Skip to main content

विचार

गप्पा युजींशी

लेखक यकु यांनी रविवार, 25/03/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
युजी कृष्‍णमूर्तींची ओळख इथल्या बहुतेक लोक

"अखेरचे निवेदन" (हुतात्मा भगतसिंग यांचा पंजाब राज्यपालांस 'मृत्यु अर्ज')

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 23/03/2012 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २३ मार्च. हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांचा ८१ वा हौतात्म्यदिन. या महान क्रांतिकारकांना त्यांच्या हौतात्म्यदिनी सादर वंदन. 'तुम्ही केलेल्या हिंसेबद्दल पश्चात्ताप व्यक्त करा, आम्ही तुमच्यासाठी रदबदलीचा प्रयत्न करू' अशा प्रस्थापित नेत्यांच्या देकाराला उत्तर म्हणुन हुतात्मा भगतसिंग यांनी पंजाबच्या राज्यपालांना दिलेल्या 'मृत्यु अर्जाचे' हे मराठी भाषांतर. प्रति, मा.

वरदान

लेखक अमृत यांनी गुरुवार, 22/03/2012 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्यावेळी घरी गेलो तेव्हा लहान भावाला मोबाईलवर मित्रांशी संवाद साधताना बघून खूप खूप आनंद झाला. तोपर्यंत मित्रांना केवळ एसएमएस करूनच समाधान मानवं लागण्यामूळे खट्टू होणारा तो आणि आता ३जी च्या माध्यमातून मित्रांशी गप्पा मारणारा, तो हाच काय यावर सांगून सुद्धा विश्वास बसला नसता. आधीच मर्यादीत शब्दसाठा त्यातच भाषेचे पूर्ण ज्ञान नसल्याने होणार्‍या चूका यामूळे कित्तेक वेळातर मलासूद्धा त्याचे मॅसेजेस कळत नसत. मग तो काय सांगायचा प्रयत्न करतो आहे हे आशयावरून समजावे लागे. आई-बाबांशी मी फोनवर बोलताना तो तीथे उभा राही व केवळ चेहर्‍याच्या हावभावांवरून काय बोलणं सुरू आहे याचा अंदाज लावी.

काहीतरी विधायक करावं !! भाग १

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 21/03/2012 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, प्रस्तावना : १. ही कोणतीही जाहीरात नाही. २. ह्यात कोणताही स्वार्थ नाही. ३. कोणतेही साहित्यमुल्य/सेटल द स्कोर नाही. ४. गैरसमज नकोत. ;) धन्यवाद. खरं तर मराठी आंजावरून तात्पुरता सन्यास घ्यायचं ठरवलं होतं, पण पुन्हा एकदा उफाळून आलंच. वांझोटे धागे, चर्चा, जुलाब लावणार्‍या कविता, मराठी माणूस आहोत हे सिद्ध करणारे चरणखेचक धागे आणि रिकामचोट शतकी प्रतिसाद.. ( अर्थात यात माझाही सहभाग असेलही) पण यातून खरच काय साध्य करतोय असा विचार मनात आला. असो, मूळ मुद्द्यावर येऊया, मी मिपावर आलो ते "राघव - पुर्वीचा मुमुक्षु" या व्यक्तीमुळे.

गर्भातील चिमुकलीचे काही अनुत्तरीत प्रश्न.....

लेखक अमितसांगली यांनी शनिवार, 17/03/2012 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी, प्रेमिकेसाठी घेतो प्रियकर, उंच उंच भरारी, मग सांगा, ताईविना दादा अन मुलीविना पालक, हि कहाणी नाही का अधुरी......... ? बाबांसाठी मुलगी असते स्वप्नातली परी, 'लेकच हवी' हा आग्रह कोणी न धरी, जिवंत स्त्री गर्भाचा जन्मापूर्वी अंत करी, मग सांगा, राक्षसच नांदतो ना यांच्या अंतरी......... ? जन्म घेतला जिच्या पदरी, ती एक मुलगीच, हे हि तो विसरी, वंशाचा दिवा हवा आहे दारी, मग सांगा, फक्त एका मुलासाठी, आणखी किती लेकी धाडणार देवाघरी........

सेवा - एक आंदोलन

लेखक विश्वास कल्याणकर यांनी शुक्रवार, 16/03/2012 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
समाज सेवेशी माझा सर्वप्रथम परिचय इशान्य भारतात झाला तो २००८ मध्ये.. तेथे, गेल्या ६० वर्षापासुन सेवा भारती, विद्या भारती, कल्याणाश्रम, विवेकानंद केन्द्र, रामकृष्ण मिशन या संस्थांद्वारे होत असलेले कार्य बघुन मी खुपच प्रभावित झालो. आपला देखील यात खारीचा वाटा असावा या हेतुने मग मी होइल तसे तिकडे जात राहीलो अर्थात ते देखील निवृत्तीनंतर. नोकरीत असतांना कामातुन वर मान करायला देखील उसंत नव्ह्ती. गोहाटी ला ,समाज सेवे चे कार्य कसे सुरु करावे यावर सेवा विभागाने काढलेली एक छोटी पुस्तिका माझ्या वाचनात आली त्यातील काही माहिती मी आपणासोबत शेअर करीत आहे.

द स्पिरिट ...

लेखक गवि यांनी बुधवार, 14/03/2012 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीचा भाग: झुईं.. राईट ब्रदर्सनी हवेपेक्षा जड इंजिनवर चालणारं आणि पायलटच्या हाती संपूर्ण कंट्रोल्स असलेलं विमान उडवून दाखवलं. माणूसप्राण्याचा हा एक जबरदस्त लोभस गुण आहे की एकदा "ब्रेक थ्रू" सापडला की पुढे सुधारणा करुन तंत्र परफेक्ट बनवण्याचं काम हा प्राणी फार झपाट्याने करतो. राईट्सनी आपल्या विमानात सुधारणा करत करत ते आणखी स्थिर बनवलं.. आणखी नियंत्रित बनवलं... नव्या तंत्राचा पहिला उपयोग आपण माणसं ज्यासाठी करतो त्यासाठी, अर्थात युद्धासाठी, विमानाचा वापर शोध लागताक्षणीच सुरु झाला.

राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक केंद्र...

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 13/03/2012 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
National Counter Terrorism Centre (NCTC)...राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंधक केंद्र.. दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी १ मार्च २०१२ पासून राष्ट्रीय दहशतवाद प्रतिबंध केंद्र सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न होता.परंतु दहा राज्याच्या(गुजरात,बिहार ,तामिळनाडू, प. बंगाल .मध्यप्रदेश,पंजाब ,छत्तीसगड,ओरिसा,त्रिपुरा,हिमाचल प्रदेश) मुख्यमंत्र्यांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळे या प्रस्तावावर चालू अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे. NCTC हि दहशतवाद विरोधी यंत्रणा असून याचा मुख्य उद्देश भारत सरकारच्या विविध गुप्तहेर विभागांमध्ये माहितीची आदान-प्रदान करणे व त्यांना एकत्र आणणे हा आहे.

एक होता राजा....

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 13/03/2012 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
"त्याला पायतले यॉर्कर्स खेळता येत नाहीत " - इति माझा अखिल भारतीय खिलारेवाडी तरुण मित्रमंडळाच्या क्रिकेट संघाचा अघोषित कप्तान. "पण पायातला यॉर्कर म्हणजे काय? यॉर्कर फक्त पायातच टाकतात ना? डोक्यावरुन गेला तर त्याला बाउंसर म्हणतात. "- इति मी. "तेच ते. त्याला बाउंसर पण खेळता येत नाहीत" " अर्रे पण त्याला म्हणजे कोणाला" मी हताश होउन विचारले? "सौरव गांगुली.