महेश कोठारे कि एकता कपूर??
नमस्ते,
मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे महेश कोठारे.अभिनेता+निर्माता+दिग्दर्शक अशा तिन्ही आघाड्यांवर
कार्यरत राहून स्वतःच मोठं अस्तित्व निर्माण केलय.
त्यांचे ते पाचअक्षरी धमाल चित्रपट अजूनही पहावेसे वाटतात.
पण हल्ली त्यांना नेमकं काय झालय तेच कळेना!
झी मराठीवर जय मल्हार ही त्यांचीच देण.त्यामध्ये कथानकाची पार वाट लावून टाकली आहे,आणि नारदाचं आख्यान महिना झालं तरी संपेना.इतकच नव्हे तर त्यांना अजून एक अचाट कल्पना सुचली,कलर्स मराठीवर "गणपती बाप्पा मोरया" म्हणून गणपतीची सिरियल चालू केली आहे,त्यामध्येसुद्धा कथानकाची पार वाट लावून टाकली आहे.हेवेदावे काय?टोमणे काय?वाद काय?
मिसळपाव