Skip to main content

समीक्षा

उर्जा घड्याळ

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 26/05/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
कांही वर्षांपुर्वी विद्युत उर्जा मोजणी आणि विजेची अभियांत्रिकी हिशेब तपासणी या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. त्याकाळी आम्ही (पक्षी: टीम)ठिकठिकाणी फिरून विविध संस्था, उद्योग, पाणीपुरवठ्याची पंपिंग केंद्रे, साखर कारखाने , रस्त्यावरचे दिवे यांचे उर्जा परीक्षण करत असू. उर्जा म्हणजेच पैसा … त्यामुळे निर्मिती, वितरण, गळती , यातली मोजणी आणि वसुली यात प्रचंड तफावत असते. वीजेच्या वितरणामधून कोट्यावधीचे घोटाळे राजरोसपणे सुरु असतात, '' घोटाळा आवडे सर्वांना '' हे आपलं अघोषित ब्रीदवाक्य असल्यागत सगळं सुरळीत चालू असतं.

आजकी ताजा खबर - ठाण्यात झाली "पोपट" पंची म्हणजेच एक ठाणे कट्टा…अगदी अचानक !!

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 17/05/2015 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
आपला मिपा वार्ताहर : ठाणे दि १७ मे २०१५ - श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या सायकलचा आणि तदनुषंगाने तंदुरुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या महन्मंगल कार्यास आपणही थोडा हातभार लावावा (आणि आपला पृथ्वीवरचा भार जमेल तितका कमी करावा) या हेतूने मिपावरचे सध्याचे आकर्षणकेंद्रबिंदू श्री. टका यांच्या साथीने "सायकलरजनीफेरी" काल रात्री चालू होती (आमचे अहोभाग्य हो !!). आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना टकाच्या भ्रमणध्वनीवर डॉ. खरे यांचा फोन आला (तो त्यांचा फोन आहे हे मला नंतर कळले ).

प्रताधिकार कायदा: अस्पष्टता, गल्लत, गफलती, विरोधाभास इत्यादी

लेखक माहितगार यांनी सोमवार, 04/05/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
कायदे मंडळांपुढे मंजुरीसाठी बहुतांश कायदे शासन यंत्रणा आणत असली तरी श्रेय कायदे मंडळांना जाते पण कायदेमंडळांच्या विशेषाधीकारांमुळे कायद्यात काही उणीवा शिल्लक राहील्यास उणीवांवर टिका करता येते, पण कायदेमंडळातील सदस्यांच्या कारभाराकडे बोट दाखवणे कठीण असते. भारत सरकारकडची कायदे तयार करणारी यंत्रणा, (सर्वोच्च न्यायालयातील अनेक वकील मंडळी सरकार दरबारी आणि विरोधी पक्षात आणि संसदेत मोठ मोठे मानमरातब मिरवत असतात) त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या समीत्या संसद सभागृह, कायदे राबवणारी यंत्रणा या सर्वातून जाऊन बहुतेक सर्व शुद्धीकरण करूनच कायदे बाहेर येत असावेत.

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

कोर्ट- एक समंजस चित्रभाषा.

लेखक अंतरा आनंद यांनी सोमवार, 27/04/2015 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपटात नायक किंवा नायिका किंवा दोघे असतात. चित्रपट आपल्याला त्यांची गोष्ट सांगतो किंवा एखादी गोष्ट त्यांच्या नजरेतून दाखवतो. ’कोर्ट’ मध्ये ’सिस्टीम’ हेच सिनेमाचं मुख्य पात्र आहे. लोकशाहीर, वकिल, न्यायाधीश आणि त्यांच्या आजूबाजूचे सगळेच या सिस्टीमच्या आधारे वावरणारी दुय्यम व्यक्तीरेखा आहेत. हा सिनेमा कोणा एकाची गोष्ट सांगत नाही तर ह्या सगळ्यांचे टेकू असलेली तरिही सगळ्यांच्या जगण्यातला महत्वाचा भाग असलेली सिस्टीम आहे तशी दाखवतो. इथे सिस्टीमच नायक आहे आणि खलनायकही.

भृगुसंहितेच्या शोधात... 2

लेखक योगविवेक यांनी रविवार, 26/04/2015 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, या यात्रेतील महत्वाचा भाग होता की मेरठ, लखनौ, प्रतापगढ व साहरनपुरला भेट देऊन तेथील भृगुशास्त्रीकडील संहिता पत्रांची माहिती व जमल्यास गोडीगुलाबीने त्यांच्याकडील पट्ट्यांचे फोटो काढून पट्ट्यांचे करायला प्रवृत्त करणे. सहारनपुरच्या केंद्रात केदारनाथ प्रभाकर यांच्या मुलाने 'सध्या रामनवमीमुळे वडील भेटू शकणार नाहीत' म्हटल्यावर पालम विमानतळावरून सरळ आम्ही मेरठच्या डब्बा गाडीत बसायला आयएसबीटी वरून चढलो. ही गर्दी, घाम येणारी गर्मी, त्यात गावागावातून झुंडीच्या झुंडी आसपासच्या गावात लागलेल्या मेळ्यात जायला ट्रॅक्टरचे ट्रेलर भरभरून जाताना पाहून रामनवमीच्या गर्दीचा हिसका आम्हाला कळून आला.

भृगूसंहितेच्या शोधात... १

लेखक योगविवेक यांनी बुधवार, 22/04/2015 23:55 या दिवशी प्रकाशित केले.

भृगूसंहितेच्या शोधात...

नेपाळ व उत्तर भारत यात्रेचा संक्षिप्त अहवाल

सादरकर्ताः विवेक चौधरी.

a जीवावर उदार होऊन अनेक संकटांना तोंड देत समुद्रसफरीवर निघालेल्या सिंदबादच्या सुरस कथा आपण बालपणी वाचल्या व ऐकल्या असतील. जीव घेणा नसला तरी असाच अदभूत घटनाक्रमात घडत गेलेला प्रत्यक्ष शोध प्रवास आपल्यासाठी सादर. नेपाळमधील काठमांडू विमानतळावर उतरल्यावर जायचे कुठे व भेटायचे कुणाला अशा साध्या प्रश्नांचे उत्तर ठाऊक नसलेल्या प्रवासात मी, जळगावचा नाडीग्रंथ प्रेमी - विवेक चौधरी, ओक सरांच्या सोबत या यात्रेला निघालो.

समतेचा संदेश देणारं नाटक : कोण म्हणतं टक्का दिला ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 19/04/2015 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
कला शाखेच्या पदवीच्या वर्गाला अभ्यासक्रमात असलेल्या नाटकावर खूप दिवसापासून लिहायचं ठरलं होतं. अभ्यासक्रम बदलला पण लिहिणं काही होत नव्हतं. आज नाटकावर लिहिलंच पाहिजे असं वाटलं म्हणून कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाचा हा परिचय. कोण म्हणतं टक्का दिला ? हे लेखक संजय पवार यांचं नाटक. दलित नाट्यक्षेत्रात न आलेला एक वेगळा विषय नाटककार, दिग्दर्शक संजय पवार यांनी हाताळला आहे. नाटकाचे मूळ उद्दिष्ट समाजातील विषमता समोर आणून समतेचे बीज रोवले जावे. आणि म्हणूनच हे नाटक वेगळे ठरते. नाटकाच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात लेखकाने देव आणि राक्षस यांच्या मनोभूमीतून काही पात्रे रंगविली आहेत.

कोर्ट

लेखक सव्यसाची यांनी रविवार, 19/04/2015 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
(ज्यांनी अजून हा चित्रपट पहिला नसेल त्यांनी आपल्या जबाबदारीवर पुढील उतारा वाचावा. ) (मी पहिल्यांदाच चित्रपटाबद्दल लिहित आहे. तेव्हा चूभूद्याघ्या) काही दिवसांपूर्वी बीफोर सनराईज पाहत होतो. त्यातील नायक नायिकेला एका मालिकेची कल्पना सांगतो. जगभरातून ३६५ लोकांना निवडायचे आणि त्यांचा एक दिवस, त्या दिवसामध्ये ते कसे जगतात, काय करतात हे २४ तासासाठी शूट करायचे आणि दाखवायचे. यावरती नायिका पण हसते कारण आयुष्यातील त्याच कंटाळवाण्या, दैनंदिन गोष्टी परत पाहणे म्हणजे कठीण आहे.