बोलीले जित्ता ठेवा, मराठीले जित्ता ठेवा
मराठी भासेची खासबात काये जी ? असा तुमाले कोनी विचारलनच तं सांगजाल का इच्या बोल्या ! अजी एखाद्या भासेच्या ४२-४३ बोल्या मंजे तुमाले मज्याक वाट्ते का जी ? असी बोल्याइच्या बारेत अमीर भासा मराठीच आये, हिंदी बी नसे अना बंगाली-तमिल-तेलुगु बी नसे. मंग आप्ल्याले अभिमान पायजे का नाई ? अखिन बोल्याइमंदी बी पोटबोल्या आयेतंच.. आता आमच्या झाड़ीबोलीचाच घ्या ना जी. म्हनावाले गेला तं इनमिन ४ जिल्ल्यात बोलतंत, पर असी अमीरी आये भाऊ का , का सांगू तुमाले. भंडार्याची( मराठीतला पयला ग्रंथ, ’विवेकसिंधु’ मुकुंदराजाने भंडार्यातच ’आंभोरा’ गावी संगामावरच्या पहाडीवर बसून लिखला.
मिसळपाव