मज सांग लक्ष्मणा तुज पाहू किती!
जेपी यांची 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा' ही लेखमाला वाचल्यावर सतत क्रिकेटवर काहीतरी लिहीण्याची खुमखुमी होत होती. आणि त्यात काल वीरू व सचिननं तर आज लक्ष्मण व धोनीनं शतकं झळकावून आयताच विषय पुढ्यात ठेवला!
क्रिकेटवरचं लिखाण म्हणजे साहेबांचा उल्लेख हा आलाच! आमच्यासाठी ईशस्तवनच ते!
साहेबांवर कितीही लिहीलं तरीही कमीच..
"निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू॥
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी॥" हे शब्द आपल्या साहेबांच्या बाबतीतही लागू पडतात. गेली अडीच वर्षं तो उत्तम क्रिकेट खेळतोय आणि टीकाकारांना त्यानं दिलेलं सडेतोड उत्तर आहे हे! एकामागून एक धावांचे आणि शतकांचे मैलाचे दगड ओलांडत चाललाय..
मिसळपाव