Skip to main content

विचार

पॉपकॉर्न ची गरज आहे का?

लेखक सुरवंट यांनी मंगळवार, 26/01/2016 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
पॉपकॉर्न ची गरज आहे का? पॉपकॉर्न म्हणजे 'मक्याच्या लाह्या' असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. लाह्या म्हणजे यात वाटाणे, फुटाणे, शेंगदाणे असे सगळेच खमंग दाणे अध्याहृत आहेत. सोबतीला कोक, पेप्सी, वेफर्स असे वेस्टर्न प्रोडक्ट अॉप्शनल आहेत . पॉपकॉर्न गरज पडते(च) का? आणी का पडते? - पहिली गोष्ट म्हणजे खवैय्यांच्या तोंडाला आलेली सपक चव. कित्येक दिवसांत वशाड खायला न मिळाल्याने आलेली हतबलता. रोजचे वरणभात खाऊन चालू झालेले अपचन. यावर ऊतारा म्हणून हे लोक पॉपकॉर्नच्या 'आहारी' जातात. पॉपकॉर्न खाणारे लोक आळशी असतात असा एक समाजमान्य ग्रह रुढ झाल्याचे ऐकिवात आहे.

शोषण नाही कोठें ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 26/01/2016 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
शोषण नाही कोठें ? (उर्फ समतेच्या चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या !)
अजून एक प्रश्न म्हणजे शोषण नाही कुठे? आपण आपल्या घरी मरमर काम करणाऱ्या स्त्रियांना किती पगार देतो? रजा देतो? आपण स्वतः जेवढं काम करतो तेवढा पगार आपल्याला हक्क म्हणून हवा असतो पण या अशा स्त्रियांना आपण तसा पगार देतो का? ते सोडा. घरात काम करणाऱ्या आणि खस्ता काढणाऱ्या गृहिणीला काय मिळतं? शोषण तिथेही आहेच. लैंगिक संदर्भ आले की शोषण होतं असं थोडंच आहे? आणि जर हे एवढं सगळं शोषण आपण चालवून घेतो, तर मग पोर्नोग्राफिक फिल्म्समधलं सो काॅल्ड शोषणही आपल्याला चाललं पाहिजे.

आजपासुन नास्तिक...

लेखक उगा काहितरीच यांनी मंगळवार, 26/01/2016 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा वाटु लागलंय द्याव फेकुन हे श्रद्धा नावाचं जळमट; होतेय नुसती घुसमट यात , काढायलाही धजावत नाहीत हात इतकी किळसवाणी जळमट.. काढायला जाता सर्वांग किळसवाणे करणारे... आताशा वाटु लागलंय पद्धतशीरपणे शिकवलंय आपल्याला पाळायला श्रद्धा; शिकवलंय पाया पडायला "जेजीच्या", लावलेत अंगारे आपल्याही नकळत.. भारुन टाकलेय आपले मस्तक त्याच्यात त्या उग्र दर्पाने... आताशा वाटु लागलंय मुद्दामच शिकवलंय आपल्याला मोठ्यांचा आदर करायला, खोटं न बोलायला कारण त्याशिवाय का चालणार आहे समाजाचा गाडा अव्याहतपणे, व्यवस्थितपणे.. जरा मोठे होताच शिकवले, पाया पडलं की जाते रक्त डोक्याकडे, म्हणुनच तर झाले इथे आर्यभट्

मिस करू नये असे टीवी कार्यक्रम

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी सोमवार, 25/01/2016 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपण रोज टीवी पाहतोच, त्यात बहुसंख्य भरणा हा निरर्थक सीरियल किंवा तद्दन हलक्या दर्जाचे रियलिटी शो वगैरे असतात. पण ह्या सगळ्यांच्या मधे हिस्ट्री टीवी १८ किंवा नॅशनल जियोग्राफिक, डिस्कवरी वगैरे कधी कधी प्रसंगानुरूप प्रचंड उत्तम अन चांगले कार्यक्रम देतात, जागतिक उतरंडीमधे भारताची पोजीशन जशी थोड़ी थोड़ी बळकट होत जाते आहे तसे तसे २६ जानेवारी १५ ऑगस्ट वगैरे ला किंवा भारतीय सणवारांना किंवा मंगलयान प्रक्षेपण सारख्या इवेंट्स ना ह्या चॅनल वर डॉक्यूमेंट्री स्वरुपात मानाचे स्थान दिले जाते हे मागच्या २ वर्षांपासुन दिसते आहे, तेव्हा आजचा मुहूर्त साधुन हा एक धागा सुरु करतोय डिस्कवरी एपिक नॅशनल जियोग्राफिक किं

थोडंस मनातलं...

लेखक लाडू. यांनी सोमवार, 25/01/2016 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय ‘तू’ ला, आज म्हटलं चल एक पत्र लिहू तुला. कस वाटतंय पाहू. तशी मी फार obessed आहे प्रेमपत्र वैगरे बद्दल. पूर्वीच्या कथा, कादंबऱ्या, कोणाचे अनुभव, किंवा चित्रपटामधूनसुद्धा असे उल्लेख आले कि शहारून येत. कोणी कोणासाठी गुलाबी कागद वैगरे घेऊन, इतकं छान छान विशेषणे वापरून लिहित असेल तर ते आयुष्यभरासाठी कोणीही जपून ठेवेलच ना. (ते मग कोणाला सापडलं कि वाजलेच बारा.. अस काहीतरी सांगून माझा रोमांटिक मूड प्लीज खराब करू नकोस. मी प्रेमपत्र लिहायच्या सॉल्लीड मूड मध्ये आहे) तू मला हे असलं कधीही काहीही दिलेलं नाहीस याचा प्रचंड राग तर आहेच. पण आता मी लिहितेय ना, तर शांतपणे वाचायचं.

सर्वोच्च न्यायालयाचा पथदर्शक निर्णय

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 23/01/2016 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही महत्वाच्या कामासाठी किंवा चक्क सुट्टीमध्ये चार दिवस मजेत घालवण्यासाठी परगावी जायला आपण रेल्वेचे आरक्षण करावे, आणि स्टेशनवर जाऊन बघावे तर आपले आरक्षणच गायब ! शेवटी प्रवास रद्द करण्याची वेळ येते . जीव चडफडतो . रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याची चूक किंवा हलगर्जीपणा , पण त्याची केव्हडी किंमत ग्राहकाला द्यावी लागते ?ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेली अशा प्रकारची सेवा ही निश्चीतच सदोष असते. अशा वेळी जागरूक ग्राहक हा ग्राहक संरक्षण कायद्याचा (ग्रा.सं.

१०० स्मार्ट सिटी आव्हाने की स्मार्ट नेत्यांची कसोटी

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 22/01/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
कालच म्हणजे २१/१/२०१६ ला चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात स्मार्ट सिटी आव्हाने या विषयावर रोटरी क्लब आयोजीत शिशीर व्याखानमाला यात एक परिसंवाद झाला. आज काल प्रचार नाही तर सर्व व्यर्थ या तत्वावर मोठे वक्ते येऊनही रामकृष्ण मोरे सभागृह अर्धे भरेल इतकी गर्दी दिसली नाही. जे कोणी होते ते सर्व निवृत्त आणि वेळ घालवायचे साधन म्हणुन आलेले. तरुणाई मोजकीच दिसत होती. या परिसंवादात श्री अभय फिरोदीया.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – 5वा अंतिम भाग

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 21/01/2016 22:59 या दिवशी प्रकाशित केले.

थँक यू मिस्टर ड्रॅगन – अंतिम

दहशतवादी कारवायांमध्ये चिमुरडीही बळी पडत आहे. पाकमधील भूमी स्वकीयांच्या रक्तानेच न्हावून निघत आहे. पेराल तेच उगवते, या न्यायाने पाकने आजवर हिंदुस्थानात ज्या कारवाया घडवून आणल्या, त्याची फळी आता तेथील जनता भोगत आहे. म्हणूनच जनमत क्षुब्ध आहे. पाकमधील अंतर्गत परिस्थितीवर विस्ताराने भाष्य करण्याचे कारण असे होते की, काश्मीरप्रश्न तर पाकला सोडवायचा आहे, पण त्यासाठीचे ठोस कारण काय? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होणार आहे.

'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 21/01/2016 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
धागा शीर्षकातील 'सर्व'-समावेशक हा शब्द सर्व बॅकग्राऊंडचे -कोणत्याही जाती-धर्म-वंशाचे- लोक एकत्र सहभागी होऊ शकतील या अर्थाने वापरला आहे, (सेक्युलर हा शब्द फारच बदनाम झाल्यामुळे तो शब्द टाळला). जसे की वाढदिवस आहे वाढदिवसास निमंत्रितांवर जाती धर्माची पुटे राहत नाहीत. (पंतप्रधान मोदीतर आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीसाठी वाढदिवसाची वेळ वाअरून घेतात) नवीन वर्षाची सुरवात साजरे करणे (जगातल्या कोणत्याही कॅलेंडर नुसार) वस्तुतः निधर्मी असावे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे सण सुद्धा निधर्मी असतात. फ्रेंडशीप डे सारखी कल्पना सुद्धा एक चांगली कल्पना आहे.