Skip to main content

सद्भावना

सोमवारची कहाणी

लेखक जागु यांनी सोमवार, 16/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कहाणी सोमवारची आटपाट नगर होते. तिथे एक ब्राम्हण राहात होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, रोज शंकराची पूजा करी, वाटेत वेळूचे बेट होते. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ? मी येऊ? असा ध्वनी उठे. हा मागे पाही, तो तिथे कोणी नाही, त्या भितीने तो वाळू लागला. तेंव्हा गुरुजींनी विचारले, "खायला-प्यायला वाण नाही, बाबा असा रोड का ? "खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करुन येते वेळेस मला कोणी तरी 'मी येऊ? मी येऊ? असं म्हणतं, मागे पाहतो तो कोणी नाही, याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, "भिऊ नको, माग काही पाहू नको ! खुशाल त्याला ये म्हण!

ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे निधन

लेखक अर्धवट यांनी सोमवार, 16/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ कवी श्री. नारायण सुर्वे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.. एक वेगळं जग दाखवुन संवेदना जागवणारा निर्मळ कवी आणि सच्चा कार्यकर्ता हरपला.. मनःपुर्वक श्रद्धांजली.. आत्ता त्यांच्या कविता वाचाव्याश्या वाटतायत कुणी इथे त्या देउ शकेल का.

स्वातंत्र्यदिनाचा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 15/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःच्या तंत्राचा अवलंब करुन इतरांना पारतंत्र्याची हवा खाऊ देण्याची सोय म्हणजे स्वातंत्र्य! देश स्वतंत्र झाला. साठीच्या घरात पोचला. परंतु लोकांचं राज्य अजूनतरी स्वप्नच ठरलंय. लोकशाही अस्तित्वात आली म्हणजे स्वतंत्रता नव्हे. लोकशाहीच्या तंबूलाच भ्रष्टाचाराचा बांबू आधार देऊन दिमाखात उभाय. एकेका मताला कितीतरी महत्त्व आलंय, आणि त्यामुळेच लालची मतदारराजा एका क्षणिक मोहापायी आपले मतदानाचे स्वातंत्र्य विकून टाकतो. मताच्या प्रत्येक बटनाला नेता अमूक तमूक रक्कम अदा करीत असतो. हे सर्वश्रुत उघड गुपित आहे. अशी ठराविक संख्येची बटने विकत घेतली की खुर्ची फिक्स!

स्वतः मळ्यात उतरायचे आहे

लेखक कळस.. यांनी शनिवार, 31/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम... मंडळी........... लोकं गावाहून मुंबई ला जातात मी मुंबई हून गावाकडे आलोय मिसळगावात प्रवेश दिल्याबद्दल सरपंचांचे आभार .............. हे गाव फारच सुंदर आहे असे ऐकले आहे. मराठमोठे मोकळे वातावरण, पाठांचे मळे, पद्यांच्या सरिता, खाद्यांच्या बागायती, गप्पांचा पारा , वैश्विक वारा.. सारे पहिले आहे आज आजमवयाचे आहे. स्वतः मळ्यात उतरायचे आहे. बस मायबापांना विनंती आहे थोडीशी सुपीक जमीन देऊन गरिबावर उपकार करावेत आणि मध्ये मध्ये थोड्या शाब्दिक खताची खुराक पुरवावी. आता गावकरी म्हटल्यावर शेजार धर्म आलाच. बाकी माझ मी भागवीन.. आपला नवीन मिसळगावकर

प्राजक्ता पटवर्धन यांचे अभिनंदन!

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 27/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मध असला की मधमाध्या गुणगुणतात, सुवास आला की भुंगे घोंघावतात आणि गुण दिसले की गुणग्राहक जमतात! या उक्तीचा प्रत्यय नुकताच पुण्यात आला, ख्यातनाम कवियत्री आणि मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळांच्या सदस्या प्राजक्ता पटवर्धन यांच्या अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. मुळातच प्राजक्ता पटवर्धन या प्रतिभावंत कवियित्री. मिसळपाव, मी मराठी आदि संस्थळावरच्या रसिक वाचकांची त्यांच्या कवितांना आधीच भरभरुन दाद मिळालेली आहे. विविध संस्थळांचे मालक, संपादक आणि समस्त जालकरी मंडळींचा समर्थ पाठिंबा देखील त्यांना सतत मिळत असतोच.

आम्ही : एका स्वप्नपूर्तीचे साक्षीदार

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 18/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते.

प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 30/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एका महाविद्यालयाचं आवार. प्राचार्य गाडीतुन उतरतात, पांढरा शर्ट, लेंगा आणि काळं जाकीट, सुरकुतलेला पण उत्साही प्रसन्न चेहेरा, आणि त्यांचे पेटंट मिश्कील हास्य, इमारतीच्या पायर्‍या चढुन येताना, त्यांच्याच व्याख्यानाचा बोर्ड समोर लावला आहे, त्याकडे क्षणभर कटाक्ष टाकुन पुन्हा त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तरातरा चालत, हॉल मधे येतात. हॉल काठोकाठ भरलेला. समोरच्या तांब्याभंड्यातुन थोडे पाणी पीउन प्राचार्य सुरुवात करतात. "आत्ताच येताना खाली मी व्याख्यानाचा बोर्ड बघितला. त्यावर विषय लिहीलेला नाही. तो लिहायचा राहायलाय असं नव्हे.

विनम्र श्रद्धांजली

लेखक नानबा यांनी मंगळवार, 29/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
संतांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे प्राचार्य माननीय शिवाजीराव भोसले यांचे आज पुण्यात दु:खद निधन झाले. या महान व्यक्तिमत्त्वास विनम्र आदरांजली...

वटपोर्णिमेच्या शुभेच्छा

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 25/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
(चित्र जालावरुन साभार.) वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून - विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम| वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६|| महा संहाराच्या समयी विरंची (ब्रम्हा) हा पंचतत्वामधे विलीन होतो. किनासा(यम, प्रत्यक्ष मृत्यूचा देव) मृत्यू पावतो.कुबेर, धनाच्या देवतेचा अंत होतो.