मसाल्या'ची मी तर प्रोमोज पाहिल्या पासुन वाट बघत होतो. वासही चांगला खमंग येत होता.आणी कारखान्याचा अंदाज असल्यानी तो खमंग असणार इतकं मनाशी पक्कं झालेलं होतं. त्यामुळे आज पुन्हा एकदा शिनुमा बघत असताना त्यात पुर्ण हरवायचा आनंद घेता आला.
गिरिश कुलकर्णि. आणी अमृता सुभाष एक गरिब जोडपं अतिशय कष्टाळुपणा हा अंगिभूत गुण असलेलं,हे जोडपं हीच चित्रपटाची मध्यवर्ती भुमिका आहे.
हा निरनिराळे छोटेछोटे व्यवसाय करणारा माणुस(रेवण पाटिल) दर व्यवसायात ठेकेदारांकडली पैशाची उधारी आणी उ(दा)धार गिर्हाइकांची ठकबाजी या दुष्ट चक्रात अडकलेला असतो.त्यामुळे एका गावातुन गाशा गुंडाळुन दुसृया गावात पुन्हा नवा डाव खेळायचा असं सगळं चाललेलं असतं.कारभारिण त्याला अगदी एक घरटं मोडलं की दुसरं विणुन दे अशी साथ देत असते.पण तिही या सगळ्या भागंभागीला थकलेली असते.पण एक दिवस असं होतं की अश्याच एका गावाहुन किराणा मालाच्या दुकानाला लोकार्पण मस्तु करुन दोघंही रात्रीच्या वेळी एका ट्रक मधे आपलं छोटसं पाठिवरचं बिर्हाड घेऊन बसतात.आणी त्यांना नाशिकला सोडणारा ट्रक म्हणुन जो भेटतो तो नेमका हैद्राबादला जाणारा...!इथे मग ट्रकवाल्याशी शेटलमेंट सुरु होते आणी तो सोलापुरला सोडायचं कबुल करतो.कारभारणीला अख्खा महाराष्ट्र फिरायची सवय झालेलीच असल्यानी ती यालाही तयार होते.आणी तिला सोलापुरात असलेला आपला भाऊ अठवतो.त्याच्या कडे जाऊ असं ठरवतात.पण इतक्या वर्षानी भाऊ तोच असला तरी सोलापुर त्यांच्यासाठी बरच बदललेलं असतं.मग काही दिवस धर्मशाळेत उतरणं,एक दिवस अचानक ज्याला पत्ता विचारला तोच हा भाऊ निघाला वगैरे प्रसंग घडुन बहिण भावाकडे पोहोचते.
हे भाऊ प्रकरणही भलतच गमतिदार व्यक्तिमत्व आहे.नंबर एकचा आळशीराजा...! (त्याच्या खास सोलापुरी भाषेची मजा मात्र बादशाही आहे.) एकेकाळी बार-रेस्टॉरंटमधे चखण्याच्या पुड्या पुरवणारा छोटासा धंदेवाइक पण त्याचा पोरगा कानात पेन्सिल घालण्याच निमित्तं होऊन तो धंदा सोडुन पोराच्या कानाच्या उपचारासाठी रहात घर विकुन घरी बसलेला असा असतो.विकलेल्या घराचा पैसाही संपत आलाय,तेंव्हा याला परत कामधंद्याला कसा जोडावा या चिंतेत त्याचीही कारभारिण असते. आणी आपल्या या धंदा करायचं नशिब घेऊन जन्माला आलेल्या (नायकाला)-रेवण पाटलांना,आता तो स्नॅक्सच्या मसाला शेंगदाण्याचा धंदा करायचं स्वप्न पडतं.बास हा व्यवसाय तात्काळ सुरुही होतो.पण या कानाच्या आजारासाठी काय करता येइल या चिंतेनी त्रस्त असलेल्या बायकोच्या भावाखातर रेवण त्या मुलाच्या कानाच्या एक्स-रे घेऊन पुण्याला जायला निघतो.आता गेल्यावेळी अ-मराठी असलेल्या ट्रकड्रायव्हरमुळे जो घोटाळा झाला,तो होऊ नये म्हणुन यावेळी पाटिलबुवा 'आपला' मराठी ट्रकवाला पुण्याला जाण्यासाठी पकडतात.आणी नेमका तो ट्रक एका पोलिस चेकपोस्टवर लाइनीत लागला असताना आपला हा भाबडा नायक पोलिसांजवळ जाऊन,सायब आपला ट्रक हाए,सोडा ना लवकर पुन्याला जायचय म्हत्वाच्या कामाला असं म्हणतो,आणी पोलिस चेकिंग होताना ट्रकमधे निघतो तो गांजा...!
अता आपले रेवण पाटिल नको तिथे दाखवलेल्या आपुलकीची सजा भोगायला लॉक-अप मधे जाऊन बसतात.पोलिसांनाही यानी गयावया करुन आपण फक्त सोलापुअरहुन पुण्याला जाण्यासाठी या ट्रक मधे बसलो होतो हे सांगितल्यामुळे आणी ''हा'' ट्रक मालक असल्याचा कोणताही पुरावा नाही हे कळल्यामुळे,याला आपण पकडु शकत नाही हे उमगलेलं असतं,पण असा सरळ याला सोडतील तर ते पोलिस कसले..? ते त्याच्या घाबर्या स्वभावाचा पुरेपुर फायदा उपटुन एका साखळीचोरीच्या न सापडलेल्या गुन्हेगाराच्या नावावर याला आत टाकतात.''हे बघ नारकोटिक्सच्या गुन्ह्यात अडकलास तर लंबे जाशील त्यापेक्षा या साखळीचोरीला तुझी म्हणुन स्विकार,म्हणजे आमची एक केस मार्गी लागेल.आणी तु २/४महिन्याची माफक सजा होऊन सुटशील''...इती पोलिस.
ही साखळी चोरिला गेलेली असते ती एका मोठ्या उद्योजकाच्या बायकोची,हा उद्योजक आणी त्याची बायको म्हणजे डॉ.मोहन अगाशे आणी ज्योती सुभाष...ते दोघेही चोर सापडला म्हणुन पोलिस ठाण्यात येतात आणी रेवणला बघता क्षणी त्यांना नक्की मामला काय आहे हे लक्षात येतं.आणी ते पोलिसांना केस बंद करण्याची विनंती करुन रेवणला सोडुन द्यायला लावतात.नंतर या अडकलेल्या गरीब रेवणला, ''रात्री झोपायची सोय आहे का..?'' असं विचारुन परोपकार बुद्धीने स्वतःच्या गोडाऊन मधे झोपायला देतात.....
आणी इथुन पुढे चित्रपट संपे पर्यंत सुरु होते रेवण पाटलांच्या नव्या आयुष्याची लढाई... हा मोठा उद्योजक मनानेही तितकाच मोठ्ठा असतो.तो या गरिब कष्टाळु तरुणाच्या पाठिशी एखाद्या सावध मित्राप्रमाणे खंबिरपणे उभा रहातो.तो त्याला लोकव्यवहारात सावध आणी शहाणं कसं करतो...? रेवण पाटलाचे जुने कर्जदार ''मोकळे'' कसे करतो...? आणी शेवटी अनेक अडचणी येऊन रेवण पाटलाची टच मसाल्याची स्वतःची छोटिशी कंपनी त्याच्या कारभारणीच्या साथिने कशी उभी रहाते...? हा एक अत्यंत रंजक आणी मार्गदर्शक प्रवास नुसता अवडणाराच नाही,तर अश्या या खर्याखुर्या जिवन संघर्षाच्या प्रेमात पाडणारा आहे.
चित्रपटाची कथा/पटकथा/संगीत(बर्याच काळानंतर-पुन्हा एकदा आनंद मोडक)/दिग्दर्शन/पात्र योजना या सगळ्या बाजुही चांगला मसाला जमायला जश्या हव्या तश्याच सकस आहेत. त्यामुळे हा चित्रपट कितिपैकी किति मार्क द्यायचे या कॅटॅगरीत रहातच नाही. अत्ताच्या अजिर्ण झालेल्या तथाकथित इनोदी आणी इतर चित्रपटांच्या पंगतीत एक भरपुर पोषणमुल्य देणारं हे खास वेगळं पान आहे,त्यामुळे याचा अस्वाद घेणे मस्ट आहे. या मसाल्याचं वैशिष्ठ्य म्हणजे हा आपल्या रोजच्या जेवणातला मसाला आहे.त्यामुळे यात वापरलेले सगळे घटक पदार्थ एकदम जेनुइन आहेत. ताजे आहेत. कुठलिही मुद्दाम निर्माण केलेली चव नाही.प्रॉडक्ट उठवायला घातलेला कुठलाही बेगडी रंग नाही,आकर्षक पॅकिंगही नाही.आणी म्हणुनच मसाला अस्सल आहे. रोज वापरण्यासाठी आपल्याकडे भरलेला असणं आवश्यकंही आहे.... मग जाणार ना मसाला घ्यायला...? :-)

वाचने
10755
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच !
मस्त परीक्षण... !! मला मसाला
व्वा. छान परिक्षण.
आवडले
परिक्षण आवडले.
परीक्षण आवडले.
छान परीक्षण!
मस्त परिक्षण!
चित्रपटाचे परीक्षण एकदम
नाहि वल्ली तसं नाही,
In reply to चित्रपटाचे परीक्षण एकदम by प्रचेतस
मसाला मसालेदार आहे तर. आता
प्लस वन झिरो वन
वाह वा.
@तुमचे अजून एका गोष्टीसाठी
In reply to वाह वा. by चिंतामणी
>>> तुमच्या मनात तयार होणार्या ओळखिसाठी
In reply to @तुमचे अजून एका गोष्टीसाठी by अत्रुप्त आत्मा
@ती ओळख पुसुन टाकली. >>>
In reply to >>> तुमच्या मनात तयार होणार्या ओळखिसाठी by चिंतामणी
अरे अभिनंदनाची बातमी एवढी
In reply to @ती ओळख पुसुन टाकली. >>> by अत्रुप्त आत्मा
@अरे अभिनंदनाची बातमी एवढी
In reply to अरे अभिनंदनाची बातमी एवढी by ५० फक्त
अभिनंदन हो बुवा.
In reply to @अरे अभिनंदनाची बातमी एवढी by अत्रुप्त आत्मा
अभिनंदन गुर्जि
In reply to अभिनंदन हो बुवा. by प्रचेतस
आता
अग्र्लेख
धन्यवाद!
परिक्षण आव्डले चित्रपट
इथे तर अख्खा चित्रपटच लिहून
@(शुद्धलेखनाच्या भयंकर
In reply to इथे तर अख्खा चित्रपटच लिहून by हसरी
नमुन्यादाखल पहिला परीच्छेद :
ठिक आहे...या शुद्ध लेखनाच्या
In reply to नमुन्यादाखल पहिला परीच्छेद : by हसरी
सहमत आहे.
In reply to ठिक आहे...या शुद्ध लेखनाच्या by अत्रुप्त आत्मा
मीपन समत हाय. पन भटजीबुवा
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
@काय कल्ला नाय. >>> वाइच
In reply to मीपन समत हाय. पन भटजीबुवा by धन्या
मस्त चित्रपट परिक्षण! या
सहमत
अहो अतृप्त आत्मा, चिडताय
शुद्ध, अशुद्ध सगळं ठीक आहे
In reply to अहो अतृप्त आत्मा, चिडताय by हसरी
@शुद्ध, अशुद्ध सगळं ठीक आहे
In reply to शुद्ध, अशुद्ध सगळं ठीक आहे by प्यारे१
@अहो अतृप्त आत्मा, चिडताय
In reply to अहो अतृप्त आत्मा, चिडताय by हसरी
@अत्रुप्त अत्मा
In reply to @अहो अतृप्त आत्मा, चिडताय by अत्रुप्त आत्मा
मृत्यूं-जय हो...! @आणी
In reply to @अत्रुप्त अत्मा by मृत्युन्जय
पहिल्या चित्रातले गिरिश
सिनेमा आंजा वर उपलब्ध
प्रोमो शब्दावरून प्रतिक्रिया
@जसे कॅसेट कॅसेटी सीडी सीड्या
In reply to प्रोमो शब्दावरून प्रतिक्रिया by अमोल सहस्रबुद्धे