ते म्हणले शोधा चर्च, मशिदी, नी देवळे
दिसली फक्त प्रतिके आणि शोधकांचे थवे
थवे, आत असताना डोळे मिटून बसणारे
बाहेर तुझी शिकवण नजरेआड करणारे
ते म्हणले भेटण्या देवा, गरीबांची कर सेवा.
भेटले. भेटले अनेक सन्धीसाधू बगळे
पुढ्यात वाढलेले झटक्यात मटकावर
बाजुच्या भुकेल्यांचा घास हिरावणारे
ते म्हणले, अरे देव म्हणजे निसर्ग!