जगातल्या सर्वोत्तम आर्मी सर्वोत्तम कश्या ठरतात ? त्यांना पहिली किंवा दुसरी जागा कशी दिली जाते, कुठल्या क्षेत्रात दिली जाते? हे मानांकन कसे ठरते, ह्या संबंधी आपल्याला खूप कुतूहल असते, कारण कोण्या एकाला सर्वोत्तम म्हणावे तर त्याची दुसऱ्या सोबत झोंबी व्हायला हवी, आर्मीच्या बाबतीत अशी झोंबी म्हणजे युद्ध, ते पैसा मानवी जीवन अन वेळ तीनही मोर्चांवर खर्चिक अन भयप्रद असते, मग एखादी फौज सर्वोत्तम आहे हे कसे ठरवतात ?
ह्याला उत्तर म्हणजे ते ठरवायला आजकाल आयोजित केले जाणारे संयुक्त अभ्यास, तसे पाहता आपापले मित्रदेश पकडून आजकाल प्रत्येकच देश संयुक्त अभ्यास करतो, मग परत जागतिक नामांकनांची पंचाईत होऊ शकते.