मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

दिवाळी अंक २०१५: आवाहन

संपादक मंडळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर हो, गेल्या ३ वर्षातील यशस्वी दिवाळी अंकाप्रमाणे आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे लेखन दिनांक १५/१०/२०१५ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती.

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ ·
मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

माझी दिवाळी

संपादक मंडळ ·
नमस्कार मिपाकरहो, दिपावली अभिष्टचिंतन! कोणताही सण आला की आपण तो साजरा करताना आई काय करत असे किंवा आज्जी कसे करत असे ते आठवून, त्यांना विचारून, पुस्तकात वाचून त्या पद्धती आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काहीवेळा सगळे साग्रसंगीत करायला जमते तर कधी गोष्टी शास्त्रापुरत्या कराव्या लागतात. दिवाळी हा आपल्यकडील मोठा सण समजला जातो. चार दिवस आपापले वैशिष्ठ्य टिकवून असतात. वाईट वृत्तीचा नाश करण्यापासून ते लक्ष्मीच्या पुजेपर्यंत तर सासरच्या नातेवाईकांपासून माहेरच्या नातेवाईकांची भेट घडवत हा सण आठवणींच्या सुखाची उबदार शाल मनावर अलगदपणे सोडून पुढील वर्षाची वाट पहायला लावतो.

मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३

संपादक मंडळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते.

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

महिरावण ·
बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता. दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले, "अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही." त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.

महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी स्मिताची सायकल यात्रा

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. माझी मैत्रीण स्मिता अशी सायकल राईड करणार आहे- महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी सायकल यात्रा स्मिता मंडपमाळवीचे गोवा ते मुंबई सोलो सायकलिंग मोहीमेची उद्दिष्टे सामान्यत: प्रबोधनासाठी बैठका, चर्चा, ब्रॉशर्स व परिसंवाद अशा माध्यमांचा वापर केला जातो. पण इतरही पर्याय असतात. जेव्हा आपण सायकलिंगसारख्या अगदी वेगळ्या माध्यमाचा वापर करतो, तेव्हा आपण अनेक लोकांसोबत संवाद साधू शकतो व एखादी गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. हे लक्षात घेऊन मी, स्मिता मंडपमाळवी गोवा ते मुंबई एकटीने सायकल यात्रा करणार आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं.

शशक | आवंढा

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माहूरगडाला निघालेल्या टूर-बसमध्ये काका सहप्रवाश्याला तावातावाने सांगत होते - 'कुणी सांगितलं आपल्याकडे स्त्रियांना किंमत नव्हती? अहो, गार्गी, मैत्रेयी या स्त्रियां ऋषिंच्या तोडीस तोड. ते स्त्रीमुक्ती वगैरे कौतुक आम्हाला सांगू नका लेको.. म्हणजे आपल्याकडे शिक्षण, समानता वगैरे आहेच.. आपल्या महान संस्कृतीत..खक्क..' वचावचा बोलून घसा कोरडा पडल्याने काकांना ठसका लागला.

मेरे प्यारे दुश्मन

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
प्रिय पाकिस्तानी क्रिकेट संघ, First things first. प्रिय म्हणालो म्हणून हुरळून जाऊ नका. जोपर्यंत सीमेपलिकडून एक गोळी काय - एक दगडही माझ्या देशाकडे येत असेल, तुम्ही खतपाणी घालत असलेला दहशतवाद एकाही भारतीयाला झळ पोहोचवत असेल, जोपर्यंत माझ्या देशाबद्दल विखारी, अमंगळ विचार करणारा एकही नेता तुमच्या देशात जिवंत असेल तोपर्यंत तुम्ही माझे शत्रूच राहणार आहात. अर्थात तुमच्या हुकूमतीच्या कट - कारस्थानांना टाचेखाली चिरडायला आमच्या intelligence agencies आणि आमची सेना समर्थ असल्याने सामान्य नागरिक म्हणून तुमचा देश आमच्या खीजगणतीतही येत नाही.

अ‍ॅटिट्यूड वाला मुण्डा!

जे.पी.मॉर्गन ·
लेखनविषय:
साल १९७५, भारताचा विश्वचषकाचा पहिला सामना. इंग्लंडनी ६० ओव्हर्समध्ये ३३५ धावांचं आव्हान ठेवलं तेव्हा न लढताच आपण शस्त्र टाकली. ना अनुभव, ना मानसिकता. तेव्हा एका विक्रमादित्यानं बॅटिंग केली तीच औपचारिकता पूर्ण करण्यासाठी. २०२ रन्सनी हारलो तरी निदान ६० ओव्हर टिकलो. किमान पूर्ण वस्त्रहरण नाही झालं. अगदीच अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेली नाहीत हेच काय ते समाधान. २००३ विश्वचषकाचा अंतिम सामना. ३६० धावांचं अशक्यप्राय आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरताना - हर्षा भोगलेंच्या शब्दांत सांगायचं तर "Somebody needed to TAKE ON McGrath" आणि ती जबाबदारी एका विक्रमादित्याने घेतली.

अनिरुध रविचंदर - वाढदिवसाच्या शुभेच्छा !

उपयोजक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तरुणाईला भुरळ घालणारे संगीत देणार्‍या संगीतकार अनिरुध रविचंदर उर्फ 'अनिरुध' याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. कोण हा अनिरुध? ते इथं वाचा.