बखरींची सांगाव्यांचे अन पुराणातली वांग्यांचे नवे पुराण
- एकाच नावाच्या वेगवेगळ्या व्यक्तींची सरमिसळ करणे
- राजे, ऋषी आणि इतर व्यक्तींची त्याच नावाच्या दंतकथातील व्यक्तींसोबत सरमिसळ करणे
- वेगवेगळ्या काळात फरक न करणे, आणि विभीन्नकाळात होऊन गेलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींची काळाचा क्रम चुकवून सरमिसळ करणे अथवा त्यांना लेखनात सद्यकालीन व्यक्ती म्हणून दाखवणे
- वेगवेगळ्या काळात फरक न करणे, आणि विभीन्नकाळात होऊन गेलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींची काळाचा क्रम चुकवून सरमिसळ करणे अथवा त्यांना लेखनात सद्यकालीन व्यक्ती म्हणून दाखवणे
- वास्तव आणि दंतकथातील फरक मिटवणे
- नैतिक अथवा धार्मिक संदेश फॅब्रीकेट करण्या(थोपवण्या)साठी ऐतिहासिक परंपरेतील व्यक्ती अथवा घटनांच्या उल्लेखांचा उपयोग करणे
In reply to लेख प्रस्तावनेसारखा वाटला. by एस
कारण भारतीय इतिहास तीसफूट उंचीच्या आणि तीस हजार वर्षे राज्य करणार्या राजांच्या नावांनी भरलेला आहे.हे जर सत्य असेल तर? कारण हे सत्य नाही असं सांगणारा कोणताच पुरावा सध्या उपलब्ध नाही. जो पर्यंत ते दोन्ही पैकी एका बाजूनं सिद्ध होत नाही, तोपर्यंत तो एक "असू शकणारा पर्याय" आहे.
In reply to तुमच्या संपूर्ण लेखाबद्दल मी by काळा पहाड
तोपर्यंत तो एक "असू शकणारा पर्याय" आहे.:)
In reply to तोपर्यंत तो एक "असू शकणारा by माहितगार
In reply to माहितगार, तुमच्या या मोठ्ठ्या by हाडक्या
In reply to माहितगार, तुमच्या या मोठ्ठ्या by हाडक्या
In reply to हाडक्याजी, by काळा पहाड
मी सायन्स चा माणूस आहेअसं म्हणून आमच्या गावातले प्रवचनकार चमत्कार आणि इतर बरेच काही सिद्ध करत ते आठवलं. पण ते असो. अवांतर नको. :)
पण जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत कुठलीही थियरी बरोबर अथवा चूक असू शकते.हो पण म्हणून Absence of Evidence Is Evidence of Absence, हे पण लक्षात घ्या ना.. उ.दा. आता "क्ष" नावाच्या जैविकदृष्ट्या पुरुष म्हणून सिद्ध झालेल्याच्या पोटात बाळ आहे असा कोणाचा दावा असेल तर ते नसल्याचा "पुरावा नाही" म्हणून ते "असू शकेल" असे म्हणणार काय ? अगदी गृहितक म्हणून मानण्यास हरकत नाही पण दावा करणारा ते वैज्ञानिक संशोधन म्हणून पुढे करु शकत नाही. जर कोणाला असे वाटत असेल की " क्ष नावाच्या पुरुषाच्या पोटात बाळ आहे" तर ते सिद्ध करावे (होऊ द्यावे) अन्यथा तोवर "पुरुष हे गर्भधारणा करु शकत नाहीत" हेच सिद्ध झालेले सत्य स्वीकारणे योग्य नाही का ? (हे एक फक्त मुद्दा स्पष्ट करण्यास उदाहरण आहे आणि त्यावर चर्चा नकोय) विज्ञानाच्या दृष्टीने "शक्यता" ही सिद्धता होत नाही एवढेच सांगायचे आहे. जरी कोणास म्हणायचे असेल की "पूर्वी पंख असलेले उडणारे मानव होते" तरी हरकत नाही परंतु "असु शकेल" म्हणून त्यास इतिहास अथवा वैज्ञानिक संशोधन म्हणून दाखवणे चूकच ठरेल. मला वाटतं, माहितगार यांचा हा मुद्दा आहे आणि "असू शकेल" म्हणून "आत्ता" या गोष्टी अधिकृत होऊ शकत नाहीत, होऊ नयेत.
In reply to का.प. साहेब, by हाडक्या
असं म्हणून आमच्या गावातले प्रवचनकार चमत्कार आणि इतर बरेच काही सिद्ध करत ते आठवलं. पण ते असो. अवांतर नको. :)एखाद्याला झटकून टाकायची ही पद्धत आवडली. बाकी माझी तुलना चमत्कारी आणि भोंदू लोकांशी केल्याबद्दल गंमत वाटली. असो.
विज्ञानाच्या दृष्टीने "शक्यता" ही सिद्धता होत नाही एवढेच सांगायचे आहे. जरी कोणास म्हणायचे असेल की "पूर्वी पंख असलेले उडणारे मानव होते" तरी हरकत नाही परंतु "असु शकेल" म्हणून त्यास इतिहास अथवा वैज्ञानिक संशोधन म्हणून दाखवणे चूकच ठरेल. मला वाटतं, माहितगार यांचा हा मुद्दा आहे आणि "असू शकेल" म्हणून "आत्ता" या गोष्टी अधिकृत होऊ शकत नाहीत, होऊ नयेत.मी कोणतीही गोष्ट "इतिहास अथवा वैज्ञानिक संशोधन" म्हणून दाखवत नाहीये. मी कोणतीही गोष्टी "अधिकृत" सुद्धा मानत नाहीये. पण या सारख्या गोष्टी केवळ आपल्याला आपल्या बुद्धी नुसार पटत नाहीत म्हणून त्यांना नाकारणे ही एक संशोधनातली चूक ठरू शकते, कारण त्यामुळे आपण एकाच चाकोरीत विचार करतो. आत्ता पर्यंत लागलेले सगळे प्रमुख शोध हे चाकोरीबाहेर विचार केल्याने (थिंकिंग आऊट ऑफ द बॉक्स) लागलेले आहेत. ३० फुट उंचीचे मानव हे फक्त एक उदाहरण आहे. मला असं म्हणायचंय की अशा गोष्टींना केवळ त्या सध्या प्रमाण नाही म्हणून संशोधन करण्यापूर्वीच नाकारणं हे धोकादायक आहे. कदाचित ३० फुटी मानव हे माझ्या मुद्द्याचं एक अतिरेकी उदाहरण असेलही पण ही वृत्ती संशोधनात असणं चांगलं नाही.
In reply to असं म्हणून आमच्या गावातले by काळा पहाड
In reply to असं म्हणून आमच्या गावातले by काळा पहाड
अशा गोष्टींना केवळ त्या सध्या प्रमाण नाही म्हणून संशोधन करण्यापूर्वीच नाकारणं हे धोकादायक आहेअगदी अगदी.. पण स्वीकारणं ही तितकंच धोकादायक आहे ना. आणि आपल्याकडे तसेच स्वीकारावे म्हणून अपेक्षा दिसते तिच्याबद्दल माझा आक्षेप आहे. ३० फूटी माणूस असो वा पुष्पक विमान (हे इतिहास/संशोधन मानायचे असतील तर) अथवा भवानी तलवार, इतिहासात/ संशोधनात तथ्यांऐवजी इतर घुसडलेल्या गोष्टी या पुराव्याशिवाय "आम्ही म्हणतो म्हणून"/"असू शकतील म्हणून" स्वीकाराव्या हे मान्य नाही. असो, माहितगार तुम्ही लेख लिहिला आहे तेव्हा "नरो वा कुंजरो वा" अशी युधिष्ठीरी भुमिका घेणे शोभत नै हो. "३० फूटी माणूस" हे उदाहरण एक "उदाहरण" म्हणूनच घेतले आहे. पण मॅकॉलेचा पुर्वग्रह वगैरे मांडण्याचे प्रयोजन स्पष्ट होत नाही. अगदी तो पूर्वग्रह मान्य केला तरी तथ्य खालसा होत नाही मग तुम्ही मांडलेली तथ्ये कशास मांडली आहेत ते तरी स्पष्ट करा.
In reply to का.प. तुम्हाला झटकून टाकत नै by हाडक्या
माहितगार तुम्ही लेख लिहिला आहे तेव्हा "नरो वा कुंजरो वा" अशी युधिष्ठीरी भुमिका घेणे शोभत नै हो.नाही सरजी 'नरो वा कुंजरो वा' चा प्रश्न मुळीच नाही. माझ्या कडे असलेल्या काही मुद्यांना आपण अधीक उत्तमपणे न्याय देताय हे पाहीले, माझे उर्वरीत मुद्दे मी इतर अजून कुणाच्या काही प्रतिक्रीया येताहेत का ते पाहून एकत्रित प्रतिसादात देण्याच्या प्रतिक्षेत होतो एवढेच. धागा लेखातील माझ्या उल्लेखातून मॅकॉलेचे नाव राहून गेले होते, संदर्भ मागणार्या लेखातीलच संदर्भ चुकीचे आहेत असा आक्षेप येण्याच्या आत खुलासा केला. विषय कुणी जास्त खोदायचे ठरवल्यास, दुसरा मुद्दा ३० फुट उंचीचा माणूस आणि ३०००० वर्षे जगलेला राजा मॅकॉलेला भारतातल्या नेमक्या कोणत्या साहित्यात दिसला असा प्रश्न उभा राहून भारतातल्या अतीरंजनाची मॅकॉलेची थट्टा अतीरंजीत स्वरूपाची आहे आणि युरोपीय अथवा ख्रिश्चन साहित्यात अतीरंजन आज्याबात नाही असे ही नाही. मॅकॉलेला स्वतःच्या देशातील नॅरेटीव्हची सवय झालेली असल्यामुळे प्रदेशातील साहीत्याती अतीरंजन कमी जाणवेल तेच परकीय भूमी अथवा परकीय देशातील अतीरंजन अधिक दिसेल असा माझा मुद्दा इतर कुणी आणायच्या आधी मी स्वत:हून आणला एवढेच. मॅकॉलेचे टिका पुर्वग्रह अथवा अतीरंजनावरील अतीरंजीत थट्टा असे समजले तरीही भारतीय साहीत्यातील अतीरंजनाचा दोष लपत नाही आणि उदाहरण म्हणून स्विकार्य राहतोच असे वाटते. 'Absence of Evidence Is Evidence of Absence' आणि .दा. आता "क्ष" नावाच्या जैविकदृष्ट्या पुरुष म्हणून सिद्ध झालेल्याच्या पोटात बाळ आहे असा कोणाचा दावा असेल तर ते नसल्याचा "पुरावा नाही" म्हणून ते "असू शकेल" असे म्हणणार काय ? आपली या दोन मुद्द्यांची मांडणी चपखल आहेच. मुख्यत्वे इथे विषय इतिहासाचा चालू आहे, आज इतिहास संशोधन, पुरात्त्वशास्त्र आणि अनुवंशशास्त्र, तर्कशास्त्र, विधितत्त्वमीमांसा इत्यादी शास्त्रेही बर्यापैकी प्रगत आहेत या विषयाच्या संबंधाने त्यांच्याही चिकित्सेच्या काही प्रमाण पद्धती वगैरे आहेत त्या अंगाने या मुद्द्याचा सखोल परामर्ष घेता येतोच. परंतु ढोबळ मानानेही पाहावयाचे झाल्यास मानवी वस्ती आणि संशोधनाचा एकुण आवाका इतपत वाढला आहे पृथीवरील आईस कॅप वगळता पुरात्त्व आणि अनुवंषशास्त्र वाल्यांकडून बर्यापैकी पृथ्वीचे खोदकाम करून उपलब्ध पुराव्यांवर संशोधन झाले आहे. त्यात कुठेही ३० फुटी माणसाचे अथवा ३०००० वर्षे जगलेल्या मानवाचा कोणताही अवशेष अद्यापतरी आढळलेला नाही. केवळ तर्कासाठी एखाद्या अपवाद शक्यतेचा विचार केलातरी अपवाद शक्यतांवरून नियम बनवता येत नाहीत. विज्ञानाने सर्वसाधारण संशयाचा फायदा दिला तरी ऐतिहासीक विषयातील अतीरंजनांमध्ये आंतर्भूत काँट्राडीक्शन्स इतर बाजूंनी आणि तर्कांनी उघड होत जातात आणि पुर्ण खोटी म्हणता नाही आली तरीही बर्याच अतीरंजीत दाव्यांचा फोलपणा सहज उलगडत जातो. अतीरंजीत दाव्यांच उपक्रम संस्थळावर चर्चील गेलेल एक उदाहरण घ्यायच झाल तर प.वि. वर्तक म्हणून कुणी डॉक्टर होते त्यांनी सूक्ष्म देहाने मंगळावर व गुरूवर जाऊन त्यांनी तेथील माहिती अवकाशयानांनी मिळविण्याची आधीच मिळवली वगैरे अतींद्रीय शक्तीचे दावे केले असावेत, या प.वि. वर्तकांबद्दल पत्रकार ग वा. बेहरेंचा अनुभव उपक्रम वर नोंदवला गेला तो असा, ""पुण्यातले डॉ.प.वि.वर्तक हे आपल्याजवळ अतीन्द्रिय शक्ती आहे, आपण अचूक भविष्य सांगतो.असा दावा करतात. एकदा त्यांच्या दवाखान्यात मी बसलो होतो. वेळ सायंकाळ सहाची होती. त्याकाळी गाजलेली एक कुस्ती बेळगावमध्ये चालू होती. मी विचारले नसताही त्या कुस्तीतला कोणता पैलवान कोणत्या डावावर किती वेळात जिंकणार हे आपल्या अतीन्द्रिय शक्तीने त्यांनी मला सांगितले. गमतीची गोष्ट अशी की नेमके त्याच्या विरुद्ध घडले. आम्ही तिथे बसलो असतानाच आम्हाला हे सारे रेडिओवृत्तातून कळले.(त्याकाळी टी.व्ही.नव्हते.) आपण त्या घटनेकडे पाहाण्यासाठी लावलेली दृष्टी चुकीच्या कोनावर लागल्यामुळे असे झाले असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. अर्थातच ते खोटे होते यांत शंका नाही" अतीरंजीत दावे आजच्या काळातही एवढे घुसवले जातात मागच्या काळातही केले जात, कधी अतीरंजीत दावा माझा सॉफ्ट कॉर्नर असलेल्या व्यक्ती, समुह, समाज वर्ग देश इत्यादीतून येतो की त्यातील फोलपणा बाजूला ठेऊन मी त्या अतीरंजनाचे समर्थन करतोच योगा योग जुळून आलाच तर तेथे एखाद्या शास्त्राचा दावा करत तर्क्शुद्धतेचा अभासही निर्माण करतो. पण असा अभास निर्माण करण्यात आपण आणि काही लोकच फसू शकतात सर्व लोक नक्कीच फसणार नाहीत. हे जितके खरे आहे तेवढेच बर्याच बाबतीत सामाजिक दृष्ट्या स्विकारले गेलेले नॅरेटीव्हजचा मनावर एवढा पगडा असतो कि इतरवेळी स'तर्क' असलेल्या व्यक्ती अवास्तव दाव्यांना आपल्या विचारात ठेऊन जगण्याचा विरोधाभास (कि अट्टाहास) लिलया पार पाडतात. हे व्यक्तीच्या स्वतः पर्यंत मर्यादीत असते तो पर्यंत ठिक पण समाजाच्या सामुहीक निर्णय प्रक्रीयेत आणि प्रगतीत नकारात्मक प्रभाव अशा विरोधाभासांनी पडणार अस्तील तर त्याची चिकित्सा होणे उत्तम ठरावे असे वाटते. म्हणून मुद्दा केवळ तुरळक वैज्ञानिक शक्यतेपुरता मर्यादीत राहात नसावा.
In reply to का.प. तुम्हाला झटकून टाकत नै by हाडक्या
In reply to १)बय्राच लेण्या " पांडवांनी by कंजूस
आणि ते स्थानिक अर्थव्यवस्थेस घडवतातस्थानिक अर्थव्यवस्थेस हातभार वगैरे नाकारत नाही, हरकतही नाही पण तेथे जे बर्याचदा नियोजन विहीन विस्कळीतपणाचे (प्र?)दर्शन होते, त्याचे जिव्हारी लागणे एक भाग झाला ? उत्साहाचा भर असेल तर अनास्था असलेल्या गोष्टीत विस्कळीतपणा राहीला पाहीजे हा सांस्कृतीक घटक आहे; हाच विस्कळीतपणा नोंदी ठेवण्याच्या बाबतीतही राहीला असावा असे वाटते का ? नेमक्या वस्तुस्थीतीची नेमक्या शब्दात कल्पना न दिल्यामुळे ABCD म्हणजे ABCD ;च्या एवजी ABD, किंवा ABCDG ,किंवा A1BCD, किंवा ABcD, किंवा अबकड किंवा याही पेक्षा धक्कादायक पद्धतीने वस्तुस्थीचे लचके पडतात. स्वतःचे स्वतःस प्रमाणपत्र देऊन स्वस्तुतीत रमलेल्यांना एकुण विश्वासार्हतेस तडा जातो आहे हे लक्षात न येण्याचा संभव असतो असे वाटते. आपल्या प्रतिसादास माझे उत्तर जरासे भरकटले असेल तर क्षमस्व.
In reply to १)बय्राच लेण्या " पांडवांनी by कंजूस
४)महाबळेश्वरच्या शंकराच्या देवळाबद्दल एक मार्गदर्शक(गाइड) सांगत होता-एक हजार वर्षे जुने देऊळ आहे.पर्यटकांनी(अमराठी) घंटेवरचा १७७६वगैरे आकडा दाखवून लगेच शंका विचारली त्याबद्दल त्याला काही सांगता येईना.महाबळेश्वरचं देऊळ खरेच ८०० वर्ष जुनं आहे. मूळचं भग्न मंदिर शिवकाळात का पेशवेकालात जीर्णोद्धारीत झालं. पण मंदिरात आतमध्ये गेल्यावर जुने स्तंभ, भैरवादी देवतांच्या काही मूर्ती मंदिर शिलाहाराकालीन असल्याची साक्ष पटवतात.
In reply to ४)महाबळेश्वरच्या शंकराच्या by प्रचेतस
In reply to +१ by हाडक्या
In reply to वेगवेगळ्या सभ्यतेत इतिहास जतन by विवेकपटाईत
व्यक्तीच्या कार्याला जास्त महत्व दिले गेले आहे न कि व्यक्तीच्या दिनचर्याला .१) मान्य पण 'व्यक्तीचे कार्य' यापासून झालेली सुरवात व्यक्ती पुजेत रुपातंतरीत होते, आणि प्रत्य़क्ष कार्य प्रत्यक्षात मागे पडल्याचा विरोधाभास मागे शिल्लक राहील्याचे दिसते (अर्थात हे केवळ भारतीयांपुरते होते असे म्हणवत नाही, पण आपण भारतीय वेगळ्या पद्धतीते पुढे जातो) हा भाग तुर्तास बाजूस ठेऊ २) तत्वज्ञानात अद्वैताचा पगडा जोपासणार्या संस्कृतीत प्रत्यक्षातील व्यक्ती आणि तदनंतर शब्द प्रामाण्याचा पगडा (विरोधाभास ?) हेही तुर्तास बाजूस ठेऊ. ३) सटीक नोंदींच्या अभावामुळे आपण जे 'व्यक्ती कार्य' म्हणता आहात, ते खरेच झाले की नाही याच्या विश्वासार्हतेवर संदेह निर्माण होण्याची शक्यता आपण भारतीय लोक पुरेशी विचारात घेत नाही, दुर्लक्ष करतो किंवा हि बाब भारतीय मानसाच्या गावीही नसते असे काही होते किंवा कसे.
In reply to व्यक्तीच्या कार्याला जास्त by माहितगार
In reply to इतिहासात जे घडून गेले आहे. by विवेकपटाईत
In reply to इतिहासाबद्दल माझं अत्यंत by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to चमत्कृती आणि सत्य. by प्रभाकर पेठकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)In reply to २००७ साली भीमपुत्र घटोत्कच by मदनबाण
अर्थात हे खोटे होतेबाजूला उभ्या असलेल्या खणनयंत्राचा आकार पाहता सांगाडा सदृश्य जे काही आहे ते मानवी सांगाड्याच्या कितीतरी पट मोठे आहे. यातील सत्य आपणास माहिती असल्यास त्यावर प्रकाश टाकावा.
In reply to बाजूला उभ्या असलेल्या by मदनबाण
In reply to रोहींग्या निर्वासितांची नसलेली छायाचित्रे by माहितगार
लेख प्रस्तावनेसारखा वाटला.