कहाणी सोमवारची
आटपाट नगर होते. तिथे एक ब्राम्हण राहात होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, रोज शंकराची पूजा करी, वाटेत वेळूचे बेट होते. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ? मी येऊ? असा ध्वनी उठे. हा मागे पाही, तो तिथे कोणी नाही, त्या भितीने तो वाळू लागला. तेंव्हा गुरुजींनी विचारले, "खायला-प्यायला वाण नाही, बाबा असा रोड का ?
"खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करुन येते वेळेस मला कोणी तरी 'मी येऊ? मी येऊ? असं म्हणतं, मागे पाहतो तो कोणी नाही, याची मला भीती वाटते.
गुरुजी म्हणाले, "भिऊ नको, माग काही पाहू नको ! खुशाल त्याला ये म्हण! तुझ्यामागून येऊ दे !
मग शिष्याने काय केले ? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला, "मी येऊ ? असा ध्वनी झाला. "ये ये" असा जबाब दिला. मागे काही पाहिलं नाही, चालत्या पावली घरी आला.
गुरूजींनी पाहिले, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचे लगीन लावले. त्यांना एक घर दिले. त्यानंतर काय झाले ?
श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, "माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको !"
आपण उठला, शंकराचे पुजेला गेला, हिने थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला.
"अगं अगं दार उघड !"
पुढचे ताट पलंगाखाली ढकलून दिले, हात धुतला, दार उघडले, पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असेच झाले, असे चारी सोमवारी झाले.
सरता सोमवार आला. रात्री नवल झाले, दोघेजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. "हा उजेड कशाचा ? ताटी भरल्या रत्नांचा! ही रत्न कुठून आणली ? ती मनात भिऊन गेली.
"माझ्या माहेरच्यांनी दिली."
"तुझ माहेर कुठे आहे ?"
वेळूच्या बेटी आहे. मला तिथे घेऊन चल!" पतीसह चालली, मनी शंकराची प्रार्थना केली, 'मला अर्ध्या घटकेचं माहेर दे!'
ते वेळूचे बेट आले, मोठा एक वाडा आला, कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली, दासी बटकी राबताहेत, शिपाई पहारा करताहेत. बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला. जेवणं झाली, सासूसासर्यांची आज्ञा घेतली, घरी परतली.
अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला, तेंव्हा उभयता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत, एक वेळूचे बेट आहे, तिथे हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला.
नवर्याने विचारले, "इथलं घर काय झाल ?"
"जसं आलं तसं गेलं. अभाय असेल तर सांगते. चारी सोमवारी हाक ऐकली, जेवती ताटं ढकलून दिली. रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिऊन गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली, अर्धघटकेचं माहेर मागितलं, त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपुर्ण झाली." जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां-आम्हांला पावो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.
टिप :
ह्या कहाण्या पुरातन असतात. प्रत्येकाला त्यातील विचार पटतात असे नाही. पण ह्या कहाण्या वाचताना त्या केवळ पुरातन कहाण्या आहेत हे लक्षात घेउन त्यावर शंका कुशंकांच्या पोस्ट टाकू नका ही विनंती आहे. ज्यांना आवडतील व नावडतील त्यांनीही ह्यातुन फक्त चांगला बोध घ्यावा हा हेतु आहे.
वाचन संख्या
9758
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यु!!!!!!!... गं जागु!
या कहाण्या माझी आजी एका
मस्त कहाणी, आधी पोथ्यांबरोबर
अग टायपायला वेळ मिळाला तर
हो चालेल गं! पाऊण श्रावण
In reply to अग टायपायला वेळ मिळाला तर by जागु
मस्त
विशेषत: पिठोरीची, कारण या
In reply to मस्त by सूड
धन्यु
In reply to विशेषत: पिठोरीची, कारण या by परिकथेतील राजकुमार
सापडला बॉ धागा. हा घ्या.
In reply to धन्यु by सूड
विशेषत: पिठोरीची, कारण या
In reply to विशेषत: पिठोरीची, कारण या by परिकथेतील राजकुमार
ह्म्म्म्म
In reply to विशेषत: पिठोरीची, कारण या by मदनबाण
@ सुधांशु तुम्ही म्हणत आहात
In reply to ह्म्म्म्म by सूड
धागा
साती आसरा
In reply to धागा by सूड
@ प्रियालीतै
In reply to साती आसरा by प्रियाली
वा वा खुप सुंदर कथा सांगितल्या बद्दल जागुचे आभार......
''मस्त कहाणी, आधी
ज्यांना आवडतील व नावडतील
बोध
In reply to ज्यांना आवडतील व नावडतील by Pain
प्रियाली
In reply to बोध by प्रियाली
ती दागिने पाटावर काढून ठेवते.
In reply to प्रियाली by Pain
llपुण्याचे पेशवेll
In reply to ती दागिने पाटावर काढून ठेवते. by llपुण्याचे पेशवेll
कदाचित शंकराची पूजा केल्यावर
In reply to llपुण्याचे पेशवेll by Pain
शिल्पा ब
In reply to कदाचित शंकराची पूजा केल्यावर by शिल्पा ब
गोष्ट समजुन ज्याचे त्याचे
In reply to शिल्पा ब by Pain
उत्तर देण्याचा प्रयत्न
In reply to गोष्ट समजुन ज्याचे त्याचे by शिल्पा ब
च्यायला.. करतय काश्मीर
In reply to ज्यांना आवडतील व नावडतील by Pain
@ अर्धवट
In reply to च्यायला.. करतय काश्मीर by अर्धवट
अतीशय सून्दर....
छान ग जागुताई !
सगळ्यांचे मनापासुन
शंका कुशंका वाल्यांना मरु देत
In reply to सगळ्यांचे मनापासुन by जागु
खूप दिवसांनी वाचली ही कहाणी.