अन भास भासही भास असे सगळे सगळे... ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! समजून घेतो आपण आपले सगळे आपल्यासाठी इथे.. आपण कोण नि कोण दुजे हे परंतु येथे कोणा न कळे.. ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! भूल दिशा अन दिवस निशा हे पोकळ जडता स्थिर चल हे.. अंत अनंत नि क्षणिक चिरंतन व्यक्ताशी अव्यक्त जुळे.... ज्याच्या त्याच्या सन्दर्भांचे ज्याचे त्याचे समज खुळे...! -झ
Taxonomy upgrade extras

वैधानीक इशारा.

लेखक रामदास यांनी शनिवार, 27/12/2008 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
या वाटेवर इथून पुढे जरा जपून. तरबेज प्रेमी पण हलकेच पाउल टाकतात. दिवसाउजेडी. रापलेले भोई पण घाबरतात पालखी वहायला या वाटेवर. ती, फुलदाणी तो चंद्र ती शिशी ग्राईप वॉटरची. ते तांबडे तावदान तो आयना ती काकणं ते सगळं काही जे फुटतं लाखो बधीर तुकड्यात. विकीरान्नासारखं. ते डंख करेल टाचेखाली. हलकेच. साप्ताहीक भविष्यासारखं. सहज.निर्धोक. वरवर चाळता. चालता ? जरा जपून अपूर्ण कवितांचा असह्य ठणका पहाटेसच जोर धरतो.
Taxonomy upgrade extras

पाणि

लेखक मॅन्ड्रेक यांनी शनिवार, 27/12/2008 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
पाणि प्रसंगी डोळ्यातून येतं, काळजाचं होतं, अंगातही असतं, आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं! तेवढंच पुरत असतं तर , किती बरं झालं असतं! -vinya pandit.
Taxonomy upgrade extras

मुखर्जीसाहेब कॄती केली पाहीजे , पण ...

लेखक बामनाचं पोर यांनी शुक्रवार, 26/12/2008 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यापासून भारताचे सर्व नेते हे पाकिस्तानला धमकी देण्यात आणि " ओ , हे ऐकत नाहीत बघा " असे रडगाणं अमेरीकेसमोर गाण्यात फार व्यस्त आहेत. प्रणव मुखर्जी हे नुकतेच म्हणाले " बडबड नको कॄती करा ". मुखर्जीसाहेबांचे अगदी बरोबर आहे कॄती केली पाहीजे , पण ती पाकने नव्हे तर आपण ...आपल्या देशातली घाण साफ करण्याची कॄती .. या हल्यानंतर अगदी मच्छीमार संघटना ते पार रॉ पर्यंत सगळयांनी जे एकमेकांवर आरोप केले ते अगदी घृणास्पद होते. प्रत्येकाचे हेच म्हणणे होते " आम्ही इशारा दिला होता , त्यांनी ऐकलं नाही " ..

जाहीर विचारणा आणि आवाहन

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 24/12/2008 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, मिसळपाववर सध्या नमस्ते सदा वत्सले मातृभूमे........ लैच फार्मात आहे. हा लेख लिहायच्या टैमाला हा धागा उघडून बरोब्बर ७ दिवस आणि ६ मिनिटं झालेली आहेत, त्याची ३१६६ वाचनं झालेली आहेत आणि त्यावर १४३ प्रतिसाद आहेत. आता गम्मत अशी आहे की माझा इतिहास थोडासा कच्चा आहे (आणि संस्थळांचा, विशेषतः मिपाचा इतिहास तर बिल्कूल झीरो) म्हणून मला तुमची मदत हवीये.

अंड्याची टरफले आणि बुटाची लेस

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 24/12/2008 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं आपले अनुभव असेच काहीसे निष्कर्ष आणि ज्ञान बाहेर यायच्या आधीच... पाहतो आहे.. पडलेली टरफले अस्ताव्यस्त.. टिप्पणी : मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय याचा विचार करताना काही कल्पना मांडव्याशा वाटल्या. मला नक्की काय म्हणायचे आहे ते छंदोबद्ध रचना न करता किंवा लेखात असतात तश्या पूर्ण वाक्यात भावना न मांडता, तुटक तुटक वाक्यांत भावना मांडल्याने वाचकाला त्या कशा भावतात? ते पाहण्यासाठी ही रचना केली आहे.