Skip to main content

समीक्षा

तूर्तास महत्वाचे

लेखक निरन्जनदास यांनी शनिवार, 20/06/2015 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सोमवारपासून एका नव्या वैचारिक ठणाणाची सुरुवात होणारच आहे. पण त्या आधी काही मला महाजालच्या उत्खननात सापडलेल्या मौल्यवान नितांत सुंदर कोहिनूर हिऱ्यांचा शोध तुमच्या नजरेस आणावयाचा आहे. कदाचित तुमच्यातल्या काही खनकांन्ना आधीच हाती लागले असतीलही. पण मला नव्याने गवसल्याने ते आपणापुढे सादर करीत आहे. भक्तांनी लाभ घ्यावा.

मला आवडलेले संगीतकार भाग ४ - सज्जाद हुसैन

लेखक शशांक कोणो यांनी गुरुवार, 18/06/2015 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडलेले संगीतकार :- १ मदनमोहन मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्र मला आवडलेले संगीतकार :- ३ अनिल बिश्वास sajjad hussain संगीत काही लोकांच्या शरीरातून रक्तासोबत मिसळून वाहत असते. त्यांचा प्रत्येक श्वास संगीताने भारलेला असतो. त्यांच्या प्रत्येक शब्दात, कृतीत संगीत वसते.

मिएनमार प्रकरणाच्या निमित्ताने... आंतरराष्ट्रीय सैनिकी कारवाया आणि त्यातून दिले जाणारे संदेश

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 14/06/2015 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय सैन्याने मिएनमारच्या हद्दीतल्या अतिरेकी ठाण्यांवरच्या हल्ल्यांच्या बद्दल अनेक तज्ज्ञ आणि तथाकथित तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया येत आहेत. हे अपेक्षित आहे. जेवढी निरपेक्ष विश्लेषणे येत आहेत, त्यापेक्षा जास्त (या घटनेच्या दोन्ही बाजूने असलेल्या तज्ञांच्या व्यक्तिगत हितसंबंधांमुळे प्रत्येकाच्या आवडी-उद्येशा-प्रमाणे) तिखटमीठ मिसळलेली विश्लेषणे येत आहेत. हे पण अपेक्षितच आहे. कारण, अश्या प्रकारच्या, अंतिम परिणाम मिळविण्यासाठी नाही तर मुख्यतः संदेश देण्यासाठी केलेल्या कारवाईनंतर, तिचे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी, कारवाईच्या बाजूला असणार्‍या लोकांनी तसे करणे आवश्यक असते.

दिल धडकने दो

लेखक केतकी_२०१५ यांनी शुक्रवार, 12/06/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपासून झोया अख्तर ह्यांच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. ‘दिल धडकने दो’ चित्रपट आला आणि आम्ही ठरविले की सगळी कामे बाजूला ठेवून चित्रपटाला जायचे. कॉमेडी-ड्रामा जानरा असलेल्या ह्या चित्रपटाने तगडी स्टार कास्ट घेउन प्रेक्षकांच्या हृदयाचा ताबा घेतला आहे. झोया अख्तर ह्यांचे दिग्दर्शन आणि एकाहून एक दिग्गज कलाकार अशी सुरेली महफिल जमल्यावर उत्तम चित्रपट तयार होणार हे सांगणे न लागे! उच्च वर्गीय कुटुंबाची ही कथा आहे. नात्यानात्यांमधील हलके प्रसंग उत्तम प्रकारे मांडले आहेत. सुरवातीला थोडा स्लो वाटणार चित्रपट मध्यंतरानंतर वेग घेतो.

बखरींची सांगाव्यांचे अन पुराणातली वांग्यांचे नवे पुराण

लेखक माहितगार यांनी रविवार, 07/06/2015 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी आत्ताच एका श्रीलंकन (?) लेखकाचा "दि काँट्रीब्युशन ऑफ श्री लंकन हिस्टॉरीकल ट्रॅडीशन टू द रिकन्स्ट्रक्शन ऑफ हिस्टरी ऑफ अँशिएण्ट इंडीया(पिडीएफ-पेपर)" ऑनलाईन वाचला. त्यातील टिकेची दखल घेण्याच्या निमीत्ताने, माझे हा नवपुराणाचा धागा बखरींची सांगी अन पुराणातली वांगी या पहिल्या पाना-धाग्या-वरून पुढे नेत आहे. मागच्या धागा चर्चेत वचन 'पुराणातील वांगी' नव्हे, तर 'पुराणातील वानगी' असे आहे हे काही जणांनी आवर्जून सांगितले.

कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१० निकाल

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 07/06/2015 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
मी हा निकाल कसा लावला याबद्दल प्रथम थोडेसे... मी कोणाचे फोटो आहेत हे न बघता एका फोल्डरमधे सेव्ह केले. ते फोल्डर नंतर Adobe Bridge मधे ओपेन केले व त्याचे १ ते पाच असे मानांकित केले. ज्याला पाच स्टार होते ते एकत्र केले व ते परत १-५ या स्केलवर मानांकित केले. त्यातून तीन फोटो निवडले ते क्रमांकानुसार खालील प्रमाणे. क्रमांक एक : सर्वसाक्षी क्र्मांक दोन : मोहनराव क्रमांक तीन : अभिदेश व स्पा (दरवाजा) काम अवघड होते. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बर्‍याच जणांचे जे फोटो स्पर्धेसाठी टाकले नव्हते ते अधिक चांगले होते.

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

तनू वेड्स मनू रिटर्न

लेखक पुणेकर भामटा यांनी शनिवार, 30/05/2015 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो काल तनू वेड्स मनू रिटर्न पाहिला, पहिला असा चित्रपट जो मला अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत आवडला. साधी आणि सुंदर कथा, मोजक्याच व्यक्तिरेखा, चांगले कलाकार, नैसर्गिक अभिनय, साधे संवाद, साधी लोकेशन्स, प्रसंगानुरूप गाणी आणि योग्य सादरीकरण. चित्रपटाची कथा सांगावी अशी नाही ती प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन अनुभवावी अशी आहे. चित्रपटात कुठेही ओढून ताडून केलेले विनोद नाहीत किवा प्रेक्षकांच्या भावना पिळवटून रडवाणूक नाही. शेवटचा प्रसंग तर अतिशय उत्कृष्ट रित्या हाताळला आहे.

शिक्षणाच्या नावानं चांगभलं !

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 29/05/2015 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणाच्या नावानं चांगभलं ! ( मध्यंतरी R. H. Reeves या शिक्षणतज्ञाची ‘The Animal School’ ही कथा वाचनात आली. तशा बऱ्यापैकी माहित असलेल्या या कथेचे मराठीकरण आणि डिटेलीकरण करून आपल्या समोर ठेवत आहे! लवकरच आपल्याही मुलांच्या शाळा सुरु होतील! हे औचित्य साधून आपणही निरीक्षणं, नोंदी आणि आत्मपरीक्षण करायला काय हरकत आहे?) आधुनिक जगातील आव्हानांना समर्थपणे भिडता यावे म्हणून जंगलात, प्राण्यांसाठी एक शाळा सुरु करायचे ठरले. शाळा म्हटले कि अभ्यासक्रम आला! त्यांनी मग परंपरेला छेद देत, विविध क्षमतांचा विकास करणारा क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम सुरु केला.