Skip to main content

विचार

उपासाचा किस...(घेतला का कधी?)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 07/05/2012 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ मनाशी मी हाच विचार करत होतो की उपासाला नेमका हा किस कसा चालतो..? उपासाला जड असे काहिच खायचे नसते..म्हणे! मग हे कसे चालते..? बारश्याला तेराव्याचे गाणे? खिचडी काय..नी..किस काय? हलके थोडेच असतात..होय? माणसे कशी शोधुन काढतात उपवासालाच सुखाची सोय? उपवसाला शास्त्रात म्हणे निराहार ही संज्ञा आहे पण लोक केवढा किस काढतात की पाहुन वाटतं..काय हे..? खिचडी काय...नी थालपिठं काय सगळं जडच खातात तर काहि दुसरं टोक गाठणारे पाणी पिऊन उपाशी रहातात. तुंम्ही म्हणाल,जाऊ द्या हो... ज्याची त्याची अवड..! मी म्हणतो,,बा धर्मा.. आता तुझ्या अस्थी सावड धर्म ही अफूची गोळी हे वचन आज मला पटलं आणी त्यांना

माझे ब्रह्मज्ञान

लेखक यकु यांनी शनिवार, 28/04/2012 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
यातल्या प्रत्येक वाक्यावर मी खळखळून हसलो आहे. मानसिक स्वास्थ्‍य बिघडले काय त्याच्या फुकट तपासण्या करणार्‍या लिंक कृपया देऊ नयेत. ;-) म्हणजे हे कष्‍ट वाचवण्यासाठीच. :) एव्हरीथिंग इज ओके. :p ------------------------------------- मी कोण आहे? तुम्ही कोण आहात? हे कोण आहेत, ते कोण आहेत मग परमात्मा कुठे आहे? आपण कोण आहोत? ब्रह्म सत्य आहे. आपण मिथ्‍या आहोत काय? जग हे सत्य आहे. सत्य हे शिव आहे, सुंदर कोण आहे? सत्यम् शिवम् सुंदरम् .. राधामोहन शरणम्. मोहन हा परमात्मा आहे काय? राधा कोण आहे? हे सर्व काय आहे? मग परमात्मा कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? मी कुठे आहे?

असेच काही, अवती- भवती...!

लेखक वेणू यांनी गुरुवार, 26/04/2012 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
अपयश झेलायला काही क्षण पुरतात, तर पेलायला सबंध आयुष्य! महत्वाकांक्षांचे अपयश एकवेळ पचतेही, पण नात्यांनी कच खाल्ली, की सावरणारे हातच दुबळे पडतात... तिथे 'आपलं' काही उरत नाही 'तुझं-माझं' नावाचा एक विचित्र प्रवास सुरू होतो! आणि हळूहळू, वाटाच निर्णय घेऊन टाकतात, विरुद्ध निघून जाण्याचा! दोन प्रवासी- वेगळ्या वाटा, हुरहूर मात्र आत जपलेली.. ही खाल्लेली कच, रुतणारा सल आणि लागलेली हुरहूर, मनात घर करून राहते, नि त्या घरावर अपयशाचा झेंडा!! आता स्वतःला समजवण्याचे अनेक नवे मार्ग, नवी कारणे, समर्थनाचे लाखो उपाय! जोडलेली मनं तुटणं, ती दूर होणं, आयुष्याचे सुंदर- नाराजीचे, तर कधी संमिश्र क्षण ज्यासोबत अनुभ

पाऊली यांचा वगळ सिद्धांत

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 25/04/2012 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊली यांचा वगळ सिद्धांत (अर्थात पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल) त्या काळी एन्रिको फर्मी, वुल्फगँग पाऊली ह्या ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञाच्या, अलीकडील एका संशोधनाबाबत विचार करत होते. पाऊली एकेकाळी मॅक्स बॉर्न ह्यांचे सहकारी होते. केंद्रकाभोवती फिरणाऱ्या आण्विक विजकांच्या हालचालींचा अभ्यास करत असतांना, पाऊलींनी असे निरीक्षण केलेले होते की, एका कक्षेत केवळ एकच विजक असतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कुठलेही दोन विजक एकाच कक्षेचा अवलंब करत नाहीत. फर्मींना हे समजले की, ही घटना प्रत्येक अणूत, याआधी लक्षात न आलेली आणखी एखादी व्यवस्था अस्तित्वात असल्याचे सूचित करत आहे.

सांग सांग भोलानाथ...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 22/04/2012 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्केटयार्डातुन फुलं घेऊन परत येताना,डोस्क्यावरच्या उन्हानी आणी आधी मार्केटमधे याच उन्हाळ्यामुळे फुलांच्या अव्वाच्यास्सव्वा वाढलेल्या रेटनी चांगलाच तापलो होतो.साली आंम्ही कायमची गिर्‍हाइकं असुनही अतिमहाग किमतीनी अती पडिक माल उचलायची वेळ आली की हे असच होतं.बाहेर पार्किंगकडे येऊन आमच्या न्हेमीच्या हाटिलवर गेलो.तर आज तेही काही अ-परिहार्य कारणानी बंद...! म्हणुन दुसरी टपरी गाठली आणी तिथे चहा देणार्‍या पोर्‍यानी सक्काळीच घातलेल्या इस्त्रीच्या शर्टवर चहा सांडवला.मग त्याच्या मालकाच्या शिव्या उघड आणी माझ्या मनात देऊन झाल्या.आज आपला दिवस नाही.असं मनाशी पुटपुटत गाडी काढली आणी कुठेतरी निरा मा

भंकस

लेखक यकु यांनी शनिवार, 21/04/2012 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे तसं काही नाही विशेष लिहिण्‍यासारखं. च्यायला एवढी चांगली सुट्टी असून आज ऑफिसात येऊन बसावं लागलंय. मग आम्ही दुसरीकडे कुठे जाणार? इथेही आलो तर काय ते लोक नेहमीप्रमाणे एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसलेले. जरा म्हणून मोकळ्या ढाकळ्या गप्पा मारायची सोय नाही. त्यातून मला आजकाल मिपावर ''असहमत'' असा आयडी घ्‍यावा वाटतोय. आता हे मध्‍येच कुठं आलं? पण हे असंच. आजकाल सगळी जिंदगीच बोगस झाली आहे. हे म्हणजे नेहमी सुचणारं वाक्य. त्यातून ती कोसला आणि बायॉलॉजी ऑफ एन्लायटन्मेंट, कंम्प्लीट शेरलॉक होम्स कॉटवर पडलेले असते आणि आजकाल लॅपटॉप बंद! मग आम्ही यातलंच कुठलंतरी पुस्तक उचकणार आणि सकाळचे साडेचार वाजवणार.

''मसाला'' म(स्ट)स्त आहे...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 21/04/2012 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मसाल्या'ची मी तर प्रोमोज पाहिल्या पासुन वाट बघत होतो. वासही चांगला खमंग येत होता.आणी कारखान्याचा अंदाज असल्यानी तो खमंग असणार इतकं मनाशी पक्कं झालेलं होतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिनुमा बघत असताना त्यात पुर्ण हरवायचा आनंद घेता आला. गिरिश कुलकर्णि. आणी अमृता सुभाष एक गरिब जोडपं अतिशय कष्टाळुपणा हा अंगिभूत गुण असलेलं,हे जोडपं हीच चित्रपटाची मध्यवर्ती भुमिका आहे.

आय आय टी रामैय्या

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी मंगळवार, 17/04/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस.