असेच मनात आले...
रात्री टि.व्ही समोर बसुन जेवत असताना 'ब्रेकिंग न्युज' ही पाटी बघितली, 'सुनीता देशपांडे यांचे निधन'. हातातला घास गळ्यातल्या आवंढ्या बरोबर तसाच ढकलला. वाटलं. प्रत्येक घरातला 'नारायण',वर्तमानात असुन देखील भुतकाळात जगणारे 'हरितात्या', कोकणातला 'अंतु बर्वा' ही आणि अशी बरीच मंडळी आज खरोखर पोरकी
झाली.
जेव्हा पासून कॉमिक्स सोडून कादंबरी हा फक्त मोठ्यांसाठी असणारा प्रकार वाचू लागलो तेव्हा प्रथम हात लावलेली ' व्यक्ती आणि वल्ली ' ही एक.
मिसळपाव