आम्ही : एका स्वप्नपूर्तीचे साक्षीदार
मराठी जालावर आल्यापासून जे काही लोक ओळखीचे झाले आहेत, जीवाभावाचे मैतर झाले आहेत, त्यात प्राजुचं नाव अगदी आवर्जून घ्यावं असं. मराठी आंतरजालावर जे काही लोक अगदी सातत्याने आणि चांगलं लेखन करतात त्यातही तिचं नाव अगदी अग्रणी आहे. तिच्या सुंदर कविता / गझला मराठी संस्थळांवर नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. तर अश्या या आमच्या मैत्रिणीच्या कवितांचा एक अल्बम येऊ घातलाय ही बातमी कुठून कुठून कानी येतच होती. आता प्राजुचा स्वभाव माहिती असल्यामुळे हा अल्बम एकदम नीटनेटका आणि झकास होणार हे नक्की असे वाटतच होते. साधारण दीड दोन महिन्यांपूर्वी प्राजुच्या 'फुलांची आर्जवे' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला हजर रहायचा योग आला होता. तेव्हाच या अल्बमचा प्रकाशन सोहळाही लवकरच होणार आहे असे कळले होते. तेव्हा पासून या कार्यक्रमाची वाट बघणे चालू होते.
मध्यंतरी, प्राजुने हा सोहळा १८ जुलैला पुण्यात होणार आहे असे कळवले आणि बर्याच लोकांकडून 'या समारंभाला हजर राहू' अशा अर्थाचे निरोप मिळाले. या निमित्ताने प्राजुला प्रत्यक्षात भेटायची संधी मिळणार होती आणि आपल्या मैत्रिणीचे कौतुक करायला जातीने हजर रहायचेच असे तेव्हाच ठरवले. निरोप आले, निरोप दिले गेले. प्ल्यानिंग झाले आणि आम्ही १८ जुलैला सकाळी पत्रकार भवन, पुणे इथे जमलो. मी, अदिती, परा, पेठकर काका, राजे, चंद्रशेखर महामुनी, सोनाली घाटपांडे, प्रकाश घाटपांडे, मनिष, पुण्याचे पेशवे, दत्ता काळे, लिखाळ, शाल्मली, टार्या, राजेश घासकडवी, धम्या, अविनाश कुलकर्णी, श्रावण मोडक, मराठमोळा अशी दणदणीत उपस्थिती होती. प्राजु जातीने स्वागत करून गेली.
कार्यक्रम बरोब्बर १० ला सुरू होणार असल्याने बरेच लोक १०.३० पर्यंत आले. त्यामुळे आमच्या सारख्या टैमवर आलेल्या लोकांना जिन्यात उभे राहून धिंगाणा करायला वाव मिळाला. आल्यागेल्या लोकांवर लक्ष ठेवत, आम्ही जिन्यात गर्दी करून उभे होतो. एक दोन पुणेरी आज्यांनी आमच्याकडे थोडा जळजळीत कटाक्ष टाकून आम्ही लोकांना अडचण करतो आहोत हे आमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला खरा. पण काही अस्सल पुणे-३० लोकही आमच्यातच असल्याने ते कटाक्ष रामानंद सागरच्या रामायणातल्या बाणांप्रमाणे मोडून पडले. शिवाय प्राजुच्या नात्यातले लोक सोडले तर एकगठ्ठा अशी आमचीच व्होटब्यांक असल्यामुळे प्राजु पण आमच्या दंग्याकडे कानाडोळा करून होती. ;)
कार्यक्रम १०.३० ला मात्र अगदी सुरूच झाला. कार्यक्रमाला बरेच ओळखीचे चेहरे दिसत होते. काही चेहरे टीव्ही आणि चित्रपटातून दिसणारे तर काही जालावर दिसणारे. बर्याच मराठी कार्यक्रमातून किंवा चित्रपटातून दिसणारे, प्रसिद्ध कलाकार श्रीरंग गोडबोले आणि नटरंग या चित्रपटाचे दिग्दर्शक रवि जाधव हे या कार्यक्रमाला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची धुरा मंजुश्री गोखले यांनी सांभाळली. सुरूवातीला प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांचे दोन शब्द वगैरे झाले आणि कार्यक्रमाला खर्या अर्थाने सुरूवात झाली ती अल्बम मधल्या गाण्यांच्या आणि त्या गाण्यांवर केलेल्या सुंदर नृत्यांच्या सादरीकरणाने. पौलमी पेठे, अमृता काळे, मधुरा दातार, संगिता चितळे इत्यादी कलाकारांनी अल्बम मधली गाणी पेश केली. प्राजुनेही तिचे मनोगत व्यक्त केले. तिच्या आयुष्यातला एक अतिशय आनंदाचा क्षण ती आमच्या सर्वांबरोबर वाटून घेत होती... अतिशय भावनाविवश झाली होती. काय बोलू आणि काय नको असे झाले होते तिला. सगळ्या आभारप्रदर्शानात तिने आपणा सगळ्या जालिय मित्रमंडळींचे खास आभार मानले. त्यावेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट (आम्हीच केलेला) सगळ्यात जास्त होता. ;)
प्राजुचे पती आणि अल्बमचे निर्माते जगदीश पाहुण्यांचे स्वागत करताना.
अमृता का़ळे
संगिता चितळे
पौलमी पेठे
प्राजु आणि जालिय मैत्रिण शाल्मली
नक्की किती मोठे व्हायचे त्याचे परिमाण सांगताना श्रावण मोडक आणि बाजूला आज्ञाधारक अभ्यासू लिखाळ भावोजी.
लिखाळ भावोजी की जान खतरे मे... द डेंजर बिहाइंड.
आधुनिक भरतभेट किंवा शिवाजी-अफझलखान भेट.
अवघडलेल्या अवस्थेतही जीवाच्या भितीमुळे बळंच कसं हसावं याचा वस्तुपाठ देताना परा
शूर आम्ही सरदार.... बाजीराव पेशवे (पहिले की दुसरे ते अजून नक्की कळले नाहीये. माणूस बेरकी आहे. कळू देत नाही.)
हात जायबंदी करून घेताना प्राजु...
पुणेरी इंगा बघितलेला राजेश घासकडवी पुणेरी इंगा दाखवणार्या परा बरोबर...
आम्हाला काय ब्वॉ कोणी नेलं नाही कधीच समर्थ भोजनालयात, म्हणून मग आम्हीच गेलो आणि फोटो काढून हौस भागवली. मागे आमचे आधारस्तंभ (पहिले का दुसरे) बाजीराव ऊर्फ पुण्याचे पेशवे. कोपर्यात अर्धा मराठमोळा आणि मागे (काकूंना घाबरून) तोंड लपवत पेठकर काका.
ऑटोग्राफ घ्यायच्या निमित्ताने पुढे पुढे करताना परा, मनिष, आदिती आणि आपल्याला हे असं का नाही सुचत या विचाराने व्यथित टार्या.
एकंदरीत कार्यक्रम सुरेखच झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच भेटता आले बर्याच दिवसांनी. शिवाय या निमित्ताने काही जालिय भरतभेटी झाल्या, जुने मित्र परत भेटले. आपुलकीने चौकशी झाली, विचारपूस झाली. मजा आली. काही लोकांना जायची घाई असल्याने ते पळाले. आमच्या सारखे काही निरूद्योग लोक आता एकत्रच जेवू म्हणून एका हाटेलाकडे प्रयाण करते झाले. तिथेही दंगा झालाच भरपूर.
विचारविनिमय.
नंतर म्हणत होता टार्या की हेल्मेट सोडून देणार होता... एका फटक्यात काम तमाम.
टार्या त्याच्या खेळण्याबरोबर.
भाळी चंद्र असे धरिला... वडारवाडी तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे धडाडीचे तरूण नेतृत्व धमालदादा बारामतीकर देशमुख
विद्वज्जनांना अन्नदान केल्याचे पुण्य मोजताना पेठकर काका.
संध्याकाळच्या बैठकीचे नियोजन करताना मंडळी. पेठकर काकांच्या आधाराने (कसाबसा) उभा असलेला राजे. ;)
***
प्राजुच्या निमित्ताने असेच अजून बरेच प्रसंग आम्हाला उपभोगायला मिळो हीच इच्छा. कीप इट अप, प्राजु. :)

वाचन
19614
वाचनखूण
प्रतिक्रिया
70
अरे वा!!
In reply to अरे वा!! by मस्त कलंदर
+१
In reply to अरे वा!! by मस्त कलंदर
अभिनंदन आणि धन्यवाद
In reply to अभिनंदन आणि धन्यवाद by विकास
मी तो केवळ हमाल भारवाही...
In reply to अभिनंदन आणि धन्यवाद by विकास
+१
छानच झाला
मस्त
कार्यक्रम
वृतांत
जबर्या!!
जबरदस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to जबरदस्त by नंदन
कार्यक्रम
In reply to कार्यक्रम by Nile
खुपच सुरेख
अरे वा!
In reply to अरे वा! by प्रियाली
अभिनंदन
In reply to अभिनंदन by चित्रा
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by मिसळभोक्ता
हो...
In reply to हो... by बिपिन कार्यकर्ते
वाटलेच
जबरी!!!
प्राजूचे
In reply to प्राजूचे by नितिन थत्ते
+१
प्राजूचे मनपूर्वक अभिनंदन!
In reply to प्राजूचे मनपूर्वक अभिनंदन! by स्मिता_१३
असेच म्हणतो
अभिनंदन
हाण्ण तिच्या.....
In reply to हाण्ण तिच्या..... by चतुरंग
:-)
In reply to हाण्ण तिच्या..... by चतुरंग
सहमत आहे ....
प्राजु,
अशीही एक रविवार सकाळ....
In reply to अशीही एक रविवार सकाळ.... by प्रभाकर पेठकर
प्राजुचं
In reply to प्राजुचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
नुकतेच
पुरावा
१) नेमका मी
मस्त
In reply to मस्त by विनायक पाचलग
सह्हीच.. पण
In reply to सह्हीच.. पण by llपुण्याचे पेशवेll
ए काय रे
खुपच छान कार्यक्रम झाला आहे असे दिसते.
अभिनंदन
अभिनंदन
सर्वच फोटो
एक नंबर
बिपीनदा
अरे व्वा..
असाच गंध दरवळत राहो ...
In reply to असाच गंध दरवळत राहो ... by वाहीदा
दोन छोट्या
In reply to दोन छोट्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
क्लिप्स
बिकादांचा वृत्तांत व फोटू दोन्ही आवडले.
In reply to बिकादांचा वृत्तांत व फोटू दोन्ही आवडले. by संजय अभ्यंकर
+१
अभिनंदन
अभिनंदन
लै मिस
धन्यवाद बिका आणि अदिती
अभिनंदन!
मस्त रे
मस्त वर्णन
मस्त...वर्णन.
अभिनंदन
क्या बात
या निमित्ताने
वा ! छान
प्राजुतै
झक्कास
अभिनंदन
प्राजुचे
अभिनंदन
सर्वांचे
सुरेख वृत्तांत!
कार्यक्रम उच्च
सुरेख वर्णन
प्राजुताई