Skip to main content

विचार

ढग, पाउस, आठवणी आणि भावना यांच्यात काही नाते आहे का?

लेखक निशांत_खाडे यांनी बुधवार, 24/02/2016 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगाबादला सकाळपासूनच आभाळात काळसर ढगांची गर्दी झालीये... बऱ्याच दिवसांनी कम्प्युटरवर काम करत असताना खिडकी बाहेर दुपारच्या ३ वाजताही अगदी संथपणे वाहणाऱ्या थंड वाऱ्यावर झुलणारी नारळाची पाने खूपच सुखद वाटली.

हमारी अधूरी कहानी / एक अर्धवट परन्तु (औरंगाबादचा) यशस्वी कट्टा.............

लेखक बाबा योगिराज यांनी बुधवार, 24/02/2016 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १६ फेब्रुवारी २०१६ रोजी श्री अत्रन्गि पाउस यांचा धागा आला, “२२ तारखेला औरंगाबाद मध्ये आहे .... संध्याकाळी साधारण ४-७ वेळ मोकळा आहे ...एखादा छोटा कट्टा होऊ शकेल किंवा कसे ?” मी स्वगत, क्या बात. मज्जा. प्रतिसाद दिला, आमंत्रण दिल. सोबत प्राडॉ. यांच पण आमंत्रण होत. मी खुश. मग प्राडॉ. यांनी भ्रमणध्वनि वर मला आणि अत्रन्गि पाउस याना बोलून साधारण रूपरेषा ठरवली. संध्याकाळी अत्रन्गि पाउस यांच्या मोकळ्या वेळेनुसार भेटायचे आणि बीबी-का-मकबरा आणि पानचक्की ह्या दोन ठिकाणी जायचे असे ठरले. होता होता कट्ट्याचा दिवस उजाडला.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ३)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 23/02/2016 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ ------------- जुनागढ हे आजच्या गुजरात मधील एक संस्थान. इथल्या नवाबाने १५ ऑगस्ट १९४७ ला माउंटबॅटनच्या भौगोलिक जवळिकीचा सिद्धांत धुडकावून लावत पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला. युक्तिवाद होता, समुद्रमार्गे पाकिस्तान जवळ आहे. मंगरूळ आणि बाबरीवाडा हे जुनागढचे दोन अंकित प्रदेश होते. त्यांनी जुनागढच्या नवाबाच्या इच्छेप्रमाणे पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिला. म्हणून नवाबाने या दोन प्रदेशात आपले सैन्य पाठवले. त्यामुळे आजूबाजूची इतर संस्थाने खवळली आणि त्यानी आपापले सैन्य जुनागढच्या सीमेवर नेवून भारतीय सरकारला साकडे घातले. आणि जुनागढ मध्ये एक अस्थायी सरकार देखील स्थापण्यात आले.

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 23/02/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग २)

लेखक Anand More यांनी सोमवार, 22/02/2016 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ------------------------ आजचा आपला भारत देश म्हणजे ब्रिटीशांच्या अखत्यारीतला संपूर्ण भूभाग नाही. ब्रिटीशांच्या अमलाखालील भारताची एकदा रद्द केलेली आणि तीनदा सर्वमान्य झालेली विभागणी / फाळणी झाली. १९०५ सालची बंगालची फाळणी ही पहिली फाळणी. ती लोकक्षोभामुळे ब्रिटीशांनी मागे घेतली. मग १९१९ साली दुसरी फाळणी झाली, ती जुन्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेला सुदूर उत्तर-पश्चिमेच्या एक मोठ्या भागाने स्वतःला ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केल्याने. हा भाग होता प्राचीन भारतातला, ‘गांधार’. रामायणकालीन भरताने जिंकलेला गांधार. (भरताच्या तक्ष या पुत्रावरून तक्षशीला आणि पुष्कल या पुत्रावरून पुष्कलावती या शहरांची नावे पडली असे मानतात. प्रसिद्ध इतिहासतज्ञ दामोदर कोसंबींनी, तक्षक या नागाचे शहर म्हणून तक्षशीला अशीही व्युत्पत्ती सांगितली आहे.) बामियानच्या बुद्धमूर्तींची भूमी असलेला गांधार, मगधाधीपती धनानंदाकडून अपमानीत होऊन मगध सोडून विद्यार्जन आणि विद्यादान ही दोनही कामे आयुष्याच्या मोठ्या कालावधीसाठी आचार्य चाणक्यांनी जिथल्या विद्यापीठात पूर्ण केली त्या तक्षशिलेचा गांधार. म्हणजेच आजचा अफगाणिस्तान.

राष्ट्रीय आयोगाचा सोन्यासारखा निर्णय.....

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 22/02/2016 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण जवळ आले की फ्रीज, टी.व्ही. अशा किमती वस्तूंच्या खरेदीवर मोठी सूट, हप्त्याने खरेदीच्या योजना, किंवा मोठी भेटवस्तू इ. चा सुकाळ असतो. यामध्ये अलीकडे स्क्रॅच कार्ड योजनेची भर पडली आहे. या योजनेमध्ये खरेदीच्या वेळी बिलासोबत एक कार्ड दिले जाते. त्यावरील एक छोटेसे आवरण खरडले की खाली एका वस्तूचे नाव, चित्र किंवा क्वचित रोख रकमेचा आकडा लिहिलेला असतो. ग्राहकाला बक्षीस म्हणून मिळालेली ही वस्तू, किंवा रक्कम देण्याची मुख्य जबाबदारी योजना जाहीर करणाऱ्या उत्पादकाची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वस्तू विकणाऱ्या वितरकाची असते.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग १)

लेखक Anand More यांनी रविवार, 21/02/2016 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
"विष्णू पुराण" म्हणते की, उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।। म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे.

विश्वाचे आर्त - भाग १९ - कार्बन डेटिंग

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 21/02/2016 05:45 या दिवशी प्रकाशित केले.
1 . . काळाचा आवाका महाप्रचंड आहे. पृथ्वी जन्माला आली साडेचार अब्ज वर्षांपूर्वी. या आवाक्याला दोन हातांच्या कवेत सामावून घ्यायचं झालं तर आपला दोन-पाच हजार वर्षांचा ज्ञात, लिखित इतिहास म्हणजे नखाच्या टोकाचा कण हे आपण पहिल्या लेखात पाहिलं. मग प्रश्न असा येतो की त्याआधी जे घडलं ते नक्की कधी घडलं हे कसं शोधून काढायचं? आपल्याला जर एखादा जुना जीवाश्म सापडला तर तो नक्की किती जुना हे कसं ओळखायचं?

विषय संपला????

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी रविवार, 21/02/2016 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
बाबासाहेबांच्या पुरस्काराचा वाद झाला, मतांतरं, धमक्या सगळं झालं, पण काम त्या पोलिसांचं वाढलं. दिवस रात्र ड्युट्या लागल्या... तेव्हापासून पाहतोय, सारखं काहीतरी आहेच. तो ओवेसी काहीतरी बोलतो पुन्हा फेसबुक वर त्याच्या आई माईला घोडे लावले जातात. विषय संपला. मग गुलाम अली येतात, त्यांना परत पाठवलं जातं आपला स्वाभिमान जपण्यासाठी. पुन्हा एकदा कुणाला उमाळे येतात, त्यांच्या गजला शेअर होतात. विषय संपला. मग आमीर खान काहीतरी बोलतो, सामाजिक जाणीव असलेला अभिनेता, पर्फेक्षनिस्ट वगैरे आपण पूर्वी दिलेली बिरुदं विसरून हा कसा जन्मापासून हरामखोर आहे असल्या कथा whatsapp वर येऊ लागतात.

प्रसार माध्यमे आणि टिपिंग पॉईंट - एक रोचक संशोधन

लेखक विकास यांनी गुरुवार, 18/02/2016 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
दि न्यूयॉर्कर साप्ताहीकाचा पत्रकार माल्कम ग्लाडवेल, याने २००० मधे एक पुस्तक लिहीले होते - "The Tipping Point - How Little Things Can Make a Big Difference". कुठलिही गोष्ट अचानक मोठी होण्याआधी कशा घटना घडत असतात त्या एकमेकांना कशा लागलेल्या असतात, याचा अन्वयार्थ लावताना या पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. असा टिपिंग पॉईंट हा रोगराई, युद्धे, गुन्हेवारी वाढ इथपासून ते राजकीय बदल या सर्वत्रच दिसू शकतो. उदा. "ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राचा खून हे पहील्या महायुद्धाचे तात्कालीक कारण" समजले जाते.