Skip to main content

विचार

पु लं , तुम्ही परत या

लेखक yeda यांनी बुधवार, 13/06/2012 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
पु लं , तुम्ही परत या. आम्हाला येवून हसवा. खूप खूप हसवा. तुम्हाला जावून आज १२ वर्ष झाली. आम्ही पोरके झालो. १२ वर्षात आमच्या आयुष्यात बरेच बदल झाले. अहो, 'भाई' या शब्दाचा अर्थही बदललाय. विनोदाची व्याख्याही बदललीय. तुमच्या सारखा निर्भेळ विनोद आज नाही. आज पोपट पंचीला प्रतिष्ठा मिळाली आहे. निराश झालो कि तुमचे टेप केलेले कार्यक्रम बघतो; मनाला उभारी येते. आजही नारायण आहे, आजचा नारायण जीन्स घालतो, रंगीबेरंगी टीशर्ट घालतो. मनगटावर किमती घड्याळ, डोळ्यावर ray -ban चा गॉगल घालतो. पायात reebok चे बूट घालतो. हातात आयफोन असतो. तो बाईक चालवतो. पण तो तेवढाच जुन्या वळणाचा आहे .

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/06/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

एका वेश्येचे मनोगत..............

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 12/06/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मीना शेषु व त्यांची संग्राम हि संस्था वेश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी लढत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी सातारा शहरात आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आयुष्यातून आयुष्यच हद्दपार.............

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 10/06/2012 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातून आयुष्यच निघून चालले आहे............. एक दिवस असा उगवतो की वाटते आता आयुष्यातून काहीतरी कमी होत चालले आहे. सगळी सुखे दाराशी हात जोडून उभी आहेत पण काय कमी होते आहे हेच कळत नाही. आत्तापर्यंत जे नव्हते ते मिळवण्यात सगळा वेळ गेला. जे मिळवले त्याचा उपभोग घेण्यात वेळ गेला. मित्र मंडळीसमवेत मजेने या आयुष्याची मजा घेतली पण आता असे वाटते आहे की काहीतरी हातातून सुटत चालले आहे. आत्तापर्यंत दु:खे ही अनेक भोगली आणि खोटे कशाला बोलू, त्यांचीही या आयुष्यात सोबतच होती.

पराभूत थोरवीच्या शोधात

लेखक रमताराम यांनी रविवार, 10/06/2012 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
कालच पं. विजय कोपरकरांनी या तथाकथित आयडॉल वगैरे स्पर्धांबाबत एक मार्मिक प्रश्न विचारला होता. हे सगळे महागायक वगैरे लोक दुसर्‍याचे गाणे चोख कॉपी करतात, पण स्वतःची काही भर ते घालू शकतात? एका वैतागलेल्या संगीतकारांने त्यांना सागितले होते की एका महानायक वगैरे ठरलेल्या गायकाकडून अतिशय साध्या चालीचे गाणे बसवून घेताना त्यांना घाम फुटला होता. त्या संगीतकाराची टिपण्णी अतिशय मार्मिक होती. ते म्हणाले 'जर हे गाणं बाबूंजींनी आधीच गाऊन ठेवलं असतं ना तर हा महाभाग लगेच उचलून गायला असता.' माहागायक झालेल्या या महाभागांचे पुढे काय होते? कदाचित तेच होते जे बहुतेक सार्‍या शालांत परिक्षेत बोर्डात आलेल्यांचे होते.

रमेश व सुरेश

लेखक श्रीरंग_जोशी यांनी रविवार, 10/06/2012 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होतं, खेडेगाव म्हंटलं तरी चालेल. लोक खाऊन -पिऊन सुखी होते कारण गरजेपुरते उत्पन्न जवळ जवळ प्रत्येकालाच मिळत होते.या गावात एका जोडप्याचा संसार सुरू झाला -रामराव व जनाबाई. रामरावांच्या वडिलांची वडलोपार्जित शेतजमीन होती (क्षेत्रफळ ४ एकर). शेताच्याच एका कोपऱ्यात एक झोपडीवजा घर होते. रामराव व जनाबाई स्वतःच्याच शेतात राबत असत. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे गेली. रामराव व जनाबाईंच्या संसारवेलीवर फुले उमलली मोठा रमेश, मग जाई व जुई या जुळ्या मुली व या सर्वांच्या पाठीवर धाकटा सुरेश. अर्थातच स्वतःच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी पडू लागले.

राणी ताराबाई

लेखक sneharani यांनी शनिवार, 09/06/2012 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा गौरवशाली "शिवइतिहास" घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने!सह्याद्रीचे कणखर कडे, गड, किल्ले, बुरुज आज ही इतक्या दीर्घ कालाने शिवइतिहासाची साक्ष देतात. स्वातंत्र्य हा मानवाचा मुलभूत हक्क आहे याची जाणीव झाल्यावर त्या थोर पुरुषाने स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला अन् मावळ्यांच्या सहाय्याने स्वराज्य स्थापनेचा इतिहास ही घडविला. हा इतिहास नुसताच घडत नाही गेला तर तो इतक्या विविध पैलूंनी समृध्द होत गेला की आजमितीस एखादी घटना अभ्यासताना मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित!

विज्ञानातील चमत्काराकडून चमत्काराच्या विज्ञानाकडे

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 09/06/2012 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान आणि बुद्धिवाद प्रकरण 2
विज्ञानातील चमत्काराकडून चमत्काराच्या विज्ञानाकडे
प्रकरणाचे शीर्षक वाचून कोणाला ही असे वाटण्याची शक्यता आहे की, विज्ञानातही चमत्कार आहेत आणि चमत्काराचे ही विज्ञान आहे असे असेल तर ज्या विज्ञानात चमत्कर आहेत त्याला विज्ञान कसे म्हणावे व ज्या चमत्कारांचे विज्ञान आहे त्याला चमत्कार कसे म्हणावे असा साहजिकच प्रश्न उपस्थित होईल.

मराठीला हिन्दी भाषेच्या कुबड्या का लागतात?

लेखक जोयबोय यांनी गुरुवार, 07/06/2012 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
ंमराठी वर्तमान पत्रात सर्रासपणे हिन्दी शब्दांचा वापर संपादक करतात. मला समजत नाही की मराठीला हिन्दी भाषेच्या कुबड्या का लागतात? जर मराठी शब्द वापरले नाही तर लोक समजनार तरी कसे ? मराठी भाषेच्या ह्रासाला मराठी प्रसारमध्यमे मोठ्याप्रमानात ़जबाब्दार आहे असे वाटते. मिपा करांनी थोडे लक्ष यात घालावे

चित्रपटात सर्वप्रथम!

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 06/06/2012 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटांच्या इतिहासाबद्दल काही लिहावं अशी फार इच्छा होती. कारण ही माहिती मराठीत पुस्तकांव्यतिरिक्त आंतरजालावर कुठेही सापडली नाही. खुप दिवसांपासुन कुठल्यातरी मासिकातुन उतरवलेले संकलन मी आंतरजालावरुन साजेशी चित्र काढुन पुन्हा संकलीत केले. आणि हे आपल्यापुढे सादर करत आहे. काही चुका असल्यास दुरुस्ती करावी.
सर्व चित्रे आंतरजालावरुन साभार!