Skip to main content

विचार

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 19/01/2010 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन व लेखकाचे बाह्यरुप हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात. असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे. थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे?

Pride and Prejudice?

लेखक अमितकुमार यांनी सोमवार, 18/01/2010 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-toi/special-report/Pride… Times of india मध्ये नुकत्याच प्रसिद्ध ह्या लेखात लेखकाने बिहारी पणाचा गर्व व्यक्त करून, त्यांचा इतर राज्याच्या विकासात किती महत्व पूर्ण वाट आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला , पण ह्या लेखाला प्रतिकिया देताना वाचकांचा तोल गेला आणि विना कारण मराठीला मध्ये आणण्यात आले. मराठी माणसावर अनेक खालच्या दर्ज्याची टीका केली.

मैत्र जिवांचे

लेखक रविंद्र गायकवाड यांनी बुधवार, 13/01/2010 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला शिकायला आवडते अभ्यासातही खूप रस आहे, पण आज वर्गात लक्ष लागत नव्हते. मी अस्वस्थही नव्हते. कोणते ही टेंशन नव्हते. कुणी काही मनाला लागेल असे बोलले नव्हते कि एखाद्या अपयशामुळे खचून गेले नव्हते. सगळे जग निर्जिव वाटत होते. चालती बोलती मानसे यंत्रवत भासत होती. ईतक्यात एक खट्याळ वर्गमैत्रिण थट्टेने म्हणाली, "चुपचुप बैठे हो जरुर कोई बात है?? आज लक्ष कुठे आहे तुझे? प्रेमाबिमात पडलीस काये?. थोडावेळ स्वतःवरच शंका आली. असं तर नसेल?... पण कोणताही चेहरा किंवा व्यक्ती डोळ्या समोर येत नव्हती. का्हीतरी झालं होतं पण नक्की काय झालं होतं मला?.

पाव मार्काचा धडा !

लेखक भोचक यांनी शनिवार, 09/01/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
एरवी उत्साहाने फसफसत शाळेतून परतणारी माझी लेक त्या दिवशी तिला घेऊन येणार्‍या वाहनामधून उतरली तेव्हाच तिच्या डोळ्यात आभाळ दाटलं होतं. ते ओळखूनच तिच्या आईने तिला उचलून जवळ घेतलं नि तोपर्यंत तिच्या डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं. साथीला छातीचा भाताही वाजू लागला. तिच्या आईने थोपटतच तिला आधी शांत केलं, पण तरीही ते रोखता येणं तिच्यासाठी अशक्य बनलं होतं. हमसून हमसून रडता रडता ती म्हणाली, 'टीचर'ने कमी मार्क दिले. कशाबद्दल? आईचा प्रश्न. 'औ' चुकीचा लिहिला म्हणून- लेक उत्तरली. मग ठीक आहे. त्यात काय एवढं? एवढं बोलेपर्यंत मायलेकी घरात पोहोचल्या होत्या. लेकीने रडत रडतच तिच्या दप्तरातून तिची 'बुक' काढली.

२६/११ ला मुंबईवर लादल्या गेलेल्या रक्तलांछित हल्ल्यांपासून आपण काय शिकले पाहिजे?

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 07/01/2010 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानी अतिरेक्यांनी २६/११ ला मुंबईवर केलेल्या रक्तलांछित हल्ल्याचे वर्णन पहातांना, वाचतांना व ऐकतांना असं वाटलं होतं कीं इतक्या लोकांना, पोलिसांना व शेवटी लष्करालाही २-२॥ दिवस तंगवून सोडणारं हे पथक ३०-४० लोकांचं तरी असावं. मग कळलं कीं फक्त दहाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी इथं येऊन हा अनर्थ केला व असा प्रचंड धुमाकूळ इथं यशस्वीपणे घातला.

नववर्ष

लेखक सुबक ठेंगणी यांनी गुरुवार, 07/01/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच धुक्यातून, ता-यांनी गच्च भरलेल्या बिलोरी आकाशातून हिवाळयाची चाहूल लागते. डिसेंबरच्या अगदी सुरुवाती सुरुवातीला विंचरलेल्या काळ्याभोर शेतांच्या भांगातला भुरभुर बर्फ़ सकाळच्या अल्लड उन्हात लखकन चमकताना दिसायला लागतो. आणि मग एक दिवस नीरव शांततेत कुणीतरी सहज व्हायोलिनचे एकाकी सूर छेडावेत तसा बर्फ़ पडायला लागतो. ओस पडलेल्या रस्त्यांवरून क्वचित एखादी गाडी वाट मळवत निघून जाते. मग फक्त बर्फ़ाच्या शुभ्र म्हाता-या हवेत भिरभिरत रहातात.

गोलमाल है भाई सब गोलमाल है..

लेखक रामदास यांनी गुरुवार, 07/01/2010 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख :२००३ सालच्या फेब्रुवारी महिन्याची. स्थळ :ठाण्याजवळची एक नविन सोसायटी. दुसर्‍या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये चार माणसं .तीन पुरुष .एक स्त्री. एका पुरुषाला बेडरुममध्ये पलंगावर बांधून ठेवलेलं आहे. त्याच्या तोंडात बोळा कोंबून ठेवला आहे. स्त्री बहुधा नर्स असावी.पण पूर्णशिक्षीत नसावी. पलंगावर बांधून ठेवलेल्या माणसाच्या लक्षात आलं आहे की हे त्याचे शेवटचे काही श्वास आहेत. एकदा निकराचा प्रयत्न करून तो स्वत:ला सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. त्या बाईच्या हातात एक सिरींज .त्यात पोटॅशियम क्लोराईड.

अंत:स्थ

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 05/01/2010 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
एकविसावे शतक शेती आणि शेतक-यांसाठी, अनेक संकटे घेऊन आले. दुष्काळ, वीज, महागाई, व्यवस्थेतील धर्म, जात, भाषा, उद्योग, लोकशाही, माणूसपण, हे आणि असे कितीतरी प्रश्न आणि त्याची संदिग्ध उत्तरे याची आकडेमोड करत बसलो तर केवळ निराशा वाट्याला येते. माणूस हताश होतो. वर्तमानातील या सर्व वास्तवाला सामोरे जात संवेदनशील माणूस कुठेतरी व्यक्त होत असतो. अशाच एका व्यक्त होणा-या कवीची ओळख करुन द्यावीशी वाटते आणि हा कवीमाणूस आहे, डॉ.सर्जेराव जिगे.

द्विधा

लेखक गिरिजा यांनी शनिवार, 02/01/2010 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक) "मग आता तुझं शिक्षण संपल्यावर काय करणार तू?" "काय म्हणजे काय? करेन जॉब नाहीतर पुढे शिकेन अजून.." "काय पण म्हणजे?" "बघू गं.. हे होऊ देत आधी.. तोवर ठरवेन मी.." ------------------------------------------------------------------------------------------------ "जॉब ना.. मला काही फरक पडत नाही फारसा.. पुण्यात मिळालं काय किंवा बाहेर जावं लागलं काय.. माझी तयारी आहे.. जोवर भारत सोडवा लागत नाहीये" "हम्म.. मला माहितीये.. तुला पुण्याबाहेरचा का चालणारे ते.." "अस्सं?" "हम्म.. म्हणजे मग आत्याची भुणभुण नाही तुझ्यामागे लग्न कर लग्न कर.." "हा! well.. that is like an additional thing..