मी रोज रात्री, एक तरी सिनेमा बघतोच...पण कधी कधी चांगला चित्रपट मिळाला नाही तर, Avengers जिंदाबाद...
मी Captain Marvel बघत होतो, तितक्यात मुलगा म्हणाला, की हा सिनेमा किती वेळा बघणार? कालच मी, Ford vs Ferrari बघीतला.जबरा पिक्चर आहे.मुलांना, Tenet, Inception,.वगैरे सिनेमे आवडतात.आम्ही कुणीच, खानावळीत जेवत नाही.
मुलांची आवड माहिती असल्याने, लगेच सिनेमा बघीतला.संवाद हिंदीतून असल्याने, सिनेमा समजायला पण सोपा गेला.
Fordच्या गाड्यांची मागणी घटत असल्याने,मागणी वाढवायची असेल तर, फोर्डने गाड्यांच्या शर्यतीत उतरावे, असा सल्ला, ली आयकोका देतो.