Skip to main content

सद्भावना

माझ कोकण..........श्रीमंत!

लेखक शानबा५१२ यांनी शुक्रवार, 18/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ लेख येथे आहे दीलेले फोटो आमच्या गावच्या घराबाजुचे आहेत,गावातल्या स्थितीबद्दल माहीती नाही.आमच्या कंपाउंडच्या आतमधली चित्र आहेत. फोटो मोठ्या आकारात असल्याने load व्हायला वेळ लागत असल्यास,जमवुन घ्यावे. ------------------------------------------------------------------------------------------------------------- आज फक्त आंबेच बघु.अजुन फोटो आहेत पण ते सवडीने. शहरात आंब्यांचे फार कौतुक होत,'हापुस हय्,हपुस' बोलुन काही लोक काहीही चिपकवतात.पण गावाला 'रायवळी'ला काही कींमत नसते,हे बघा.

शनी, अवलिया, निखील आणी मकी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 12/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता काही वेळापुर्वीच एक गंमतीशीर योगायोग लक्षात आला. आज शनी, अवलिया, निखील देशपांडे आणी मस्त कलंदर ह्या सर्वांचा वाढदिवस आहेत. *देव पण काय काय दिवस दाखवणार आहे अजुन काय महिती ?* असो.. तर ह्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथप्रेमींची परिषद - चेकोस्लोव्हाकिया

लेखक हैयो हैयैयो यांनी शुक्रवार, 11/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय नाडिग्रंथप्रेमींची परिषद - चेकोस्लोव्हाकिया मित्रहो, चेकोस्लोव्हाकिया देशातील नाडिग्रंथप्रेमींच्या प्रेमळ आग्रहास्तव येथील जनप्रिय प्रसिद्ध सदस्य नाडिग्रंथप्रेमी विंग कमाण्डर श्री. शशिकांत ओक हे एका महिन्याच्या दौर्‍यावर त्या देशी रवाना झाले आहेत. राजधानी प्राग येथे त्यांचा सुमारे एक महिना मुक्काम असेल. ह्या काळात भरगच्च कार्यक्रमाची आखणी असून योरोपातील अनेक ठिकाणांहून आलेल्या जनांकरिता प्रश्नोत्तरेदेखील होणार आहेत. आपण सारे मिळून श्री. ओक सरांचे हार्दिक अभिनंदन करून ह्या परिषदेस शुभेच्छा देवू या. धन्यवाद. हैयो हैयैयो.

कोणे एके काळी...

लेखक अवलिया यांनी रविवार, 06/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी... कोणे एके काळीच म्हणावे लागेल. कधी घडले यावर जर एकमत नसेल, असे काही घडलेच नसेल असे तथाकथित विचारवंत ठासुन सांगत असतील, पण सत्य कुठे अग्नी वा कुठे धुराच्या रुपात लोककथांमधुन, बोलीतुन पुढे सरकत असेल, त्याला इतिहास म्हणुन मान्यता द्यायची की नाही यावर काथ्याकुट चालत असेल तर माझ्यासारखा सामान्य माणुस कोणे एके काळी असे घडले असे म्हणुनच सुरवात करणार. तर कोणे एके काळी. काशी नगरीतल्या एका वृद्ध ब्राह्मणाची कथा. पहाटे उठावे. गंगेवर स्नान करावे. काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे. घरी येवुन नित्य नैमित्तिक पूजा अर्चा करावी, वाचन मनन चिंतन लेखन करावे.

ग. प्र. प्रधान यांना श्रद्धांजली

लेखक कालिन्दि मुधोळ्कर यांनी सोमवार, 31/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
प्रधान मास्तरांना भावपूर्ण श्रद्धांजली. 'मृत्यूनंतर कोणतेही स्मारक उभारू नये, माझ्या बद्दल पेम वाटणाऱ्यांनी एक झाड लावावे आणि किमान पाच वषेर् तरी जगेल, अशी व्यवस्था करावी. माझ्याबद्दल आपुलकी वाटणाऱ्या संस्थांनी पाच झाडे लावावीत.." लिंक ईथे उघडेल.

एका सुरेल व्यक्तिमत्वाचा अस्त ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 26/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मै हूं जयपूरकी बंजारन्...चंचल मेरा नाम .... स्व. रफीसाहेबांच्या अनेक गाण्यांपैकी एक सुरेल गीत. १९४७ साली, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या वर्षी आलेल्या "साजन" मधील हे गीत. सी. रामचंद्र उर्फ आण्णांचे कर्णमधुर संगीत , कमर जलालाबादींचे शब्द आणि या गाण्यात रफीसाहेबांबरोबर गाणारी गायिका होती ललिता देऊळकर! याच चित्रपटातील अजुन एक गाजलेले गीत म्हणजे.... "संभल संभल के जैय्यो ओ बंजारे....

महिला कारागृहात काही तास

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 24/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त!

मी कवयित्री कसा झालो...? अर्थात जालिंदरजींची कृपा ... भाग १

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 21/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या फ़ेब्रुवारीतली गोष्ट... मला विविध आजार एकदम होताहेत असं वाटायला लागलं... म्हणजे एकाच वेळी आळशी आणि उत्साही वाटणं, झोप न लागणं , वाट्टेल तेवढं झोपणं, अति भूक लागणं आणि दुसर्‍या दिवशी अजिबात भूक नसणं असं काहीही सुरू होतं.. डाक्टरांनी काही प्रथमिक तपासण्या केल्या आम्ही नार्मल आहोत असं दर्शवणार्‍या.. मग पुढला महिनाभर आम्ही (काही इस्पितळांचा खर्च भागवण्यासाठी आणि अनेकांना रेफ़रल फ़ी मिळवून देणार्‍या) भारी भारी तपासण्या असतात त्याही करून घेतल्या पण त्याही नार्मल होत्या... मग आमची रवानगी एका मानसतज्ञाकडे झाली.