Skip to main content

विचार

भारतातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था: एक बट्ट्याबोळ

लेखक प्रमोद सावंत१ यांनी गुरुवार, 11/11/2010 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणपध्दतीचा विचार करता देशाची साक्षरता आकडेवारीत वाढवण्यावर आपण भर देतो. पण माध्यमिक शाळांतून विद्यार्थांची होणारी गळती ही आपली खरी समस्या आहे. गावात तर ही समस्या अतिशय जास्त आहे. भारतातील साडेसहा लाख खेड्यांमध्ये जवळजवळ सर्वत्र पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पण आठवीपर्यंत शिक्षण देणा-या फक्त सवादोन लाख व मॅट्रीकपर्यंत शिक्षण देणा-या शाळा , तर दीड लाखांहून कमी आहेत. ही सरकारी आकडेवारी झाली . शाळा आहे म्हणजे तेथे शिक्षक,फळा,छत असलेली ईमारत,पटांगण इत्यादी सुविधा आहेत, असा गोड गैरसमज करुन घेणे चुकीचे होईल.

विड्या एक फुंकणे

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 11/11/2010 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
( विनायक पाचलग यांचा स्मृतीरंजनात्मक लेख वाचून आमच्याही काही बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या) आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळांएवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन आधुनिकता कशी वाईटच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते.

तीन वेगळेच अनुभव!!

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 10/11/2010 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा मी घराबाहेर पडले, तेव्हा मला घराचा अर्थ समजला. जेव्हा मी मित्रांबाहेर पडले तेव्हा मला, मैत्रीचा अर्थ समजला. जेव्हा मी शहराबाहेर पडले तेव्हा मला, ओळखीच्या रस्त्यांचा अर्थ समजला. जेव्हा मी राज्याबाहेर पडले तेव्हा मला, भाषेचा अर्थ समजला. जेव्हा मी देशाबाहेर पडले तेव्हा मला, देशप्रेमाचा अर्थ समजला. जेव्हा मी मृत्युबाहेर पडले तेव्हा मला, जीवनाचा अर्थ समजला. पण मी जेव्हा स्वतःच्या बाहेर पडले तेव्हा सुद्धा मला जातीचा अर्थ समजला नाही.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे झालेले 'पानीपत' व त्याचा भारतावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 09/11/2010 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे झालेले 'पानीपत' व त्याचा भारतावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला विरोधी लोकमताचा जबरदस्त फटका बसला, त्या पक्षाचे अगदी 'पानीपत'च झाले असे म्हणायला हरकत नाहीं. त्या पक्षाचे प्रतिनिधीगृहातील बहुमत तर संपुष्टातच आले व सिनेटमधे जवळ-जवळ ६० टक्के जागा ज्या पक्षाकडे होत्या त्यांची संख्या ५३-५४ टक्क्यावर आली. नवनिर्वाचित राज्यपालांच्या संख्येतही डेमोक्रॅटिक पक्षाला कमी जागा मिळाल्या. हे सर्व कां झाले हे मला कळत नाहीं आणि ते समजून घेण्याचा हा प्रयत्न.

सहज सुचलं म्हणून.......

लेखक अनिल आपटे यांनी सोमवार, 08/11/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द दुय्यम आहेत विचार महत्वाचा त्यामुळे आपण काय विचार करतो या कडे बारकाईने लक्ष द्या - स्वामी विवेकानंद आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला विचार करायला फुरसतच कुठे आहे? आणि विचार करत बसला तर आलेली संधी हुकण्याची शक्यता अधिक पण त्यामुळे अविचाराने केलेल्या गोष्टींचा त्याला कधी कधी मनस्ताप हि फार होतो किंबहुना एखादीच गोष्ट यशस्वी झालेली आढळते. त्यामुळे विचारपूर्वक केलेली कृती हि निश्चितच फलदायी ठरते.

पिम्पळ्पान

लेखक जयदेव यांनी शनिवार, 06/11/2010 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीन्चा उमाळा दाटून आला की मन गहिवरते आणि चक्षू आसवान्ना वाट मोकळी करुन देतात. कोरड्या ओठाण्वरुन जिभ फिरवतान्ना आसवान्ची खारट चव कळताच मन अजुनच हळवे होते. डोळ्यात तरन्गणार्‍या त्या आसवान्च्या पाझरामुळे वर्तमान धूसर होवून सयीची साय मेन्दूत घट्ट होत जाते. मनचक्षू स्वैर होतात नी अन्तर्मनाचा ताबा घेवून हृदयाला आक्रोशाच्या खाईत लोटतात. हॄदयाची स्पन्दने वाढतात की ते निपचीत होतात हे कळायच्या आतच एक पिम्पळपान डोक्यावर पडते आणि आठवणीने ताणलेल्या मनपतन्गाच्या दोर्‍याला थोडी ढिल मिळते.

मराठी संकेतस्थळे व दिवाळी अंक

लेखक दशानन यांनी शनिवार, 06/11/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी वाचक विविधता असलेल्या लेखाकरता आतुरतेने दिवाळी अंकाची वाट पाहत असे, पण हळूहळू नवनवीन बदल झाले व युनिकोडचा शोध लागला, मायबोलीने एका विदेशी भाषेचे, भरलेल्या, दाटीवाटी असलेल्या जंगलात, एक मराठीचे रोपटं लावलं व हळू हळू मराठी भाषेचे बीज चांगलेच फोफावले. प्रत्येकाच्या मनात दडून बसलेला लेखक ह्या युनिकोडचा आधार घेऊन आपली लेखणी पाजळू लागला, व त्यांची ही भुक पुर्ण करण्यासाठी नवनवीन मराठी संकेतस्थळे निर्माण होत गेली, काही रुजली, काही फोफावली तर काही काळाच्या ओघात वाळून बेचिराख झाली, पण जी बेचिराख झाली त्यांनी देखील जाता जाता, नवीन रोपट्यांना खतं म्हणून आपल्या संकल्पना दिल्या.