"हा, सरे...सरे...हां हां सरे.....", असे म्हणून बालाने फोन खाली ठेवला आणि मागे वळून पाहिले.
मागे त्याचा सहकारी देशपांडे उभा होता. सकाळचे अकरा वाजले होते. ही त्यांची नेहेमीची चहा पिण्याची वेळ. बाला उठला आणि दोघेही कँटीनच्या दिशेने जाऊ लागले.
"घरचा फोन काय?", देशपांडेने चहा पिता पिता विचारले.
"हो. काल फोटो दाखवला होता ना तुला? तिच्याबद्दलच!