Skip to main content

सद्भावना

शिक्षकांची परवड

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 05/09/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
'मास्तर उंद्या तुमच्या नावानं बैलपोळा हाय म्हंत्यात नव्हं?' असं आम्ही आमच्या गुरुजींना बेधडक विचारु शकत होतो. आता काळ बदलला. शाळा हायटेक झाल्या. चुरगाळलेल्या पायजम्यातले मास्तर कडक इस्त्रीचे सर झाले. पोरंही बदलली. ओबिडिएन्ट झाली. टीचर्स डे मोठ्या दिमाखात साजरा होऊ लागला. ती हक्काची सुट्टीदेखील कार्यक्रमांच्या रेलचेलीत लुप्त होऊ लागली. मुले आपापल्या आवडत्या सरांना मॅडमना फुले देत जातात. ते हसून स्विकारण्यापलिकडे ते काय करु शकतात? एका डोळ्यात हसू दुसऱ्‍यात आसू घेऊन बिचारे गुरुजन आला दिन ढकलतांना आढळतात. पेपरवरच्या फुल्यांची जागा स्टार्सनी घेतली.

अलविदा त्या रुम मालकांना

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 04/09/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजलाईफच्या धसमुसळ्या वयात बारा महिन्यांत बारा घरे बदलून झाली असतील. बारा घरची बाराप्रकारची मालक मंडळी तेव्हा भेटली. ते भाड्याचं घर असल्याने कधीही खाली करावं लागेल, अशा धारधार तलवारीची नेहमीच डोक्यावर दहीहंडी असायची. ऍडव्हान्स भाडं दिलं की रूम आपली, म्हणायला आपली.

छोटेखानी लेखांची मालिका - इथे शब्द संपतात...१

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/09/2010 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
दहीभात..! इथे शब्द संपातात! हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..! कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..! पोटात गडबड? अजीर्ण? हम्म.. थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :) दहीभात कधीही खावा.. छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात..

संपादकांच्या फुलक्या

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 28/08/2010 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
संपादकांच्या फुलक्या भाजायचे ठरले तर टोपलंभरुन तरी हमखास जमतील. त्या टम्म फुगलेल्या फुलक्या मार्मिक टिचकी मारून फोडल्या की पचायला हलक्या होतील व त्या खाल्ल्यानंतर मस्त मेजवानीच्या डुलक्याही लागतील... त्यावेळी आम्ही लेखन क्षेत्रातले उमेद्वार होतो. अजूनही आहोतच, परंतु तेव्हा फारच नवखे होतो. पेपर चाळायचे, 'निवेदने' कॉलम भरारा वाचायचा, पटतील ते विषय पत्त्यांसह उतरवून घ्यायचे. अन् कागद पेन घेऊन लेखनसमाधी लावून घ्यायची. एकेका लेखासाठी चार पाच खर्डे होत. शेवटी हे लिहू की ते करता करता सगळेच उतरुन पाठवून द्यायचो. काय जे लागेल ते त्यांनीच वेचावे असा हवाला टाकून लेख प्रकाशित होण्याची वाट पहात रहायचं.

एकच लख्ख अनंत किरण...

लेखक अर्धवट यांनी गुरुवार, 26/08/2010 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला कधी टोचतो की नाही माहित नाही पण मला खुप टोचतो मखमली अंधार... परका अंधार आणि पोरका मी.... म्हणजे नेहेमीच नाही बरंका... कधी कधी कसा मस्त दुलइ सारखा असतो... हवी तेव्हा गुडुप ओढून घ्यावी तोंडावर... कंटाळा आला की खसकन् फेकुन द्यावी... सगळा सोहळा हजर तुमचं स्वागत करायला हसर्‍या चेहेर्‍यानं. कधी कधी मात्र खुप गुदमरायला लावतो... अंधार्‍या डोहात बुडल्यासारखं वाटतं... जिव गुदमरतो अगदी... मग मी डोळे टक्क उघडे ठेउन झपाटल्यासारखा पाहात बसतो... नजरेनेच चाचपडत, तडफडत बसतो... तो तळाशी ही खेचत नाही आणि श्वासही घेउ देत नाही... कधी सोसतो.. कधी पोळतो. पळताही येत नाही त्यापासुन..

बन्धन भावनेचं!!

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 24/08/2010 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
(मागच्या वेळी केलेल नमन आता या वेळी सुद्धा आहे, पण गणपा भाउ, जागुताई अन केशवजीं बरोबर फोटो अन व्हिडिओ साठी आदरणीय बहुगुणी अन आपले सर्वांचे लाडके धमाल मुलगा यांचे जाहिर रित्या आभार!! तुम्ही मदत केली नसती तर, कुठली अपर्णा, अन, कुठला हा लेख!!) अरे हो राहिल प्रिय डॉन रावांनी मला अक्षर रंग अन इतर सुविधा देण्याच आश्वासन दिल्या मुळे इथुन पुढे मीही थाटात रंग बदल बदल के लिहिणार आहे!! ठ्यांक्यु ह डॉन साहेब!!

रक्षा हेच बंधन

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 24/08/2010 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या व्यक्तिचं रक्षण करायचं म्हटलं की रक्षणकर्त्याला चांगलं चुंगलं अन्न भक्षण करुन बॉडी कमवावी लागते. परंतु आजच्या सुप्परफास्ट युगात बहुतेक तरुण बंधूराजांचं फास्टीँगच होत असतं. तरीही येनकन प्रकारे जगातील सगळेच बांधव जर बॉडी बिल्डर झाले तर सर्वांचा भगिनीवर्ग सुरक्षित राहील अन् आरक्षितही! एखाद्या बहिणीकडून औक्षण करवून घेतले की तिचे रक्षण करणे भावाचे कर्तव्यच असते. आजकाल बहुतेक कुटुंबे ही त्रिकोणी राहण्यातच समाधान मानतात. अशा कुटुंबातील एकल भावांना बहिणीँचा हट्ट, मस्करी, रुसवे फुगवे काय डीव्हीडी लावून दाखवायचे? येत्या काही दशकात हेही करावे लागेल की काय कोण जाणे?

राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 20/08/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ आज २० ऑगस्ट, २०१० राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन! आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ...... WE MISS YOU!

कहाणी मंगळागौरीची

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/08/2010 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होते. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, 'अल्लख' म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिने नवर्‍याला सांगितली. त्याने तिला एक युक्ती सांगितली. "दाराच्या आड लपून बस, 'अल्लख' म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल." अशी भिक्षा झोळीत घातली. बोवांचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. "मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बोवांनी उ:शाप दिला. बोवा म्हणाले, "आपल्या नवर्‍याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्रे परिधान कर, रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण.