Skip to main content

समीक्षा

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/08/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण: आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

महाभारताचे जीवन सार: (भाग १)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 24/08/2015 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे (sonar.nimish@gmail.com) #महाभारताचे_जीवन_सार: (भाग १) सतत एखाद्या व्यक्तीचा पक्ष घेणे किंवा त्यांची बाजू (चूक असली तरी) आयुष्यभर घेत राहणे याचे दुष्परिणाम चांगलेच आपल्या लक्षात येतात. अधर्म दिसत असूनही भीष्माने आयुष्यभर कौरवांची बाजू घेतली किंबहुना त्याला घ्यावी लागली, भलेही मनातून त्याला पांडव चांगले वाटत होते.

मांझी- द माऊण्टन मॅन

लेखक बाप्पू यांनी शनिवार, 22/08/2015 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच दिवसानंतर चित्रपट गृहात एखादा चित्रपट पाहण्याचा योग आला. आणि खूप दिवसांनी एक दर्जेदार चित्रपट पाहिल्याचे समाधान देखील मिळाले. चित्रपट होता मांझी- द माऊण्टन मॅन Manzi चित्रपट सुरु होतो.. आणि पहिल्या मिनटालाच कळते कि हि एका गरीब माणसाची आणि अजस्त्र अश्या डोंगराची लढाई आहे. १९६० च्या आसपास या बिहार मधील गेहेलोर गावामध्ये दशरथ मांझी नावाचा एक युवक एका डोंगराशी एकटा लढू लागतो. ते हि फक्त हातोडी आणि छनी च्या सहाय्याने.

मसाण

लेखक कोमल यांनी बुधवार, 12/08/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
कहानी शुरू होती है एक पोर्न से। देवी. एका कॉम्प्युटर क्लास मधली ट्यूटर. तिच्या एका मित्राकडे, पियुषकडे आकृष्ट होते. लैंगिक संबंधांचे कोडे उलगडण्यासाठी ती पोर्न पाहून पियुषसोबत एका स्वस्तातल्या लॉज मध्ये जाते. तिथे अचानक पडलेल्या पोलिसांच्या धाडीला घाबरून पियुष आत्महत्या करतो. पोलिसांनी या धाडीचा विडिओ बनवलेला असतो. त्यांपैकी एक इन्स्पेक्टर मिश्रा, देवी आणि तिच्या वडीलांपुढे एक मार्ग ठेवतो;
३ लाख रुपये द्या, कोर्ट-कचेरी आम्ही पाहून घेऊ नाहीतर तिचा विडिओ इंटरनेट वर टाकू.

Bioscope

लेखक झंडुबाम यांनी शनिवार, 08/08/2015 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
Bioscope सर्वांगसुंदर चित्रपट , सर्वांगसुंदर अशासाठी कि कॅमेरा जितका प्रभावी आहे , तितकच पार्श्वसंगीत आणि चित्रपटातील गाणी . चार कविता आणि त्यावर आधारित चार कथा , चारही कथांचे दिग्दर्शक वेगळे ,प्लॉट वेगळा तरीहि पकड सुटत नाही शेवटपर्यंत . रवि जाधव , विजू माने , गजेंद्र अहिरे आणि गिरीश मोहिते . चारही ताकदीचे दिग्दर्शक आणि त्यांच्यावरची जबाबदारी तितक्याच सहजतेने पेलून जातात . एक वेगळाच अनुभव देऊन जातात , आणि आपण बाहेर येतो तेव्हा वेगळ्याच प्रभावाखाली असतो .

सरदारी बेगम -एक संगीतिक सुन्न अनुभव

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी सोमवार, 03/08/2015 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
सरदारी बेगम बंगलोर मधल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये माझा मित्र , सतीश , राहत आहे. काल त्याला भेटायला गेलो होतो. बंगलोरचे भयाण ट्राफिकमुळे दोन तास लागले. सतीशला बराच वेळ रिसेप्शनमध्ये ताटकळत बसावे लागले. वर्षभराने भेटत होतो त्यामुळे गप्पा लगेच रंगल्या. आमच्या अनेक आवडीनिवडी समान आहेत आणि म्हणून मैत्री २० वर्षे टिकून आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हा मात्र त्याच्या (कु)चेष्टेचा आणि माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मंद संगीत सुरु होते. गिटार , सतार आणि तबला ह्यांचे फ्युजन ( बहुतेक प्रेम जोसुआचे) ऐकत त्याने आपल्या भारतीय संगीताची ( खरेतर माझी ) मापे काढायला सुरवात केली.

शटर

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 22/07/2015 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
गेले बरेच दिवस 'शटर' बघायचा होता. 'बजरंगी भाईजान' आणि 'बाहुबली'च्या सुनामीपुढे या इवल्याशा जीवाचा काय निभाव लागणार ही धाकधूक होतीच. गेले 2-3 आठवडे काही कारणांमुळे 'शटर' बघायला वेळच मिळत नव्हता. शेवटी गेल्या रविवारी 'बुक माय शो' उघडले आणि 'शटर' शोधू लागलो. 'बजरंगी भाईजान' आणि 'बाहुबली' या दोघांनी इंच न इंच जागा व्यापली होती. पण शेवटी अभिरुची सिटी प्राईडला 'शटर'चा एक खेळ दिसला. लगेच दोन जागा आरक्षित केल्या. अभिरुची सिटी प्राईडला आम्ही पहिल्यांदाच गेलो. छान ऐसपैस चित्रपटगृह आहे. थोड्या वेळानॆ 'शटर' उघडले. मूळ याच नावाच्या मल्याळी चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे.