Skip to main content

विचार

अरुंधती !!

लेखक अनिल हटेला यांनी मंगळवार, 19/10/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स !! गेले २-३ दिवस गणपाभै नी टाकलेल्या भयपटा च्या धाग्यावर वेगवेगळे प्रतीसाद वाचले.अजुनही धागा पहील्या पानावरच आहे.आलेले सारे प्रतीसाद हा लेख लिहुन (हो ! हो !

दिवाळी अंक

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 19/10/2010 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे नाना चौपाटीवरची गंमत पाहुन निघाला. रस्त्यातुन परा धावत आला आणि "नाना ! नाना ! " हाका मारुन थांबायला सांगु लागला. "काय रे ? काय झाले ?" "काही नाही रे ! हे बघ आज क्याफेत पाचशेचा धंदा झाला. चल दिवाळी अंक आणु विकत ... चार पाच तर सहज मिळतील" "फक्त चार पाच... साला तु मराठी माणुस कधी सुधरणार नाहीस... अरे जुगाड करायला कधी शिकणार?" "जुगाड? आणि तो कसा? च्यायला शंभर शंभर रुपये तर आहेच किंमत... डिस्काउंट देवुन देवुन किती देणार?" "तुला नाही कळणार.. मी सांगतो तसे कर... चल जरा तिथे बसु निवांत आणि सांगतो..

झोप.

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 18/10/2010 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, झोप. निसर्गाने सर्व प्राण्यांना दिलेलं एक वरदानच म्हणता येईल. झोप घेण्याने थकवा आणि शरिराची झीज भरुन येते. झोप किती तासांची असावी, कधी झोपावे कधी उठावे याबाबत बरेचसे युक्तीवादपण होत असतात. पण या झोपेचे खरं तर एक रहस्यच आहे. झोपेत माणुस कसा असतो हे त्याला कधीच कळत नाही. खरं तर झोप म्हणजे मेल्यानंतर जी अवस्था होत असावी तीच असं माझं मत आहे. असो, तर या झोपेचेही व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणीप्रमाणे प्रकार आहेत. यावरुन गमतीजमतीही बर्‍याच होताना दिसतात. दिवसा झोपणे आणि रात्री झोप न येणे आणि दुसर्‍या दिवशे ऑफिसात झोप येणे हा एक जगभर पहायला मिळणारा प्रकार आहे.

दसरा मेळावा

लेखक वेताळ यांनी सोमवार, 18/10/2010 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मुंबईत दसरा मेळावा पार पडला.काही लोकाना तो तमाशा वाटला त्याबद्दल वाईट वाटले.बर असो,परत एकदा आपल्या लाडक्या साहेबानी शिवसैनिकाना नवा विचार व नवा नेता दिला.तो नवा विचार कोणता हे खर्‍या शिवसैनिकाला पुढच्या दसर्‍या पर्यंतदेखिल कळत नाही हे एक दसर्‍या मेळाव्याचे विशेष असते.साहेबाची प्रत्येक दसर्‍या मेळाव्याला कुठेना कुठे भगवा फडकवण्याची इच्छा असते,ह्या मेळाव्याला त्यानी एकदम साधी डोंबिवलीत झेंडा फडकवण्याची इच्छा व्यक्त केली.

आमचे तंत्रज्ञान प्रेम - सॉफ्टवेअर विभाग

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 18/10/2010 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार...... तंत्रज्ञान म्हणजे एक मित्र जो आपल्याकडुन कसलीच अपेक्षा न ठेवता आपल्याला आनंद देत राहतो.आपण दु:खी असु ,नाराज असु तरी तो स्वःता आपले कार्य अविरतपणे पार पाडतो,आपल्या निराश मनाला दीलासा देत,थंड फुंकर मारत.(बस,बस झाल!!) असो, तर आज आम्ही(?) आमचे तंत्रज्ञानावर असणारे प्रेम 'सॉफ्टवेअर' ह्या त्याच तंत्रज्ञानाचा भाग असणा-या संकल्पनेतुन दाखवु ईच्छीत आहोत.'सॉफ्टवेअर्स' जी आमच्या मनावर राज्य करतात्,त्यांची महीमा(?) गाणार आहोत. नोंद :१) आमचे संगणक्,हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्याबाबतचे ज्ञान म्हणजे बालवाडीतल्या पोराला जेवढे 'न्युटन्स थेअरी ऑफ रीलेटीव्हीटी' मधले समजते,तेवढेच असल्याने खाल

निवडक सुविचार संग्रह

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 16/10/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
* अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे. तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव! * लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म! * एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच! एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही. * पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल. * एखाद्या कृतीमध्ये पाप नसते.

प्रेमाचा चौकोन

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 15/10/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
एक हिन्दी शेर आहे. कदाचित तुला माहीत असेल. - मोहब्बत का सफर है, पता मंझिलसे पुछो.. उनकी बात छोडो, तुम अपने दिलसे पुछो। म्हणजे तुझ्या प्रेमाखातर कोणीही उठून काहीही म्हणेल, तुझ्या मनात कोणती मंझिल दडलेली आहे ते महत्वाचे. अन् तेच तू जाणून घ्यायला हवं. हे प्रेमज्ञान पाजळण्याचं कारण हेच की तुझ्या प्रेमासाठी तुझ्याभोवती प्रेमाचा त्रिकोण नाही तर चौकोन झाला आहे! वरील डाव्या बाजूच्या कोनात तुझे स्थान गृहीत धरले तर इतर तीन कोन म्हणजे गणेश, सचिन व सुशील हे होत. मुळात प्रेमाचा हा चौकोन असल्याने कोणीतरी एकच फार नजिक येणारा आहे. जर चौरस कल्पिला असता तर तिघेही तुजपासून समसमान अंतरावर राहिले असते.