Skip to main content

समीक्षा

मसान: एक आधुनिक शोकात्मिका

लेखक ए ए वाघमारे यांनी शुक्रवार, 02/10/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर बरेच दिवसांनी आलो.म्हणून वाटलं जरा जुन्याच लेखापासून सुरूवात करू. ******************************************** मसान: एक आधुनिक शोकात्मिका ‘मसान’ या अनुराग कश्यप स्कूलमधून निघालेल्या नव्या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय नाव आहे ‘फ्लाय अवे सोलो’. आणि हेच शीर्षक अधिक समर्पक आहे असं ‘मसान’ बघितल्यावर वाटलं. मसान नावावरून या चित्रपटात काहीतरी स्मशानासंबंधी, भुताखेताचं , अतर्क्य, गूढ कथानक असेल असा समज होण्याची शक्यता आहे. पण ही कहाणी तशी नाही.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

मराठी चित्रपट - "तू ही रे"

लेखक समीर_happy go lucky यांनी गुरुवार, 01/10/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
तू हि रे (मराठी) मराठी चित्रपट जेंव्हा तुम्ही बघायला जाता तेंव्हा निर्विवादपणे तो "प्रेम" या सदैव बहारदार विषयावर बेतलेला असतो पण जर उत्तम दिग्दर्शन अन अप्रतिम संगीत (गीतांसकट आणि पार्श्वसंगीतासह) यांची साथ लाभली तर वर वर ठिसूळ वाटणारी कथा अप्रतिमरित्या चितारल्या जाऊ शकते याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे "तू हि रे" . मराठी चित्रपट हा बर्याच वेळा प्रेक्षकांना आजूबाजूला घडणाऱ्या वास्तविकतेशी साधर्म्य सांधणारा जाणवतो. आणि याच कारणामुळे कदाचित बरेच मराठी चित्रपट तग धरतात कारण मराठी मानसिकता स्वप्नाळू नाही. तुम्ही काहीही दाखवलं तर ते चालून जाणार नाही.

दिवाकरांच्या नाट्यछटा

लेखक खेडूत यांनी बुधवार, 30/09/2015 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी! शतशब्दकथा लिहून आणि वाचून आपणा सर्वांना भरपूर विरंगुळा मिळाला असेल.असाच काहीसा, पण शब्दमर्यादा नसलेला, मराठी साहित्यातला एक वेगळा अन जुना प्रकार म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटा. का कोणास ठाऊक, पण शतशब्दकथा आणि नाट्यछटा यांच्यात काहीतरी नातं- साम्य तरी आहे असं नेहमी वाटतं . मागे २०१२ मधे पुण्याला सकाळ वृत्तपत्रातर्फे मुले आणि मोठ्यांसाठी एक नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली. त्यात दिवाकर यांच्या मूळ आणि काही नव्या लेखकांच्या नाट्यछटा सहभागी झाल्या होत्या. हे अन्य लेखक प्रसिद्ध नसल्याने असेल, पण मोठ्या संख्येने सहभाग असूनही त्या नाट्यछटा वाचकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत.

एक होती मुंबई.. ("Mumbai Fables")

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 30/09/2015 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
पोर्तुगीज व्यापारी लोकांची भारताला सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी मुंबई शहराचा पाया रचला. ते मुळात सक्तीने धर्मप्रसार करायला आले होते. १५०९ साली फ्रान्सिस्को अल्मेडाने मुंबई बेटावर पहिली धाड घातली आणि स्थानिक लोकांना लुटले. अनेकांना जबरदस्तीने किरिस्तांव केले. पुढे अशाच धाडी पडत गेल्या आणि १५३२ साली नुनो डाकुन्हाने गुजरातच्या सुलतानाला हरवून वसई काबीज केली. मुंबईची सुरुवात ही अशी झाली. अमेरिकावासी लेखक ज्ञानप्रकाश यांनी लिहिलेले "Mumbai Fables" हे पुस्तक मायानगरी मुंबईच्या आजपर्यंतच्या प्रवासाचा वेध घेते. इतिहासही किती रोचक, रोमहर्षक आणि वाचनीय असू शकतो याचा धडा म्हणजे हे पुस्तक.

कॅलेंडर गर्ल्स

लेखक सुजल यांनी मंगळवार, 29/09/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
कॅलेंडर गर्ल्स माझ्या मते मधुर भांडारकर ने दोनतीन वर्षांपूर्वीच डिक्लेयर केलाय. मी या या विषयावर चित्रपट काढणार आहे म्हणून . त्याच सगळ वेल प्लाण्ड व्यवस्थित अभ्यास करून चित्रपट असतात हे सांगायला नकोच . अर्थात त्याच्या चित्रपटांचा प्लॉट ही ठरून गेलाय. रियल लाईफ वर आणि जास्त करून सेलिब्रिटी वर्ड मध्ये जे काय चाललेलं असत त्या वर्ड मधल्या भानगडी / त्या वर्ड मध्ये शिरण्या करता कराव्या लागणाऱ्या उचापत्या /त्या वर्ड मध्ये "औट ऑफ द वे" जाऊन कराव्या लागणाऱ्या तडजोडी . ग्लॅमर वर्ड मधला नाटकीपणा या सगळ्याच मिश्रण करून त्याचे सिनेमे असतात.

चित्रपट परिक्शण - किस किस को प्यार करु

लेखक समीर_happy go lucky यांनी सोमवार, 28/09/2015 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
लोकप्रिय विनोदी मालिकाकार कपिल शर्मा हे अभिनेते बनले असून “किस किस को प्यार करू” या अब्बास-मस्तान यांच्या विनोदपटातून त्यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झालेले आहे. अब्बास-मस्तान ही जोडगोळी म्हणजे सामान्य प्रेक्षकांना आठवेल बाजीगर,खिलाडी,अजनबी अन रेस. पण किस किस को प्यार करू मध्ये नाट्यमय कथा नाही, action नाही, संगीत नाही.

सुंदर पिचाईंच्या स्वागत संदेशा निमित्ताने

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/09/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुगल प्रमुख सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सिलिकॉन व्हॅलीच्या भेटी निमित्ताने स्वागत संदेशगुगल इंडीयाच्या युट्यूब चॅनलवर ठेवला आहे. एकीकडे बॉबी जिंदाल सारखा अमेरीकन रिपब्लीकन राजकारणी जो स्वतःची भारतीय मुळे लपवायचा प्रयत्न करत आहे तिकडेच सुंदर पिचाईंसारखा तरूण सिइओ, लोकं काय म्हणतील वगैरेचा विचार न करता, गुगल इंडीयाचॅनलवर मोदींचे स्वागत करतो, हे नक्कीच स्वागतार्ह आहे. भारतीय असणे हे न लपवणे, मोदींचे स्वागत हे माझ्या दृष्टीने किरकोळ मुद्दे आहेत...

चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी

लेखक खेडूत यांनी बुधवार, 23/09/2015 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी भाग -१ भाग -२ भाग -३ भाग -४ भाग -५ भाग -६ मागील सहा भागांमध्ये आपण ऑटोमोटिव्ह क्षेत्रातल्या काही घडामोडी आणि त्याचं आर्थिक गणित थोडक्यात पाहिलं. सध्या कधी नव्हे तो वाहन उद्योग भारतात फोफावला आहे.

एक तारा विझताना ("राजेश खन्ना: द डार्क स्टार")

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 21/09/2015 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
(काही दिवसापूर्वी नसीरुद्दिन शाहच्या आत्मचरित्रावर इथे लिहिलं होतं. त्याला बरेच प्रोत्साहनपर प्रतिसाद मिळाले. त्यामुळे आणखी एक पुस्तक-परिचय लिहिण्याचे धारिष्ट्य करीत आहे. हेही पुस्तक सिनेमाबद्दल आहे, हा केवळ योगायोग.) सत्तरदशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या आम्हाला सिनेमा या पदार्थाची लज्जत हळूहळू समजायला लागली, तेव्हा अमिताभ बच्चन त्रिखंड व्यापून राहिल्यागत होता. इतर अभिनेते खिजगणतीत नव्हते. प्राथमिक शाळासोबत्यांमध्ये पंखे फक्त आणि फक्त अमिताभ बच्चनचे असत.