मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुलामी नात्यातली!!

निमिष सोनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
एखादी भिडस्त व्यक्ती असेल जी कधी कुणाला "नाही" म्हणू शकत नसेल त्याची आजकालच्या जगात फारच परवड, कुचंबणा आणि गोची होत असते. अशा भिडस्त असलेल्या समोरच्या व्यक्तीची संमती न घेता त्याला गृहीत धरून अनेकदा काही गोष्टी केल्या जातात. समोरच्याने त्याबद्दल चकार शब्द काढायचा अवकाश की त्या अगोदरच त्याच्या तोंडावर "भावनिक धमकी" असलेली चिकट पट्टी लावली जाते आणि त्याला बोलू न देता व स्वत:चे मत व्यक्त न करू देता त्याचेवर अगणित स्वार्थी अपेक्षा, इच्छा, आकांक्षा कर्तव्याच्या वेष्टनात बांधून लादल्या जातात मग पट्टी काढली जाते. याला काहीजण संवाद म्हणतात. पण, याला वैचारिक दहशतवाद असे नाव आहे हेही कित्येकांना समजत नाही किंवा ते मुद्दाम त्यांना समजून घ्यायचे नसते. माझ्या मते संवाद म्हणजे सम + वाद म्हणजे दोघांनाही वाद करण्याची समान संधी. दोघांनाही आपले मत मांडण्याची मुभा. कोणत्याही नात्यांत असा "वैचारिक दहशतवाद" घुसला की एक अधिकाधिक दबला जातो आणि दुसरा वरचढ होतच राहतो. जो दबतो त्याला अधिकाधिक दाबले जाते. अशी सुरुवात होण्यापूर्वीच थांबवा. भाऊ भाऊ किंवा भाऊ बहीण किंवा बहीण बहीण या नात्यात तर ही सुरुवात लहानपणापासूनच होते आणि ती आई वडीलच करतात. एक उदाहरण घेऊ- लहानपणापासून बरेचदा आपण आई वडिलांकडून त्यांच्या एखाद्या मुलाबद्दल ऐकत असतो- "आमचा मोठा मुलगा अमुक कधीही काहीही मागत नाही. शहाणा आहे आमचा अमुक!" अशा प्रकारचे वाक्य तुमच्याबद्दल बोलले जाऊ लागले तर कृपया त्याचे अप्रूप वाटून घेऊ नका. ही प्रशंसा नाही! उलट प्रशंसेच्या वेष्टणाखाली "असाच दबलेला राहा, काही मागू नको, भिडस्त आहेस, तसाच राहा!" असे नकळत तुमच्या मनात ते बिंबवले जाते. "आमची लहानी मुलगी/मुलगा तमुक मात्र काही वस्तू नाही मिळाली की अकांडतांडव करते. तिला पाहिजे तेच ती करते. मिळाल्याशिवाय गप्प बसतच नाही!" असे वरील वाक्य ऐकल्यावर "न मागणारे अपत्य" सुखावते आणि त्याला वाटते- "अरे वा! आपल्याला सगळे चांगले म्हणत आहेत! आपले कौतुक होते आहे! नाही मागितले तर आपण चांगले ठरतो!" पुढे मोठे झाल्यावर हेच कायम राहते. मग ते "लहानपणी आईवडीलांना बिनधास्त मागणारे" लहान अपत्य परतफेडीच्या वेळी अती लाडामुळे आई वडिलांना "काहीही न देणारे" अपत्य होते आणि त्याला आई वडील सुद्धा मागायला घाबरतात. मात्र, "लहानपणापासून आईवडीलांना काहीही न मागणारे अपत्य" हे आपल्या भिडस्त स्वभावामुळे मोठेपणी "आई वडिलांना देतच राहते" आणि विशेष म्हणजे त्याचेकडूनच अधिकाधिक मागितलेच जाते. वरचे उदाहरण प्रातिनिधिक आहे. लहान मोठे याबद्दल कधी उलट सुलट अनुभव येऊ शकतो! पण दोन अपत्यांमध्ये बहुतेक वेळा आई वडील असा भेद करतातच. दुहीचे बीज लहानपणापासून रुजवतातच. काही समंजस आई वडील असे करत नसले तरी इतर नातेवाईक घरी येवून तशी बीजे रोवायला घेऊन येतातच येतात आणि ती रोवूनच जातातच जातात! म्हणजेच कोणत्याही नात्याची "सुरुवात" होत असताना आपण जी भूमिका स्वीकारू त्यानुसार आपल्याला गृहीत धरले जाते. मग ते कोणतेही नाते असो! सुरुवातीपासूनच जर अशी "आपल्या भिडस्तपणाची इतरांना लागलेली सवय" आपण मोडली तरच नात्यात संवाद होईल (आणि नंतर सुसंवाद) नाहीतर तो नात्यांचा वैचारिक दहशतवाद होईल. नाहीतर मग नात्यातला एक जण वैचारिक दहशतवादी आणि दुसरा वैचारिक गुलाम होईल!!

वाचने 4799 वाचनखूण प्रतिक्रिया 29

होबासराव 19/01/2016 - 13:44
वैचारिक दहशतवाद वाह वाह काय इनोवेशन केलय सर. सध्या गरिब बिचारे पामर मिपा कर ह्याचा अनुभव घेतायेत. Under The Sun जे काय येत त्या कशावर ही णिसो साहित्य क्लब आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर, अफाट आकलन शक्तिच्या सामर्थ्याने, आणि अत्यंत लाघवि, ओघवति आणि प्रचंड खोलि असलेल्या भाषेत आपले सम्रुध्द अशे विचार मांडतात. आप्ल्या नावाने सुरु झालेल्या क्लब चे एक नविन सदस्य आहेत त्यानि तर सद्ध्या ह्याच आपल्या "वैचारीक दहशतवादाने" तमाम जनतेला सळो कि पळो करुन सोडलेय. आपण आपले नाते संबधाच्या बाबतित ले अमुल्य मत ह्या आधिहि खालिल जिलब्यातुन ..स्वारि धाग्यातुन व्यक्त केलेयत. नात्यातले लहान मोठे कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!! मानवी स्पंज आणि स्प्रिंग! @आत्मुस बुवा आता हा माझा प्रतिसाद कुठल्या कॅटेगिरित येइल :))

आपली जुनी ईमेज काहीही असो. एकदा त्यातुन बाहेर पडायचे ठरवले की मग दुनिया गेली तेल लावत. सरळ तोंडावर जे आहे ते सांगुन मोकळे व्हावे आणि ईमेजमधुन बाहेर पडावे. किंवा मी "असेही" वागु शकतो हा संदेश लोकांपर्यंत पोचवावा.

अस्वस्थामा 19/01/2016 - 16:49
(पूर्णतः पटो वा न पटो) चांगलं लिहिलंय हो.. @होबासराव, पूर्वग्रहदूषित असा प्रतिसाद देण्याचं कारण नै कळालं. लेखकाचे आधीचे काही लेख कै च्या कै होते (असं इथल्या वाचकांना तरी वाटलेलं असं म्हणू हवं तर.) पण म्हणून त्यांचा प्रत्येक लेख झटकून टाकावा असं थोडीच आहे. हाच लेख "प्रचेतस" अथवा "आतिवास" या नावाने आला असता तर हीच प्रतिक्रिया आली असती का ? (ते असं काही लिहतील की नाही हा प्रश्न अलाहिदा. सांगायचा मुद्दा हा आयडी-प्रतिमेचा आणि त्या अनुषंगाने येणार्‍या प्रतिसादांचा आहे.)

In reply to by अस्वस्थामा

होबासराव 19/01/2016 - 19:39
हाच लेख "प्रचेतस" अथवा "आतिवास" या नावाने आला असता तर हीच प्रतिक्रिया आली असती का ? We do not belive in कंपुबाजी दुसरी गोष्ट अशी आहे का जर तुम्हाला लेख आवडला आहे तुम्हि तसे प्रतिसादात दिले आहे... मला नाहि आवडला मि तसा प्रतिसाद दिला आहे...thats it

In reply to by होबासराव

होबासराव 19/01/2016 - 19:51
@ अस्वस्थामा सवाल भी आपिच कर्रे अउर जवाबा भी आप हि देरे :)) हाच लेख "प्रचेतस" अथवा "आतिवास" या नावाने आला असता तर हीच प्रतिक्रिया आली असती का ? (ते असं काही लिहतील की नाही हा प्रश्न अलाहिदा. सांगायचा मुद्दा हा आयडी-प्रतिमेचा आणि त्या अनुषंगाने येणार्‍या प्रतिसादांचा आहे.)

In reply to by होबासराव

अस्वस्थामा 19/01/2016 - 20:03
We do not belive in कंपुबाजी
कंपुबाजीचा प्रश्न येत नाही. काय लिहिलंय यापेक्षा कोणी लिहिलंय हे पाहून प्रतिक्रिया येते त्याबद्दल होतंं ते.
दुसरी गोष्ट अशी आहे का जर तुम्हाला लेख आवडला आहे तुम्हि तसे प्रतिसादात दिले आहे... मला नाहि आवडला मि तसा प्रतिसाद दिला आहे...thats it
तुम्ही तेवढेच लिहून थांबला असतात तर कशाला प्रतिसाद लिव्हला असता. :) तुम्ही ते नव्या मिपा-म्हाग्रुंच्याबरोबर या गरिब लेखकुस जोडलं म्हणून राहवलं नै इतकंच हो. असो.. (बादवे, एखाद्याने "चांगलं लिहिलंय" असा अभिप्राय देणे म्हणजे ते लेखन आवडणे नक्कीच नै. ;) उ.दा. तसं तर दवणे "चांगलं लिहितात" पण आम्हाला आवडत नैत.)

In reply to by अस्वस्थामा

होबासराव 19/01/2016 - 20:07
मि कुठले शब्द वापरावे किति वापरावे हे मि ठरवणार लेखकाचे आधीचे काही लेख कै च्या कै होते (असं इथल्या वाचकांना तरी वाटलेलं असं म्हणू हवं तर.) हा ह्यामुळेच असल्या प्रतिक्रिया येणार, देखो साब आपको अच्छा लगा आपने बोला...मेरे कु नै अच्छा लगा मै बोला..अब मै कैसे बोलु कितना बोलु ये तो मै देखुंगा

In reply to by अस्वस्थामा

होबासराव 19/01/2016 - 20:11
तुम्ही ते नव्या मिपा-म्हाग्रुंच्याबरोबर या गरिब लेखकुस जोडलं म्हणून राहवलं नै इतकंच हो. असो.. अस कस अस कस ! आता पहा ते संक्रांति वर कशी ईमरती पाडतात ते म्हाग्रुंचे म्हाग्रु :))

In reply to by हेमंत लाटकर

होबासराव 19/01/2016 - 19:46
तुम्हाला नाहि कळायच ते.. मग पुढचा धागा कुठला काढताय ? एका संक्रांति ह्याच विषयात तुम्हाला किति विषय सुचवले होते, हळदीकुंकु एक प्राचिन परंपरा, हलव्याचे दागिने घालण्यामागचे शास्त्रिय (भारतिय) कारण, संक्रांतिला काळि साडि नेसणे - एक भारतिय परंपरा,

कंजूस 19/01/2016 - 17:33
"याला जीवन ऐसे नाव "अथवा दुसरे काही नावाने बहुतेक एक सदर पूर्वी अमृत नावाच्या मासिकात येत असे.त्यात अशी बरीच उदाहरणे येत.किंबहुना अशा जोड्याच कुटुंबात असायच्या.एका आमच्या नातेवाइकाने यावर नकलाही करून दाखवल्या कसे बोलतात ते.शेवटी "ही सगळी माया आहे."कुणाचीतरी लाकडे आयुष्यभर जळणार आहेत दुसय्रा कुणाच्या नात्याच्याच आयुष्यात लागेल तेव्हा उजेड पडावा यासाठी.

निमिष सोनार 19/01/2016 - 18:21
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! "ही सगळी माया आहे. कुणाचीतरी लाकडे आयुष्यभर जळणार आहेत दुसऱ्या कुणाच्या नात्याच्याच आयुष्यात लागेल तेव्हा उजेड पडावा यासाठी" हे वाक्य मन विषण्ण करून गेले.

DEADPOOL 19/01/2016 - 19:51
बापू मग आत्ता काय फरक पडलाय तुमच्यात. हेलाकाकांचा लेख वाचला मी ;)

होबासराव 19/01/2016 - 21:05
अहो आपल्या सारखा प्रकांड पंडीत असताना ? चांदण्या दिवसाहि असतातच कि हो पण सुर्याचा प्रकाशच इतका प्रखर असतो त्यामुळे त्या दिवसा दिसत नाहित. आणि पृथ्वि वर काहि भुभाग असा आहे जिथे सुर्य कित्येक दिवस मावळत नाहि, सतत आपला प्रखर प्रकाश पसरवतच असतो...तसलच काहि तरि इथे मिपावर घडतय. असो आमचि आपल्या इतकि प्रतिभा कुठे.... चला पोटभर हसुन लय दिस झाल नेक्श्ट लेख केव्हा ?

पद्मावति 19/01/2016 - 22:17
खूप नेमकं लिहिलंय. स्वभावाने भिडस्त माणसाचे लोक कौतुक करतात. मग तो माणूसही हळूहळू स्वत:च्या चांगुल पणाच्या इमेज मधे फसत जातो. कधी नाइलाजाने, कधी भिडस्त स्वभावाने तर कधी लोक करत असलेल्या कौतुकाच्या मोहाने. चांगुलपणाची सुध्धा एक नशा असते. या दुष्टचक्रामधून बाहेर पडणं सोपे नसते.

आदूबाळ 19/01/2016 - 22:22
हा नात्यातल्या गुलामीचा प्रकार नाही. एकदा इमेज बनल्यावर त्या इमेजला 'जागायला' लागतं - त्यातला आहे. अर्थात तेही वैतागवाणं आहेच. पण मुद्दा असा आहे की हे फक्त नात्यात नाही, मित्रमंडळींच्या ग्रूपमध्ये, ऑफिसात कुठेही होतं. मागे - खूप पूर्वी - मिपावर एका आयडीने** "कमावायला लागलेल्या मुलाकडून आईबाप अचानक अवास्तव अपेक्षा करायला लागतात, एखाद्या बँक अकाऊंटसारखं बघतात" अशी काहीशी प्रतिक्रिया एका चर्चेत दिली होती. सकृद्दर्शनी जरी ते विचार विचित्र वाटले तरी त्यामागची वेदना जाणवली होती. असो. लेख आवडला. **हा आयडी कोण हे मला नीटच आठवतं आहे. मिपावर ती व्यक्ती अजूनही सक्रिय आहे.

निमिष सोनार 19/01/2016 - 22:42
..हा विषय सगळ्याना कधी ना कधी जीवनात स्पर्शून गेला आहे...(आणि या लेखावर होणाऱ्या उगाच व्यर्थ टीकेकडे मी सध्या दुर्लक्ष करतोय कारण हा लेख मी लिहिण्याचे कारण मला लेखक म्हणून मिरवायचे असा नाही तर माझे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवणे असा आहे) आणि इतर जण सुद्धा अशा प्रसंगातून गेलेत का हे त्यातून कळते आहे