मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा नक्कीच नाही!

लेखनविषय:
लेखनप्रकार
आदित्य कोरडे ह्यांनी ह्या विषयावर हा धागा काढला. त्यांना दुर्दैवाने प्रक्रियेत आलेला अनुभव हा नक्कीच चांगला न्हवता. आम्ही २०१३ मध्ये मूल (मुलगी) दत्तक घेतली तेव्हा आम्हाला आलेला अनुभव मात्र निश्चितच चांगला होता (काही थोडे सरकारी विलंब वगळता), म्हणून हि लेखमाला लिहितोय. ह्याचा उद्देश, आम्ही काही जगा वेगळे केले, किंवा इतर कुठलाही नाही, तर आम्हाला मिळालेले मार्गदर्शन, सल्ले आणि आलेले अनुभव इतरांशी शेयर करून, त्यांना त्यातून प्रोत्साहन आणि योग्य दिशा मिळवी एवढाच हेतू आहे.

आरक्षण!

लेखनविषय:
लेखनप्रकार
आरक्षण ह्या विषयावर काहीही बोलायचं किंवा लिहायचं म्हणजे हल्ली जरा अवघडच झालं आहे. यामधून आरक्षण विरोधी किंवा आरक्षण समर्थक अशा दोन्हीकडच्या लोकांच्या शिव्या खायला मिळण्याचाच संभव अधिक कारण मी आरक्षण समर्थक नाही तसाच सरसकट आरक्षण विरोधकही नाही पण मी यावर बरंच वाचलं आहे.(चर्चा करण्या पेक्षा का कोण जाणे मला हा मार्ग जास्त भरवशाचा वाटतो) आणि आरक्षणाची गरज मला पटलीही आहे.सर्वसाधारणपणे आरक्षण समर्थनाची भूमिका घेणे तुम्हाला पुरोगामी म्हणून सादर करते आणि बऱ्याच लोकांना स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणे आवडते.

खेल कबड्डी

लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकत्याच भारतात झालेल्या आणि भारताने विजेतेपद राखलेल्या कब्बडी विश्वचषकानिमित्त मनात आलेले विचार खरडतोय. मिपा वर हा माझा लेखाचा पहिलाच पर्यटन.चू.भू. द्यावी घ्यावी :) "जिता दिल इंडिया का , अब जीत गये दुनिया, प्रेम के साथ देखो, जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!!" टीम इंडियाचा कबड्डी संघ विश्वचषक उंचावत असताना ह्या जिंगलचे पार्श्वसंगीत वाजत होते.त्या आधी अंतिम सामना जिंकल्यावर हिंदी समालोचक अपना खेल, अपना देश, अपना कप असे काहीसे उत्साहात ओरडत होता. मनात विचार आले की किती खऱ्या आहेत ह्या गोष्टी ..

शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती! भाग २

लेखनविषय:
लेखनप्रकार
२. समाजाभिमुखता (सामाजिक उद्दिष्ट ) माणूस हा समुहात रमणारा प्राणी असल्यामुळे लहानपणापासून त्याचे सामाजिक शिक्षण सुरु झालेलेच असते. सामाजिक शिक्षण घेण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे समाजात मिसळणे, अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येणे आणि लहान वयात हे शाळेत सगळ्यात उत्तम तऱ्हेने होते. शाळेतल्या वर्गात काय शिकवतात! हा वादाचा मुद्दा असू शकतो पण तिथे ४०-५० मुलांमध्ये, सदासर्वकाळ आपल्या पाठीशी असणाऱ्या आई वडिलांच्या छत्रछायेशिवाय स्वतःच्या हिम्मतीवर एखादे मूल इतर मुलांशी कसे वागायचे, बोलायचे हे स्वत: ठरवते, शिकते..

द कॅमब्रियन पट्रोल

लेखनविषय:
लेखनप्रकार
जगातल्या सर्वोत्तम आर्मी सर्वोत्तम कश्या ठरतात ? त्यांना पहिली किंवा दुसरी जागा कशी दिली जाते, कुठल्या क्षेत्रात दिली जाते? हे मानांकन कसे ठरते, ह्या संबंधी आपल्याला खूप कुतूहल असते, कारण कोण्या एकाला सर्वोत्तम म्हणावे तर त्याची दुसऱ्या सोबत झोंबी व्हायला हवी, आर्मीच्या बाबतीत अशी झोंबी म्हणजे युद्ध, ते पैसा मानवी जीवन अन वेळ तीनही मोर्चांवर खर्चिक अन भयप्रद असते, मग एखादी फौज सर्वोत्तम आहे हे कसे ठरवतात ? ह्याला उत्तर म्हणजे ते ठरवायला आजकाल आयोजित केले जाणारे संयुक्त अभ्यास, तसे पाहता आपापले मित्रदेश पकडून आजकाल प्रत्येकच देश संयुक्त अभ्यास करतो, मग परत जागतिक नामांकनांची पंचाईत होऊ शकते.

जो अभ्यास करेल तो पास होईल

लेखनविषय:
लेखनप्रकार
विजय कोणाचा आमच्या देशावर अनेक परकीय आक्रमकांनी आक्रमण केले. त्यामधे बाबर होता, अहमदशहा अब्दाली होता. हे सगळे आक्रमक मुस्लिम होते म्हणून आम्ही याचे वर्णन ईस्लामिक आक्रमण असे करतो. आता प्रश्न असा आहे की या आक्रमणांमागे ईस्लामची प्रेरणा होती का आणि विजय मिळाला असेल तर तो ईस्लामच्या तत्त्वज्ञानाचा विजय मानायचा का म्हणजे मग ईस्लाम विरुद्ध हिंदू तत्त्वज्ञान असा सामना झाला का . . ईस्लामला मानणारे जे देश आहेत उदा बांगलादेश, पाकिस्तान.

धोनी - ऐसी न कोई होनी

लेखनविषय:
सतीश राजवाडेंचा प्रेमाची गोष्ट चित्रपट पहिला असेलच !!! त्यात राजवाडेंचा एक संवाद आहे चित्रपटाचे शीर्षक कसे क्लिअर पाहिजे त्यातून लोकांना कोडी घालत बसू नयेत. " एम. एस . धोनी - the untold story " हे शीर्षक चित्रपटाला साजेसेच आहे. ह्या चित्रपटात " मेरे नाम में भी महम्मद है " वा " किसीको इतना भी मत डराओ ....

लग्नासाठी नकार- मजेशीर कारणे

लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या एक मित्राचे हात पिवळ करण्याचे त्याच्या पालकांनी ठरवलय. मागच्याच महिन्यात मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची बोनी झालिये. २८ वर्ष वय, MBA, बऱ्यापैकी देखणा, सधन कुटुंब,भरपूर बागायती शेती, पुण्यात आईटी मधे नोकरी, चांगला पगार,५;९ उंची लग्नाच्या बाजारात मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत असे ऐकून होतो. (माझ्या बाबतीत मात्र पहिल्याच फटक्यात पोरगी गटवली.

“मेरे प्रिय आत्मन् . . ."

नुकतीच इथे ओशोंवर झालेली चर्चा वाचली. अनेकांनी मांडलेले विचार बघितले. छान वाटलं. त्यातून थोडी भर घालावीशी वाटली व म्हणून इथे लिहितोय. . . ओशो. . . . जुलै २०१२ च्या शेवटी ओशो आयुष्यात आले. . योगायोगाने पहिल्याच प्रवचनांमध्ये ध्यान सूत्र ही प्रवचन मालिका मिळाली. तिथून नंतर मग 'एस धम्मो सनंतनो', 'संभोग से समाधी तक', 'ताओ उपनिषद', 'अष्टावक्र महागीता', 'मै कहता आखं देखी' आणि इतर अनेक प्रवचन मालिका ऐकल्या. . . अजूनही रोज प्रवचन ऐकतोय. त्यातून इतकं काही मिळत गेलं आणि मिळतं आहे की, जुलै २०१२ पासून एक नवीनच जीवन सुरू झाल्यासारखं वाटतं. . . .

छंदांतून अर्थार्जन अथवा आवडीचे व्यवसायात रूपांतर

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, बऱ्याच जणांना काही छंद असतात, किंवा वैयक्तिक आवडीनिवडी असतात ज्याचे रूपांतर व्यवसायात केले जाऊ शकते अथवा केलेले असते. अशा लोकांच्या वाटचालीची माहिती मिळवण्यासाठी हा धागा काढतो आहे. मला वैयक्तिकरित्या अश्या लोकांचे कौतुक वाटते. आपल्या पैकी काही लोक जर असे व्यवसाय/ अर्थार्जन करत असतील तर जरूर माहिती द्यावी. अर्थार्जन हा मुख्य हेतू नसलेल्या पण कामाचे समाधान देण्याऱ्या व्यवसायाबद्दल पण माहिती आली तर उत्तमच ,प्रत्येक वेळेला पैसे हा घटक महत्वाचा असेलच असे नाही.
Subscribe to विचार