Skip to main content

सद्भावना

मैत्र जिवांचे

लेखक रविंद्र गायकवाड यांनी बुधवार, 13/01/2010 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला शिकायला आवडते अभ्यासातही खूप रस आहे, पण आज वर्गात लक्ष लागत नव्हते. मी अस्वस्थही नव्हते. कोणते ही टेंशन नव्हते. कुणी काही मनाला लागेल असे बोलले नव्हते कि एखाद्या अपयशामुळे खचून गेले नव्हते. सगळे जग निर्जिव वाटत होते. चालती बोलती मानसे यंत्रवत भासत होती. ईतक्यात एक खट्याळ वर्गमैत्रिण थट्टेने म्हणाली, "चुपचुप बैठे हो जरुर कोई बात है?? आज लक्ष कुठे आहे तुझे? प्रेमाबिमात पडलीस काये?. थोडावेळ स्वतःवरच शंका आली. असं तर नसेल?... पण कोणताही चेहरा किंवा व्यक्ती डोळ्या समोर येत नव्हती. का्हीतरी झालं होतं पण नक्की काय झालं होतं मला?.

आत्महत्या करण्या पुर्वी हे जरुर करा

लेखक jaypal यांनी शनिवार, 09/01/2010 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो शिर्षक वाचलेच आहे तेंव्हा अजुन लेक्चरबाजी नकरता नम्र विनंती करतो. आयुष्य संपविण्याआगोदर कृपया पुढील मोफत २४ तास मेंट्ल हेल्थ लाईनला एकदा तरी फोन करा ०२२-२५७०६०००. या फोनवर २४ तास समुपदेशक (काउन्सीलर) आणि मनोविकारतज्ञ अशी टीम आपल्या सेवेशी असते.तसेच एखाद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न उदा.झोपेच्या गोळ्या, विषप्राशन ई. केले असल्यास घरच्यांनी ताबडतोब काय करावे / करुनये याचे देखिल मार्गदर्षन केले जाते. आधिक तपशीला साठी वांद्रेवालाफाउंडेशनला भेट द्यावी.

२०१०-विजयी भव!!!

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 30/12/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० च्या वर्षाची सुरवात होण्यास काही तासांचाच अवकाश आहे. एक वर्ष संपणार आणि दुसरे सुरु होणार. पाश्चात्य विचारांत जी काही कमी अथवा आक्रमकता असो, पण आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र उत्साहाचा आणि उमेदीचा आहे. माणुसमात्र अनेक अनियमितता अथवा बंधनाने बांधला गेला आहे, परंतु अश्या वर्षाच्या सुरवातीस मात्र त्याचा कल हा आशावादी आणि संकल्पाचा असतो ही बाजु मला जमेची वाटते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक गोष्टी करण्याच्या राहुन जातात त्यांना अश्या वर्षाच्या सुरवातीच्या कल्पनेने परत एकदा उजाला देता येतो.

हेमलकसाच्‍या अरण्‍यातील 'मंदाकिनी'

लेखक मड्डम यांनी शनिवार, 19/12/2009 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
- विकास शिरपूरकर मध्‍यप्रदेशातील इंदूर येथील देवी अहिल्‍योत्‍सव समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा देवी अहिल्‍या पुरस्‍कार लोक बिरादरी प्रकल्‍पाच्‍या संचालिका आणि मॅगसेसे पुरस्‍कार विजेत्‍या डॉ.मंदाकिनी आमटे यांना जाहीर झाला असून दि.20 डिसेंबर रोजी एका भव्‍य कार्यक्रमात त्‍यांना हा पुरस्‍कार दिला गेला. एक लाख रूपये रोख, मानपत्र आणि श्रीफळ असे पुरस्‍काराचे स्‍वरूप आहे. या पुरस्‍काराच्‍या निमित्ताने मंदाताईंशी साधलेला हा मनमोकळा संवाद... ''1970-72 चा तो काळ असावा.

क्रियाशील आदर्श - हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि कुटूंबिय

लेखक विकास यांनी शुक्रवार, 04/12/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
कधी काळी वृत्तपत्रातील बातमीवरून बोलत असताना, एका सन्माननीय व्यक्तीने मला एकदा मिष्कील उपदेश केला होता, "जर काही सामाजीक काम करायचे असेल तर, शहाणा हो आणि वृत्तपत्रे वाचणे बंद कर!"अर्थात उपदेश खरा होता जरी त्यातील हे वाक्य मिष्कील असले तरी... तर "वृत्तपत्रे वाचणे बंद कर" या वाक्याचा अर्थ काय? बातम्या म्हणून वाचायला लागले की खून, मारामार्‍या, भ्रष्टाचार, लबाड जोडती इमले माड्या-गुणवंतांना मात्र झोपड्या, असेच पहायला मिळते. यातून एखाद्या वेळेस चीड येईल पण एकंदरीत नैराश्यानेच ग्रासले जाते ज्यातून इतरांसाठीचे काय, स्वतःचे पण धड काम होत नाही.

यशवंतराव चव्हाण यांची आज २५ वी पुण्यतीथी.

लेखक मधु मलुष्टे ज्यु. बी. ए. यांनी बुधवार, 25/11/2009 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व संयुक्त महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज २५ वी पुण्यतीथी. त्यांना आदरांजली.

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

आदरान्जलि

लेखक सन्दीप यांनी शनिवार, 31/10/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज दि.३१/१०/२००९ लोहपुरुश श्री.सरदार वल्लभ भाइ पटेल यान्चि जयन्ती तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यान्चि पुण्यतिथी . ह्या निमीत्ते वरिल दोघ्हनाहि माझी आदरान्जलि. सन्दीप

चाळीशी

लेखक विकास यांनी गुरुवार, 29/10/2009 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
"A mere forty years ago, beach volleyball was just beginning. No bureaucrat would have invented it, and that's what freedom is all about."
Newt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)
आज हे वरील वाक्य आठवायचे कारण जरा "स्पेश्शल" आहे. ज्या एका जाळ्यात गुंतत तुम्ही आम्ही आज केवळ मराठी संकेतस्थळांपुरतेच नाही तर दिवसातील अनेक गोष्टी करत असतो, त्याच्या शिवाय जगणे अशक्यच, ज्याने जगात वैचारीक मुक्तपणा (freedom)आणला... अशा एका तंत्रज्ञानाचा "औपचारीक" चाळीसावा वाढदिवस आहे.

मिपाचे वैभव...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 27/10/2009 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, हे मिपाचे वैभव! हे केवळ अन् केवळ तुम्हा सर्व मिपाकरांमुळेच शक्य आहे. मी सर्वांचा ऋणी आहे.. आपला, (कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.