सत्यमवरचा एक लेख.
आजच्या लोकप्रभातला लेखाची लिंक देत आहे.
कृपया ,वाचून आपले मत कळवावे.धन्यवाद.
विचार — वैचारिक मराठी लेखनाचा विभाग. तत्त्वचिंतन, समाजचिंतन आणि जीवनमूल्यांवरील मराठी विचार येथे वाचा व चर्चेत सहभागी व्हा.
आजच्या लोकप्रभातला लेखाची लिंक देत आहे.
कृपया ,वाचून आपले मत कळवावे.धन्यवाद.
मिपाच्या मुखपृष्ठावर आजकाल अभ्यंकर वहिन्यांची वर्दळ असते. त्यांच्या अनुमोदनानंतर मिपाच्या तर्रीवर ताव मारायला आम्ही मिपाच्या दालनांमध्ये प्रवेश करतो. आज मात्र मिपाचे दर्शन मंगलमय वाटले. सकाळी सकाळी बाबूजींची आठवण, त्यांनी वीर सावरकर बनवताना केलेले शर्थीचे प्रयत्न, खाललेल्या खस्ता यांचे स्मरण करुन दिल्याबद्दल मिपाचे आभार!
मित्राकडून बातमी मिळाली की लालजी देसाई गेले. पु लंच्या 'रविवार सकाळ' मधे अतिशय बहारदार गाणं असायचं त्यांचं. थोड्याशा भीमसेनांच्या ढंगात ते 'उगीच का कांता' असं काही सुरेख रंगवतात की व्वा! श्रीकांत मोघेने थोडा वात्रटपणा केल्यावर लालजी, 'कांSSS ता SSSSSS' अशी नाजुक हरकत घेतात नी श्रीकांत मोघेंची 'अग आई ग' अशी दाद जाते !! कींवा 'धरणीSSSSS' म्हणून ठासून दाखवतानाचा आवेश, कानडी ढंगात गायला सुरूवात केल्यावर त्याच 'धरणीSSSSसंग'ला 'वा..वा..वा' अशी श्रीकांत मोघेंची मॅचिंग दाद.....छे. शंभरवेळा कॅसेटवर पाहीलंय, पण परत पाहिन तेव्हा हा माणूस आता आपल्यात नाही याची बेचैनी वाटेल.
"हे ऽऽ काऽऽऽप्पेऽऽऽ" असं बेंबीच्या देठापासनं ओरडत, उन्हानं तावलेल्या लालबुंद चेहेर्यानं गच्चीवरुन धावत जायचं आणि अनवाणी पायांना चटके बसत असले तरी गच्चीवरल्या कुंभीवर चढून कापला गेलेला पतंग कोणत्या पोरांचा होता हे टाचा उंच करुन शोधायचं हे दृश्य आता माझ्यासाठी तरी इतिहासजमा झालं आहे.
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सरकारने भारतीय नागरिकांना अतिशय सक्षम अशा सुरक्षाव्यवस्थेची हमी दिलेली होती. सर्व राजकारणी लोकांनी अगदी जीव तोडून सांगितले की भारताच्या सर्व तपास यंत्रणा, पोलिस,सी.बी.आय, लष्कर इत्यादींना हाय अलर्ट वर ठेवण्यात आले आहे. पण ह्या सर्व यंत्रणा खरंच कार्यरत आहेत?
बहुधा नसाव्यात अशी दाट शंका यावी अशा दोन बातम्या गेल्या काही दिवसात वाचनात आल्या. आज या दोन घटना घडून सुद्धा अनेक दिवस उलटून गेले आहेत पण सरकार किंवा सुरक्षा यंत्रणा यापैकी कुणाकडूनही काही खुलासा केला गेला नाहीय. प्रसारमाध्यमे सुद्धा मौन पाळून आहेत.
रिक्त
=========================
.
.
काही शब्द.. नुसते,
आतल्या आत उकळत राहतात..
उतूच जात नाहीत.
रटरटत्या पाण्यासारखे..
नुसती वाफ होत राहते..
साठलेल्या भावांची..
चरचरत..
शेवटचा थेंब उडून जाई पर्यंत.
पात्राला फक्त जाणवत राहत..
रिक्त होण्या आधीच..
वाफाळ रटरटणं..!
.
.
=========================
स्वाती फडणीस ..... ११-०१-२००९
यशदा
============================
.
.
ती म्हणाली..
मी समर्पित आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांसकट.
इतकी की आता माझी मला ही मी सापडत नाही.
.
ती म्हणाली..
मी सुखात आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. माझ्या स्वप्नांशिवाय.
इतकी की आता दुःख माझ्या आसपास फिरकत नाही.
.
ती म्हणाली..
मी यशदा आहे..
माझ्या इच्छा.. माझे विचार.. आणि माझ्या स्वप्नांची.
इतकी की आता अपयश माझ्या नजरेस पडतच नाही.
.
.
============================
स्वाती फडणीस ............................ १०-०१-२००९
सर्व बंध तोडून मी,
झेप घेतो आकाशात..
उरुन राहतो कोठेतरी,
तुमच्या ओझरत्या स्पर्शात;
मी स्वर आहे भैरवीचा,
कधी मल्हाराची तान..
कधी भिजरी पायवाट,
कधी रखरखणारे रान;
मी स्पर्श आहे,
मी भाव आहे..
मी तुमच्याच ओळ्खीचे,
अनोळखी नाव आहे;
काही काही कलाकृती/प्रसंग अवचित आवडून जातात. ते का आवडले हे सांगण्यासाठीसुद्धा काही वेळा आपल्याकडे शब्द नसतात. त्यांचीच आठवण जागवण्यासाठी हा धागा.. माझ्यापासूनच सुरुवात करतो :) -
मला वाटते वटवाघुळ व्हावे
अन झाडाला लटकावे,
जरी जग हे चाललेले उलटे
दिसु लागेल सुलटे .
क्ष..