Skip to main content

विचार

एका चित्रकाराच्या आठवणी...

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 13/04/2012 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीच्या काही आठवणी : मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी : http://misalpav.com/node/18587 आमचे सक्सेना सर त्यांच्या तरुणपणी सहा महिने मांडूगडावर (मांडवचा किल्ला) जाउन राहिले होते, त्यांची त्याकाळची तिथली अद्भुत निसर्गचित्रे आजही मला आठवतात. ती बघून आम्ही तीन मित्रांनी मांडवला जायचे ठरवले. छप्पन मैलांचा प्रवास सायकलने सहज पार पडला. वाटेत खेडूत वा आदिवासींचे घोळके दिसले, की थांबून स्केचेस करायचो (सुमारे १९७० साली) रात्रीच्या सुमारास मांडव ला पोचल्यावर तिथल्या राम मंदिराच्या ओट्यावर झोपी गेलो....

सामान्य झालेल्या " असामान्य" गोष्टी.....

लेखक स्वप्नाळू यांनी शुक्रवार, 13/04/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी अशा अनेक गोष्टी होत्या ज्या सहज मिळायच्या नाहीत आणि आता मात्र नाक्यानाक्यावर मिळतात. पण तो लहानपणी चा अनुभव खूप nostalgic करून जातो. तूम्ही पण अशा गोष्टी शेअर कराव्यात हि विनंती. १. लहानपणी अजोळी तुळजापूर ला गेल्यावर खूपदा " गारेगार खाल्ले होते. गारेगार म्हणजे बर्फाचा गोळा. एकतर तिथे प्रचंड उन असायचे, वीजेचा पत्ता नव्हता. उकाड्याने जीव हैराण व्हायचा. अशातच लांबून गारेगारच्या गाडीची घंटा वाजायची आणि "गारेगार" अशी आरोळी ऐकू यायची. मग आम्ही मावस आणि मामे भावंडे ग्लास घेऊन पळत सुटायचो. हो कारण एक थेंब पण जमिनीवर सांडणे म्हणजे पाप होते. एक रुपयात दिवसभरात ५-६ वेळा गारेगार खाउन व्हायचे.

खस्स्स्स्स् स्स्कन्..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात खस्स्स्स्स् स्स्कन् चादर ओढल्याचा भास झाला... कोणाचतरी कारटं चादरीवर पसारलं असणार... डोळ्यात धगधगीत आग आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... दारात उघड्यावर झोपलो होतो म्हणून त्या नुसत्या मनातच बरळल्या.. पुन्हा पुन्हा तिडीक उठवणारा तोच चादर ओढल्याचा भास... कोण तडमडतोय रे चादरेवर... मरतोय नुसता **चा.. असशिल कोणाचा लाडाचा कारटा म्हणून झोपेचं खोबर का करतोय.. वात्रट मेलं नालायक कारटं कुणाच... तोंडावरची चादर सारुन हळूच डोकावून बघितल तर ते गल्लीतल शेफारलेलं कुत्र होतं... मग मी त्याच्या कंबरट्यात कच्चकन लाथ मारुन गप गुमान मुस्कटून झोपलो... (आमचे प्रेरणास्थान फस्स्स्स्स्स्स्कन् ;) )

भस्सकन् ..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या बाजुने भस्सकन् किंकाळींचा आवाज कानात घुसला... कोणाच्या तरी मोबाईलवार्ता चालू असणार.. कानात धडाधडा कंपनं आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... सवयीने तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या तोंडातच फडाफडा वाजल्या... पुन्हा पुन्हा कानात घुसणारा कचाकचा आवाज.. कोण साला घुसतोय टाळक्यात... नडतोय खालीपिली **चा.. काळ्या पैशाची पैदास सोडलेली ही... मान वळवून मागे बघितलं तर ती माझीच सौ फोनवर होती... मग मी गपगुमान हातातील शॉपिंग बॅगा सांभाळत चालू लागलो..!!!!

मूलींची गरज नाहीये का?

लेखक स्वप्नाळू यांनी गुरुवार, 12/04/2012 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर एवढया टोकाचं बोलायचे नव्हते. पण एवढी टोकाची परिस्थिती नसली तरी परिस्थिती विशेष बदलली पण नाहिये. मधे मिपावर एक लेख वाचला होता - " पूरुषांची गरज काय" असा काहिसा विषय होता. पण सध्या ज्या बातम्या येत आहेत, त्यावरून मूलींची ग र ज नाहिये कि काय असा प्रश्न मनात येतो. बँगलोर सारख्या शहरात काल एका केवळ ३ महिने वयाच्या मूलीचा -' आफ्रिन'चा तिच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीमूळे म्रुत्यू झाला. कारण का तर बापाला मूलगा अपेक्षित असताना मूलगी जन्माला आली. त्या एवढ्याशा जीवाचा काय अपराध असेल बर ? मागील वर्षी सांगली मधे एका डॉ.

नस्त्या उचापती

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली असल्याने मी घरात एकटाच पडलो होतो आणि त्यामुळेच घरातील 'स्व' जेवणाची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझ्यावर पडली होती. तसा मी भात अगदी मस्त करतो (एकट्यापुरताच) परंतु रोज रोज भात खाण्यापेक्षा आज जरा वेगळं करुया असे वाटले. पण वेगळ म्हणजे नेमक काय करायच? कारण ऑम्लेट- भाताच्या पुढे माझी कधीच उडी गेली नव्हती; नव्हे तसं धाडसच मी कधी केलं नव्हत. (त्यात आळस हा घटकही किंचितसा कारणीभूत होताच!) पण आज मात्र काहीतरी असं धाडसी कृत्य करावच अस मनापासून वाटू लागल होतं.

भळ्ळकन ..

लेखक गवि यांनी बुधवार, 11/04/2012 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
रीअर व्यू मिरर मधून भळ्ळकन प्रकाश डोळ्यात घुसला.. कोणाचा तरी हॅलोजनवाला हेडलाईट असणार.. डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा डोळ्यात घुसणारा लखलखता पारा.. कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. दिवसाच्या वेळेला हॅलोजन लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो सूर्य होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(पूर्वप्रकाशित)

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/04/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.