Skip to main content

लग्नासाठी नकार- मजेशीर कारणे

लेखक सतिश पाटील यांनी सोमवार, 17/10/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एक मित्राचे हात पिवळ करण्याचे त्याच्या पालकांनी ठरवलय. मागच्याच महिन्यात मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची बोनी झालिये. २८ वर्ष वय, MBA, बऱ्यापैकी देखणा, सधन कुटुंब,भरपूर बागायती शेती, पुण्यात आईटी मधे नोकरी, चांगला पगार,५;९ उंची लग्नाच्या बाजारात मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत असे ऐकून होतो. (माझ्या बाबतीत मात्र पहिल्याच फटक्यात पोरगी गटवली. त्यामुळ ऐकून आहे , अनुभव नाही.) त्याने ज्या २ मुली पहिल्या त्या दोघिन्नी त्याला नकार दिलाय. त्याची मजेदार कारणे एकंदरीत अशी. 1) मुलगी पहायला गेल्यावर चहा पोहे हदाडून झाल्यावर पोरीचा बा म्हणतो, आम्हाला सरकारी नोकरी करणारा पाहिजे हाय...तवा तुमी या... आयला पोरगा आपल्या पोरीला लग्नासाठी बघायला घरी येतोय तेव्हा त्याच्याबद्दल एवढी जुजबी माहिती देखील त्या पोरीच्या "बा" ला नसेल का्य? २) कालच दूसरा नकार आला आहे. त्याचे कारण तर कहर आहे. म्हणे मुलाचे वजन कमी आहे. ऐशाप्पथ... याला का्य त्या पोरीच्या बा ने उचलून पहिला? का च्या पिउन झाल्यावर वजन काट्यावर उभा केला? अणि खरच तो मुलगा एवढा लुकड़ा फुकड़ा नाहीये दिसायला.६५ किलो वजन असेल त्याचे. काल पासून मला फ़ोन करुन " साला जिन्दगी झंड झालिये बे माझी, असा सुर लावायला लागलय. ये आपण बसुया म्हणून आमंत्रण देतोय... साला ही का्य कारणे असतात यार नकार द्यायची? पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो, कारण तरी स्पष्ट सांगा न राव? असो..सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे......
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19545
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे.
अभिनंदन. पुत्रजन्माबद्दल.

कित्ती चांगला आहे तुमचा मित्र ! माझे निर्लज्ज , हलकट मित्र कितीतरी पोरींनी हाकलल्यानंतरसुद्धा बसायला बोलवत नाहीत. एक ठाणेकर मित्र तर पुणे ते लंडन व्हाया थायलंड नकारघंटा घेउन आलाय पण बसायचे नाव घेइना !

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

त्या घेतलेल्या पत्यांचे पुढे काय करतात ते कळेना. आम्च्या कॅटमधून घेतलेल्या किलवर छक्का आणि बदाम गुलामचे काम झाले असेल तर परत देणे . अखिल मिपा उगा पत्ते नका मागू आणि फुका नावे नका सांगू या संघटनेचा सक्रिय सभासदांकडून मिपा कट्टाहितार्थ जारी

त्याच्या छातीवर केस आहेत ना ? मिळेल मग मुलगी. (कुणीतरी दुवा द्या रे आधीच्या धाग्याचा).

पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो,
हेच नको असेल पोरिंना.. माझ्या दादासाठी मुली बघत होतो तेव्हा हा अनुभव आलेला. आमचे २ फ्लॅट्स एकत्र आहेत. मुलीला बघायला गेलो तेव्हा मुलीचे वडील सरळ म्हणाले की हां, लग्नानंतर वेगळे करुनच घेऊ.. ओळख पाळख नसताना, पहील्याच भेटीत ते हा निर्णय घेऊन मोकळे झाले. आम्ही हे ऐकुनच चाट पडलो..

आपण काय बोलणार, आमच्या (स्वर्गीय) मातोश्रीने अस्मादिकांना न विचारता मुलगी ठरवून टाकली होती. बहुतेक तिला हि विचारले गेले नसावे. अस्मादिक मातृभक्त, एक हि प्रश्न विचारला नाही. होकार / नकार काय प्रकार असतो, याचा अनुभव घ्यायला मिळाला नाही. असो.

दोन नकारात एवढं निराश होण्यासारखं काये? अजून कीमान एक डझन बघ म्हणाव. काय फरक पडतोय. मागे जे काही झाले ते विसरुन परत तयार रहा. (हायला मला हा अणुभव नाय मिळाला...:(

सायबा तुमच्या मित्राच्या दुःखात सहभागी आहे मी ... कधी त्याला म्हणावं घाबरू नको तू एकटा नाहीयेस बसायला.

महाराष्ट्रात स्त्रिया ९२५ प्रति एक हजार पुरुष. तुमच्या मित्राचा नंबर त्या ७५ मधे लागू नये ही सदिच्छा. बाकी मला तर मुलगा बघणे प्रकाराचा अनुभव नाही. कोणाला नकार दिलेला नाही. साहजिकच असली काही कारणे मी सांगू शकणार नाही. इतर अनुभवी लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत पॉपकॉर्न घेऊन फांदी पकडून बसत आहे. आता त्या संस्कृती, भावना, आशा, अपेक्षा, विनोद वगैरे येऊ देत सावकाश.

In reply to by पैसा

लग्न न झालेली ७५ मुले वाजपेयी, मोदी, अडवाणी वगैरे बनतात. बाकीचे, ३ शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

काल पर्वा पर्यंत तरी कलाम सर होते या जोक मध्ये! अडवाणींची एन्ट्री झाली वाटत आता! :D शतप्रतिशत भाजपा! ;)

In reply to by प्रभाकर पेठकर

नांवात काय आहे? असे कोणीतरी म्हणून ठेवले आहेच. (कोणी? ते नांव आठवत नाही) नांवे कोणाचीही लावा ३ शिट्ट्यांचा हिशोब कांही चुकत नाही.

नाही आवडलं तर द्यावा लागणार ना नकार.मग काहीतरी कारणं शोधावी लागतात.म्हणून पत्रिका मागतात लोक! नाही जुळली हे बर्यापैकी मन न दुखवणारे कारण असावे ;)

आमच्या एका मित्राला घरात कमोड नाही म्हणून नकार मिळालेला आहे :)

असू द्या, नका वाईट वाटून घेऊ. पूर्वी नै का मुलीला गाता येत नाही, स्वयंपाकघरातल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नै म्हणून नकार यायचे तश्यातला प्रकार समजून विसरून जायचं. आता ज्या मुलींना गाता येत असे त्यांनाही असे काय मोठे प्रोत्साहन मिळायचे सासरी? पण आपलं उगीच काहीतरी. स्वयंपाकघरातील प्रश्नाचं उत्तर चुकलं तर आयुष्यभर तसंच राहणारे का? शिकेलच की ती! पण नाही! समदं कसं रेडीमेड पायजे.

In reply to by रेवती

रेवती यांच्याशी अगदी सहमत. मागील काही काळ असा होता कि मुलं कसलीही शुल्लक कारणं मुलींना देउन नाकारत होते. त्यावर परत उलट जाब विचारता पण येत नसे. त्या वेळी त्या मुलींची मानसिक स्थिती काय होत असेल? मुली सुध्धा आता त्यांच्या अपेक्षा स्पष्ट सांगत असतिल तर त्यात नवल का वाटाव? मुलांनी या गोष्टीचे वाईट वाटून घेउ नये. आज ना उद्या कुणीतरी मिळेलच.

In reply to by बरखा

अपेक्षा सांगणे वाईट नाहीच, पण त्या काय अवाच्या सव्वा नसाव्यात... माझ्या एका मित्राला ४ चाकीगाडी, फ्लॅट या बरोबर आई-वडील सोबत रहायला नको अशी अपेक्षा व्यक्त केली. घर, गाडी त्याने सगळं मान्य केलं पण आता त्याच्या आई वडिलांना तो एकटाच मुलगा होता त्यांना कुठे ठेवणार. तसेही आताचे पालक समंजस झाले आहेत. ते मुलाच्या संसारात जास्त लक्ष घालत नाहीत. आई वडील सोबत नको हि अपेक्षाच चुकीची आहे.

In reply to by संदीप डांगे

हाहाहा... असतीलही दुर्मिळ पण मग ते सारे दुर्मिळ पालक आमच्या मित्रांचे आईवडील आहेत असं म्हणावं लागेल. कसला लकीये ना मी ;) कायम शिंगल मंदार

In reply to by महासंग्राम

ते मुलाच्या संसारात जास्त लक्ष घालत नाहीत असं काही नाही. मुलग्यांच्या संसारात त्यांचे आईवडील लक्ष घालतात पण आजकाल मुलींचेही आईवडील यात अ‍ॅडवले आहेत. तुम्हाला वेळ असेल तर अपर्ना रामतीथकर बाईंचे व्हिडिओज बघावेत असे सुचवीन. मिपाकरीण पिराच्या लाडक्या आहेत त्या! ;)

In reply to by रेवती

सकाळी सकाळी प्रातःस्मरणीय ताईंची आठवण काढलीस! चला, त्या आनंदात आपल्या डिग्र्या चुलीत घालुन त्यावर इकडच्या स्वारीसाठी भाकर्‍या भाजायला घेऊ!!

In reply to by पिलीयन रायडर

ताई, डिग्र्या चांगल्या भारी आहेत ना ? बीए बीकॉमच्या डिग्र्यांच्या जाळावर भाजलेल्या भाकर्‍या टेस्टी लागत नाहीत म्हणे !

In reply to by धर्मराजमुटके

डिग्र्या दणदणीत आहेत हो.. अगदी विंजिनेरिंग वगैरेच्या! पण कसंय ना की त्यांना फक्त चुल पेटण्याशी मतलब आहे. तुम्ही शास्त्रज्ञ असा वा प्राध्यापक (का अगदी अंतराळात जाऊन आलेल्या असा..) घरी येऊन नवर्‍यासाठी भाकरी करता आलीच पाहिजे असा सोप्पा नियम आहे. तेव्हा स्वतःला का जाळेनात, भाकर्‍या होण्याशी मतलब!

In reply to by संदीप डांगे

https://www.youtube.com/results?search_query=aparna+ramtirthakar+speech ह्या बाई कोण आहेत नक्की ते मलाही माहिती नाही. सामाजिक कार्यकर्त्या असाव्यात, वकिल आहेत. पण बायकांनी काय करावे आणि काय नाही ह्याबाबत मतं जहाल आहेत. नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने अर्थातच त्या ते सांगत नाहीत.

In reply to by पिलीयन रायडर

नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने अरे वा! सहिये, मी काय म्हणतो ताई आमच्या प्रकरणांस काढून देतो मिपा आयडी, तिला जरा समजावा नवऱ्याने काय करावे ते ठरवायची रीत नसते भारतीय संस्कृतीत म्हणून ! काय सांगू माझा सासुरवास (माझ्यापाशी पदर नाही/नसतो/कधीच नसेल म्हणून नाहीतर आत्ता बोळा तोंडात कोंबून हुंदका काढून दावला असता). ललिता पवारीणीला शरद तळवलकर नवरा मिळणे ह्यालाच कार्मिक न्याय म्हणतात का, असा एक भाबडा प्रश्न मला हल्लीच पडलाय :P :P

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हीच ती पुरुषांची मुस्काटदाबी!! ह्याच अन्यायाला तोंड फोडतात अपर्णाताई.. उगी उगी.. चला डोळे पुसा! बापुंसारखा दणकट माणुन तोंडात बोळा कोंबुन हुंदका काढतोय! आमचा पार्वतीच आठवला!! =))

In reply to by पिलीयन रायडर

सद्ध्या दणकट बापू टाईम प्लिज घेऊन बसलाय म्हणजे बघा हे आपला पार्वती विग गुडघ्यावर ठेऊन विड्या ओढतोय हो! =)) =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नवर्‍यांनी काय करावे ह्या बद्दल बोलण्याची पद्धत आपल्याकडे नसल्याने कोणत्याही बाईला आपल्या नवऱ्याने काय करावे हे "दुसऱ्या" "बाई"ने( किंवा माणसाने सुद्धा पण माणसे दुसऱ्या माणसाला सांगायला जाणार नाहीत) सांगितलेले पटणार नाही. आणि जरी ते पटण्यासारखे असले तरी ते केवळ "दुसऱ्या बाई"ने सांगितले म्हणून त्यांना मान्य होणार नाही

In reply to by सुबोध खरे

बरं आता इतक्यांनी चुकीचा अर्थ लावलाय म्हणुन सांगते.. जितक्या प्रमाणात आपल्याकडे बायकांनी कसे रहावे, काय करावे, काय घालावे इ इ इ इ गोष्टी बोलल्या जातात, त्याच्या १% सुद्धा त्या पुरुषांना सांगितल्या जात नाहीत. बायको म्हणुन कसे असावे हे रामतीर्थकर बाई तास न तास प्रवचन देऊन सांगतात, पण नवर्‍यांनी कसे वागावे ह्या बद्दल अवाक्षरही नसते. सासर आणि माहेर ह्या कन्सेप्ट टेक्निकली पुरुषालाही असतात. लग्न त्याचंही होत असतं. पण अजुनही स्त्रियांना बायको / सुन म्हणुन ठराविक चौकटीत बसवण्याचा अट्टाहास संपत नाही. तुम्ही सगळे एक बायको आपल्या नवर्‍याला काय बोलते, बोलत नाही ह्यावर बोलताय. मी समाजातला साधारण पद्धतीबद्दल बोलतेय. "बायकांच्या जातीने.." ह्या दोन शब्दांनी सुरु होणारी वाक्य..यु नो..

In reply to by पिलीयन रायडर

रामतीर्थकर बाई भयाण प्रकरण आहे! तर, असली प्रवचने ऐकायला उतारवायतल्या बायका मुख्यत्वे जास्त असतात, त्यांना सुख व्हावे असे बोलले कि त्या वक्त्याला भारी मान देतात, सर्व खुश होतात पण घरातल्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतात. आमची आत्या देवाच्या गायनाचे कार्यक्रम (मोफत) करते, तिचे एक गाणे आईबापाला विसरू नये, त्यांचा सांभाळ करावा या विषयावर आहे, त्यात मुलाला जाम उपदेश केले आहेत. हे गाणे सुपरहिट आहे, कारण जे लोक हे कार्यक्रम ऐकतात त्यांच्यासाठीच आहे ते! सुनांशी-मुलांशी कसं वागावे ह्याची परखड भाषणे-गाणी केली तर कोण ऐकणार! समाजाला -ह्यात स्त्रीपुरुष दोन्ही- स्त्रीने टिपिकल वागणे अपेक्षित आहे, चौकटीबाहेर वागले कि संस्कृती बुडेल ना? बाकी पुरुषकडून अपेक्षाच नसतात असे नाही, वेगळ्या असतात. ज्या अपेक्षा स्त्रीकडून त्याच पुरुषकडून नसतात पण म्हणून पुरुषाचे काही प्रश्नच नाहीत असे समजणे हेही गैर!

In reply to by संदीप डांगे

पुरुषांचे प्रश्नच नाहीत असं कधी म्हणणंच नव्हतं माझं. त्यांनाही भरपुर स्टिरिओटाईप्सचा सामना करावा लगतो जसे की कमावलेच पाहिजे, रडता कामा नये, अमुक-तमुक केले की बायकी इ इ. फक्त त्यांना हे इतक्या प्रमाणात ऐकवले जात नाही. शिवाय संस्कृती पासुन ते खनदान की इज्जत असं खुप काही बायकांच्या मागे लावुन दिलंय. पुरुषांना प्रश्नच नाहीत असं म्हणायचं नाहीचे.. पण बायकांचे प्रश्न बरेच जास्त आणि गंभीर आहेत हे तरी मान्य असायला हरकत नसावी. (मी सास बहु ड्रामाच्याही पलीकडे जाऊन असणारे प्रश्न म्हणतेय.. लग्न आणि त्यातल्या वैतगावाडी भानगडी स्त्री असो वा पुरुष.. कुणालाही चुकत नाहीत.)

In reply to by पिलीयन रायडर

आमची जुन्या अमदानीतली आजी आठवली (आईची आई) अस्सल ग्रामीण म्हातारी! आमच्या वाईफला पहिल्यांदा भेटली तेव्हा पहिला प्रश्न "भाकरी करायला येते का?" आमचं प्रकरण हो म्हणताच आईला म्हणाली "बरी सून शोधलीस गो आक्के राजस्थान भाकरी पण बडवती म्हणजे आक्रीतच आहे" आमचं प्रकरण फ्लॅट!

In reply to by रेवती

तुम्हाला वेळ असेल तर अपर्ना रामतीथकर बाईंचे व्हिडिओज बघावेत असे सुचवीन.
नको नको एकदाच पहिले होते या आजीचे व्हिडीओज परत पाहणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली . बादवे ठाण्याला असतात ना या आजी

पौर्णिमेच्या रात्री घेऊन या तुमच्या मित्राला. एक तावीज देईन बांधायला. मुलगीच काय मुलीची आईसुद्धा तयार होईल लग्नाला. इति, तंत्र मंत्र सम्राट, काले इल्म और सिफली इल्म के माहिर, बाबा अकबर खान थायलंडवाले.

त्याच्याच चुलत भावाचा हा किस्सा ... शिकलेला शेतकरी, नगर जिल्ह्यात एक मालकीची ईमारत एल आय सि ला भाड्याने दिलेली, थोडक्यात नोकरीची गरज न्हावतीच, परंतु मुलींची अपेक्षा याला नोकरी असयाला पाहिजे होती तर पसंत केला असता. शेवटी बापाने १३ लाख भरून नगरच्या प्रसिद्ध अश्या मामांच्या ब्यांकेत " चिटकवले". पोस्टिंग पनवेल.१४ हजार रुपये पगार घेतो, शेवटच्या ज्या मुलीने नोकरी नाही म्हणून नाकारले होते, तिनेच त्याच्याशी लग्न केले. मुलगी घरीच असते. सास्रयाने राहण्यासाठी 1 RK फ्ल्याट दिलाय स्वतःचा. शेती संभाळनारा मुलगा शहरात गेल्याने, बापाने २ गडी कामाला ठेवले शेतात पगारावर !!!!!

नकाराची कारणे काहीही असोत हो...कोणी होकार कसा मिळवावा यावर उपाय सांगा कि राव...!

In reply to by संदीप डांगे

अण्णा, पाटील भाऊ तेच म्हनायले तुम्ही उपाय सांगा कि राव...! ते लगेच पिरेमइवाह करतील

In reply to by महासंग्राम

प्यार किया नही जाता, हो जाता है केल्यावर निभावायची हिम्मत असेल तर नकाराची भीती नाही

In reply to by संदीप डांगे

प्यार किया नही जाता, हो जाता है
अहो त्याचीच वाट बघत होतो इतकी वर्ष...पण कसलं काय.. :( अजून एकटा, पाटील

In reply to by पाटीलभाऊ

आधी होकार देण्यासाठी कोणीतरी शोधा! शोधली असेल तर आमच्या अति आवडत्या चित्रपटात (रांझना) मुरारी ने सांगितलेल्या स्टेप्स वापरून बघा! ;) लडकी का सुबह शाम पीछा करो! घर के बाहर, स्कुल के बाहर, सडक पे, सायकल पे, टेम्पो मे, रिक्षा मे, रो दो, खाना खाना छोड दो, वजन घटा दो... और लडकी को इतना थका दो के लडकी थक के हा बोल दे! :P