Skip to main content

विचार

सावधानतेचा इशारा

लेखक प्रमोद सावंत१ यांनी शुक्रवार, 05/11/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोळशाचा उपयोग मागच्या तीन दशकांत तिप्पट झाला आहे. तो येत्या दशकात आजच्या तुलनेत दुप्पट होईल. आपली ऊर्जेची गरज २०३० सालापर्यंत आजच्या तुलनेत त्यात कोळशापासून होणा-या ऊर्जेचा सर्वात मोठा भाग असेल. कोळश्यामुळे वातावरणात कार्बन-डाय ऑक्साईड पसरतो, प्रदूषण वाढते. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढते व त्याचे परिणाम विशेषतः हवामानावर होतात. येणा-या शतकात पर्जन्यवृष्टी नियमबध्द होणार नाही. नद्या व तलाव धोक्यात येतील, पाण्याची समस्या वाटेल. शिवाय नद्यांच्या प्रत्यक्ष प्रदुषणांमुळे त्यांची स्थिती बिकट होईल.

किल्ला - एक करणे

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 04/11/2010 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळाऐवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन संगणकीय खेळ त्रासदायकच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते. आणि खरे आहे ते ..! पण, निदान दिवाळीच्या सुट्टीत तरी हा प्रश्न मला कधी पडायचाच नाही, का म्हणता? अहो किल्ला ...... आमचा जीव की प्राण .

भ्रष्टाचार हाच शिष्टाचार

लेखक प्रमोद सावंत१ यांनी गुरुवार, 04/11/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपण पिळवणूकीच्या अर्थकारणात बांधलो गेलो आहोत, तेथून जेव्हा सर्वांची सुटका होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र होईल. पिळवणुकीचे अर्थकारण राज्यकर्त्यांपासून सुरु होते. पोलिस, आयकर, अबकारी, कर, सीमाशुल्क आदी विभागात ठराविक जागी बदली होण्यासाठी लाखॊ रूपयांची राज्यकर्त्यांना लाच दिली जाते. जो पोलिस अधिकारी अथवा आयकर आधिकारी एवढा खर्च करतो, त्याला त्याची वसुली करायची असते. त्यातूनच भ्रष्टाचाराचा उगम होतो. समाजाच्या वरच्या मजल्यावरून सुरू झालेला भ्रष्टाचार हळूहळू खाली पसरतो. जेव्हा सामान्य नागरिकांचा सरकारी यंत्रणेशी संबंध येतो तेव्हा प्रत्येक कागदासाठी त्याला किंमत मोजावी लागते.

मनातल

लेखक प्रभा यांनी मंगळवार, 02/11/2010 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा झाला आणि बघता बघता दिवाळी समोर येऊन ऊभी राहिली. घराची आवराआवरी, साफ़सफ़ाई करताना मुख्य ऎवज असतो घरातील रद्दी! आजकाल मुख्य पेपर + त्याच्या खंडीभर पुरवण्या यांनी बघता बघता रद्दीचा डोंगर होतो. रद्दी आवरताना पुन्हा एकदा नजरेखालून पेपर जातातच. नवरात्राच्या नऊ दिवसातील पेपर व त्यांच्या पुरवण्यांमध्ये सर्वत्र वेगवेगळ्या मंडळांच्या देवींची चित्रे, फ़ोटो व त्यांची वर्णने असतात. हे वाचून खूप चांगले वाटते म्हणूनच टाकून मात्र देववत नाही. पण त्या पेपरांचा काही उपयोगही करता येत नाही. कारण ते वापरणार कसे? कपाटात खाली कसे घालणार? फ़राळाच्या डब्यात कसे काय देवीला खाली घालणार?

बॉडी डबल

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 30/10/2010 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडी डबल हा शब्द पहिल्यांदा वाचनात आला तेव्हा माझ्यासारखे जे बोडीने डबल आहेत त्यांच्यासाठी हा शब्द वापरत असावेत असा माझा ग्रह झाला होता. मंदाकिनिचा कुठलातरी चित्रपट होता आणि मित्राने सांगितले बॉडी डबल आहे. मी असले चित्रपट का बघतो असे विचारु नका. असाही हा प्रश्न विचारायचा हक्क फक्त असले चित्रपट न बघितलेल्या लोकांना आहे. (हे अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना की मोत्यांना हात लावायचा हक्क फक्त वारा न सरलेल्या माणसांना आहे त्या धर्तीवर वाचावे) अस्मादिक बराच काळ विचारात पडले होते की मंदाकिनी काही इतकी डबल नाही आहे.

पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ का सुरू झाला नाहीं?

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 27/10/2010 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
कॅनडाच्या क्यूबेक या राज्याची राजधानी "माँट्रियल" येथून प्रसिद्ध होणार्‍या "ला प्रेस" या वृत्तपत्रातील श्री. पॅट्रिस लागासे यांनी लिहिलेला एक सुरेख लेख अलीकडेच माझ्या वाचनात आला. हा सुरेख लेख मूळ इंग्रजीत वाचावा अशी मी सर्व 'मिपा'करांना सुचवू इच्छितो.. [मूळ लेख http://grendelreport.posterous.com/pakistan-by-patrice-lagace-la-presse… या दुव्यावर वाचता येईल.

भाषिक संपत्ती

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 26/10/2010 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषिक संपत्ती - लहानपणापासुन आवडता असलेल्या विषयावर लिहायला घ्यावे असा विचार केला त्यावेळेस याहुन जास्त समर्पक शीर्षक नाही सुचले. सध्या शिव्या (किंवा मराठीत ज्याला आपण स्लँग म्हणतो) मर्दानगीचे प्रतिक आहेत असे मौलिक ज्ञान मला नुकतेच मिळाले आहे. त्यामुळे या संपत्तीचे मोलही प्रचंड वाढले आहे. असे म्हणतात की कुठल्याही भाषेवर प्रभुत्व मिळवायचे असेल तर प्रथम त्या भाषेतल्या शिव्या शिकुन घ्याव्यात. आमच्यासाठी ही प्रक्रिया फार लवकर सुरु झाली. मायबोलीतल्या काही "मर्दानी" शब्दांवर आम्ही खुप लवकर प्रभुत्व मिळवले. कोल्हापुरात असताना (माझा लेख सुपरहिट्ट होणार.

हस्ताक्षर.........

लेखक स्पा यांनी रविवार, 24/10/2010 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आई बारशाला चाललेली कोणाच्यातरी.......... पैशाचं पाकीट भरून झाल्यावर तिने मला हक मारून सांगितलं, "प्रसन्न अरे जरा नाव टाक रे पाकिटावर " (मी मिपा वर पडीक असल्याने समाधी भंग झाल्यागत चरफडत उठलो :( ) "दे पेन ...... काय तू पण ..... साधं नाव नाही टाकता येत?" ------------------ इति मी . नाही अरे , इतकं सुंदर अक्षर आहे तुझं. तूच टाक ना...(आई पण ना "मस्का " मारण्यात expert आहे ) मी वैतागून पेन हातात घेतलं आणि लिहायला सुरुवात केली ,आणि बापरे ...."tube " पेटली , आपण किती दिवसानंतर मराठी लिहितोय ... कारण हल्ली पेन सह्या करण्यापुरत लागतं...

आता करा कथा....

लेखक अथांग यांनी शनिवार, 23/10/2010 04:33 या दिवशी प्रकाशित केले.
रेच दिवस पाळत ठेवून असलेल्या घरात, आज शेवटी चोरी करण्याचा निर्णय खंडुने घेतला. घरातील तरुण मंडळी सुट्टीसाठी बाहेरगावी गेल्याचे त्याच्या हेरांनी त्याला सांगितले. आता घरात केवळ म्हातारे आजोबा. म्हणजे थोडक्यात काम फत्ते ! उच्च मध्यमवर्गीय वस्तीमधल्या ३ बेडरुम च्या घरात कुठल्या कीमती वस्तुंवर डल्ला मारता येईल याची खंडुची मनातल्या मनात उजळणी देखील करुन झाली. त्या दृष्टीने हत्यारे (टुल्स) ची जमवाजमव सुद्धा झाली. सगळ्या गोष्टी छान जुळून आल्याबद्दल त्याने मनोमन समाधानही व्यक्त केले. 'इंतजार का फल मीठा ही होता है' अशी वाक्ये आठवून खूश सुद्धा झाला.