Skip to main content

विचार

अनाम वीरा ...

लेखक मैत्र यांनी मंगळवार, 02/12/2008 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती... आणि त्यातच एक होतं - अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात... कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे. गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही?

बातमी २०२० मधील : देशात अचानक शान्ततेचे वारे वाहु लागले आहे.

लेखक आम्हाघरीधन यांनी मंगळवार, 02/12/2008 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
देशात अचानक शान्ततेचे वारे वाहु लागले आहे. दि.१जाने.२०२० -(बी. बी .शी.) आजवर दररोज घडणार्या विविध बोम्ब स्पोटान्ची आता भारतिय नागरिकान्ना सवय झाली होती परन्तु आज अचानक सर्व दहशत वादी सन्घटनान्नी शान्ततेचा नारा दिला असुन ते या पुढे एक दिवसा आड आपल्या कारवाया करणार आहेत असे अल्-कायदा आणी तत्सम सड्घटनाच्या प्रतिनिधीन्नि स्प्ष्ट केले. या घोषनेने भारतिय जनतेच्या मनात आजवर असलेले मळभ दुर होण्यास हातभार लागेल असे राजकिय विष्लेषेकान्चे मत आहे.

मुख्यमंत्र्यांचे संतापजनक वक्तव्य.

लेखक सुनील मोहन यांनी मंगळवार, 02/12/2008 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
शहीद मेजर संदीप उन्नीकॄष्णन यांचे घर नसते तर तिथे कुत्रेही फिरकले नसते. असे निर्बुद्ध आणि चीड आणणारे वक्तव्य केरळचे मुख्यमंत्री श्री. अच्युतानंद यांनी केले आहे. मूळचे केरळचे सुपुत्र असणारे मेजर उन्नीकॄष्णन यांच्या अंत्यसंस्काराला अच्युतानंद उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी ते उन्नीकॄष्णन यांच्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या बेंगलुरु स्थित निवासस्थानी पोहोचले. तत्पूर्वी उन्नीकॄष्णन यांच्या घराची सुरक्षारक्षक आणि श्वानपथकामार्फत तपासणी करण्यात आली होती.

आईची विटंबना

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 02/12/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईवर झालेली जखम आणि त्या जखमेच्या वेदनानी कण्हण्याच्या तिच्या किंकाळ्या ऐकून माझं मन सून्न झालं.काही लिहावसंच वाटत नाही.एक दोन लेखनं केली, पण मिपावरचा तो तिरंगा पाहून ती लेखनं सादर करायला मला मनंच होत नाही.आईने किती म्हणून जखमा सहन केल्या.कधीही तिने जर हात उचला तर आपल्या संरक्षणासाठीच उचलला.

"तो"- जागतिक एड्स दिना निमित

लेखक sanjubaba यांनी सोमवार, 01/12/2008 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
शापित झालीय भुमी त्याच्या अस्तित्वान आज फिरतोय तो शिस्तीत..... श वा गा रा त न.......... एक नागवा वेडा उभा असावा समोर तसा "तो" वावरतो य वेश्ये च्या वस्तीत...... आणि त्याच्या ओढाळ पण मांगल्य भासणार्‍या डोळ्याने खुणा करतोय "तो" तुम्हा-आम्हाला पण फसतो मात्र सवैरचारी मस्तीत......... याच मस्तीत द्डलाय मृत्यू-गंध ज्याने येईल अंतिम वेळ आणि जळाल मतलबी चादं न्या सोबत...... राहील रात्र निसतब्ध नुसती च....... गर्भावतीची ही होऊ दे साक्ष हे शापित क्षितिज कमळ नको उमलू देऊ.... तरच होईल तुझ्या जीवनाची सिद्धता जरी राहतील बाकी तुझ्या अस्तीच.........
Taxonomy upgrade extras

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

लेखक बबलु यांनी रविवार, 30/11/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी... अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms

स्ट्रेस बस्टर

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 28/11/2008 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
थकला आहात का? डोक्यात कोलाहल आहे का? कामाचा खूप ताण झाला आहे का? हा घ्या स्ट्रेस बस्टर. खुर्चीत सरळ बसा. पाठीला पोक नको एवढच सरळ. हात मांडीवर ठेवा. डोळे बंद करा. बुब्बुळे किंचित वर. श्वासोश्वास नेहेमी प्रमाणे. १०० पासुन उलटे मोजा. (१००,९९,९८,९७,९६)एकदम हळू हळू. मागे वाघ लागल्यासारखे नाही. ० ला आल्यानंतर डोळे एकदम उघडे करु नका. " आता मी डोळे उघडत आहे" हे वाक्य स्वःत शी मनातल्या मनात हळु म्हणा. १ ते ५ मोजा आणि हळु हळु उघडा. बघा काय वाटते ते आणि कळवा. हा प्रयोग करायला सुमारे ३ मिनिटे लागतात. ४ लेक्चर नंतर मी हा प्रयोग करतो. थकवा पूर्ण निघून जातो. पहिल्या वेळी कदाचित रिझल्ट मिळणार नाही.

जीवन त्याना कळले हो

लेखक कवटी यांनी गुरुवार, 27/11/2008 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
बेलापूरला पामबीच रस्ता जिथे संपतो तिथेच एका व्यवसायीक इमारतीत आमचे कार्यालय आहे. त्या इमारतीत वेगवेगळ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. आणि तळमजल्यावर एका गाळ्यात बसूचे हॉटेल आहे. बसूचे हॉटेल हे हॉटेल कम खानावळ कम पानटपरी कम कोल्डड्रिंक हाऊस आहे. रोज सकाळी ऑफिसला आलो की गाडी लाउन खाली बसूच्या हॉटेलात वडापाव किंवा भजीपाव खाउन चहा सिगरेट मारून मग वरती ऑफिसात येणे हा आमचा नित्याचा क्रम. सकाळी सकाळी बसूची गडबड पहाण्यासारखी असायची.

तक्रार - मिपाचे बंद पडणे

लेखक सुनील यांनी बुधवार, 26/11/2008 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज मिपा वारंवार बंद पडत होते. जेव्हा सुरू होत होते, तेव्हादेखिल त्याचा वेग समाधानकारक नव्हता. सांगितले जाते, त्याप्रमाणे खरोखरच जर "जुन्या चौपाटी"वरील मंडळी येथिल मिसळीत वाळू मिसळीत असतील, तर त्याचा बंदोबस्त मिपाच्या तांत्रिक सल्लागारांनी त्वरीत करावा, ही विनंती. नेहेमीच "परकीय हाताचा" दाखला देणे योग्य नाही.