Skip to main content

विचार

बोध कथा - उंदीर आणि बिल्ली मौसी

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 17/02/2016 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे.

"नाही" चा महिमा!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 17/02/2016 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वासघात त्याचाच केला जातो जो विश्वास ठेवतो. म्हणून जास्त आणि पटकन कुणावर विश्वास ठेवत जाऊ नका. इमोशनल ब्लॅकमेल त्यालाच केले जाते जो इमोशनल असतो. म्हणून आजच्या जगात जास्त इमोशनल राहून चालत नाही. भिडस्त राहून सुद्धा चालत नाही. नाहीतर भिडस्त माणसाचा सर्वात प्रथम बळी जातो. तुम्ही दाबले जाल तर दुनिया तुम्हाला आणखी दाबेल. आजकालच्या जगात जो सगळ्यांचा मनाचा विचार करतो त्याच्या मनाचा विचार कुणीच करत नाही. जो सगळ्यांच्या स्वभावाला सांभाळून घेतो, त्याच्या स्वभावाला मात्र कुणीच सांभाळताना दिसत नाही. अशा व्यक्तीला दुखवणे आपला हक्कच आहे असे लोक मानतात कारण अशा व्यक्तीला गृहीत धरले जाते.

इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 16/02/2016 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना. किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या धुक्यात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती. त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले.

प्रेम !!! ???

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 15/02/2016 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम दिवसाच्या निमित्ताने ही आठवण! आपल्या प्रियतमेची मोजून ५३ वर्षे, सात महिने, एकरा दिवस आणि अकरा रात्री , निरंतर वाट पाहणारा प्रियकर खऱ्या जगात असतो कि नाही माहित नाही, पण Gabriel García Márquez च्या ‘Love in the Time of Cholera’ या सुमारे साडेतीनशे पृष्ठांच्या कादंबरीत तो परतपरत जगतामरता भेटत राहतो. मूळ Spanish भाषेत लिहिलेली ही कादंबरी १९८५ मध्ये प्रसिद्ध झाली आणि १९८८ साली त्याचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. यावर आधारित याच नावाचा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला. तसे सरधोपट कथानक! किशोरवयीन फ्लोरेन्तिनो फार्मिनाच्या प्रेमात पडतो. बिचारा गरीब असतो.पण त्याचे प्रेम भारी असते.

दिल से सलूट....

लेखक dipak bhutekar यांनी रविवार, 14/02/2016 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच 26 जानेवारीला गणराज्य दिना निमित्त झालेल्या पुरस्कार सोहळ्या मध्ये महाराष्ट्राच्या चार शुर मुलाना "भारत पुरस्कार" या सर्वोच्य राष्ट्रिय बाल शौर्य पुरस्कार साठी गौरवण्यात आले त्यात वैभव घंगारे (वर्धा) , नीलेश भिल्ल (जळगाव), मोहित दळवी (मुंबई) ह्याची शौर्य पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे. तर, नागपुरच्या गौरव सहस्त्रबुध्दे (वय15) ह्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे गौरवने आपल्या जीवाची काळजी न करता आपल्या चार मित्रांना वाचवन्या साठी आपला जिव धोक्यात घातला मित्राचे प्राण तर त्याने वाचवले पण स्वतःचा जिव मात्र त्याला गमवावा लागला.

मला कुठे मरायचं आहे?

लेखक एनिग्मा यांनी रविवार, 14/02/2016 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
मला कुठे मरायचं आहे? जिवंतपणी आपण नेहमी हा विचार करत असतो कि मला कुठे जायचं आहे? मला कस जगायचं आहे? मला काय हवा आहे? पण कुठे मारायचं आहे हा विचार फार क्वचितच आपल्या मनात येतो. तसही आजकालच्या ददागीच्या जमान्यात जगायला फुरसत मिळत नाही, तर मारायची चिंता पडलीये कुणाला. आपला दिवस जातो तो काम, कष्ट आणि फावल्या वेळात करमणूक ह्यामध्ये, त्यात आपण आपल्या मनाला थोडं शांत करेल असा काही शोधतच असतो. त्यासाठी कित्येकदा आपण सहलीला जातो आणि रोजचा तणावातून मुक्त होता येते का हे पाहतो. पण ती चीर्र्शांती आपल्याला सापडेलच असा नसत.

रुग्णालयांशी संलग्न दुकानातून औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही -------

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 13/02/2016 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे सात वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यात आमचा नातू चि. इशान याला व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप आला. पुढे ते इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचले व त्यामुळे तो अत्यवस्थ झाला. ताबडतोब त्याला सह्याद्री हॉस्पिटल मध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्याला ADEM नावाचा दुर्मिळ रोग झाला आहे ,असे मेंदूविकाराचे तज्ञ डॉ. दिवटे यांनी निदान केले. त्यावर एकमेव इलाज म्हणून Iviglob या आयात केलेल्या औषधाची इंजेक्शन्स रोज तीन वेळा याप्रमाणे पाच दिवस देण्यात आली. तो ९ जानेवारी ते १३ फ़ेब्रुवारी या मुदतीत सह्याद्री हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात होता. औषधोपचार लागू पडून तो बरा झाला याबद्दल आम्ही हॉस्पिटलचे मनापासून आभारी आहोत.

कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 09/02/2016 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

एका गावातिल बस - रुपक कथा

लेखक सुज्ञ यांनी मंगळवार, 09/02/2016 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक गाव होते , त्या गावात एक खुप मोठी बस होती. बस मधे वर जाण्यासाठी ( त्या गावातील बाकीच्या लोकांच्या दृष्टीने वर जाण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी म्हणा ) एक शिडी लावलेली असून अनेक लोक प्रयत्न करून ती शिडी चढुन बस मधे जागा मिळवत असत. अडचण ही होती की लुळ्या लोकांना ती शिडी चढ़ण्यास धडधाकट लोक मदत करण्याऐवजी कायम त्रास देत (गंमत ही होती की ते लुळे नसत फक्त धडधाकट लोकांनी त्यांना मानसिक दृष्ट्या तसे बनवले होते. आपल्याला वर जायला मिळावे म्हणून हो ! ही त्या धडधाकट लोकांनी चूकच) .