Skip to main content

विचार

संस्कृती आणि धर्म यातील गल्लत

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 21/01/2016 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारपणे संस्कृती आणि धर्म यांची बेमालुम सरमिसळ दैनंदिन मानवी व्यवहारात एवढी सवयीची झालेली असते की वस्तुतः संस्कृती आणि धर्म या बाबी भिन्न असू शकतात याकडेच मुळी दुर्लक्ष होऊ शकते. संस्कृती आणि धर्म हे एकमेकांवर प्रभाव पाडत असतात ते सहाजिक असते. धर्मसंस्था संस्कृतीतील त्यांना वाटणार्‍या काही सांस्कृतीक गोष्टी त्याज्य ठरवते काही नव्याने जोडते उर्वरीत संस्कृती जशीच्या तशी स्विकारली जाते. उर्वरीत संस्कृती जिचा धार्मीक तत्वाशी प्रत्यक्षतः संबंध नाही तरी सुद्धा ती त्या धर्माची ओळख आहे असा भास निर्माण होऊ शकतो.

ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यांची नवी ओळख ...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 20/01/2016 12:28 या दिवशी प्रकाशित केले.

ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन

मित्रांनो, गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर. सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.

गुलामी नात्यातली!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 19/01/2016 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी भिडस्त व्यक्ती असेल जी कधी कुणाला "नाही" म्हणू शकत नसेल त्याची आजकालच्या जगात फारच परवड, कुचंबणा आणि गोची होत असते. अशा भिडस्त असलेल्या समोरच्या व्यक्तीची संमती न घेता त्याला गृहीत धरून अनेकदा काही गोष्टी केल्या जातात. समोरच्याने त्याबद्दल चकार शब्द काढायचा अवकाश की त्या अगोदरच त्याच्या तोंडावर "भावनिक धमकी" असलेली चिकट पट्टी लावली जाते आणि त्याला बोलू न देता व स्वत:चे मत व्यक्त न करू देता त्याचेवर अगणित स्वार्थी अपेक्षा, इच्छा, आकांक्षा कर्तव्याच्या वेष्टनात बांधून लादल्या जातात मग पट्टी काढली जाते. याला काहीजण संवाद म्हणतात.

जलमार्ग विकासाचे वरदान उद्योगांना

लेखक अनिकेत एस जोशी यांनी मंगळवार, 19/01/2016 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
“अमेरिकेचा विकास झाला म्हणून तिथे रस्ते चांगले नाहीत तर रस्ते चांगले होते म्हणून अमेरिकेचा इतका विकास झाला”, हे अब्राहम लिंकन यांचे वाक्य नितीन गडकरींनी आपल्या हृदयावर कोरून ठेवलेले आहे. ते वाक्य एका नक्षीदार पाटीव लिहून त्यांनी सेना-भाजपाच्या पहिल्या राजवटीत महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांच्या टेबलावर ठेवण्यासाठी मुद्दाम दिले होते. गडकरींच्या राहत्या घरातही ठळकपणाने ते वाक्य दिसत असे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना ते वाक्य हेच ध्येय मानून गडकरींनी कामाचा जबर झपाटा लावलेला होता.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – 3

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 17/01/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – ३

1 पाकच्या मनात खदखद आहे ती 1971च्या युद्धातील लाजीरवाण्या पराभवाची. हिंदुस्थानने ना केवळ पाकला पराभूत करत बांगलादेशची निर्मिती केली, तर 90 हजार पाकी सैनिकांची युद्धकैदी म्हणून पकड करून, त्यांना पाकच्या हवाली केले. म्हणूनच काश्मीरला हिंदुस्थानपासून तोडण्यासाठी आजपर्यंत पाकने आपली सारी शक्ती पणाला लावली.

आरक्षणाची गरज

लेखक अन्नू यांनी शनिवार, 16/01/2016 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
आत्तापर्यंत जितक्या पण चर्चा झाल्या किंवा आरक्षणाचा विषय निघाला तर त्यात ७५% लोक आरक्षण बंद झाले पाहीजे किंवा आर्थिक आधारावरच आरक्षण झाले पाहिजे असा सरळ-सरळ मुद्दा मांडताना दिसतात! त्यात ९९% हे उच्च जातीतले (म्हणजेच ओपन कॅटेगरीतले) असतात. तर उरलेले इतर जातीतले असतात. दुर्दैवाची गोष्ट ही कि काही सधन घरातले पण त्याच जातीत असणारे लोकही हाच मुद्दा अगदी ठामपणे मांडताना दिसतात! बरोबर आहे त्यांचे- कशाला हवे आरक्षण? काय साध्य होतं आरक्षणाने? मीही या गोष्टीवर खुप विचार केला. कशासाठी आरक्षणाचा इतका अट्टाहास केला होता आंबेडकरांनी?

देव अन माणूस

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 16/01/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
(महत्वाची सूचना - 'देवांची घऱ' म्हणजे - मंदीर , मशिदी , चर्च अन अजून धर्मानुसार वेगवेगळे ) मानवी मन हे खूप घाबरट आहे . त्याला कशाची ना कशाची भीती असतेच . नोकरी , धंदा , घर , संसार ह्या पैकी कशाच्या ना कश्याच्या काळजीने मन कायम चिंतेत असते . - ह्या मानसिक भीतीला घालवण्यासाठी 'देवांचा' आधार आहे . देव ही संकल्पना प्रत्येक धर्मात आहे . हिंदूत ती कृष्ण / शिव , ख्रीशानामध्ये virgin मेरी / येशु , मुस्लिम मध्ये मोहम्मद , बौद्ध मध्ये बुद्ध आणी असच पुढे !

साहित्यिक कसले हे !

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 16/01/2016 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.