Skip to main content

प्रतिभा

पिंक स्लिप

लेखक सुनील यांनी रविवार, 20/01/2008 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
"हा, सरे...सरे...हां हां सरे.....", असे म्हणून बालाने फोन खाली ठेवला आणि मागे वळून पाहिले. मागे त्याचा सहकारी देशपांडे उभा होता. सकाळचे अकरा वाजले होते. ही त्यांची नेहेमीची चहा पिण्याची वेळ. बाला उठला आणि दोघेही कँटीनच्या दिशेने जाऊ लागले. "घरचा फोन काय?", देशपांडेने चहा पिता पिता विचारले. "हो. काल फोटो दाखवला होता ना तुला? तिच्याबद्दलच!

गावची वारी

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 18/01/2008 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
करकचून ब्रेक दाबत एस.टी थांबली. दरवाजा उघडला. एका हाताने गॉगल नीट करीत आणि दुसर्‍या हाताने खांद्यावरील बॅग सावरीत रमकांत उतरला. त्यापाठोपाठ रश्मी आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा अमेय हेही उतरले. सभोवती एक दृष्टीक्षेप टाकून त्याने गावात जाणारा रस्ता पकडला.

सुखाच्या शोधात.... (दु:ख)!!!

लेखक छत्रपति यांनी मंगळवार, 15/01/2008 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
दु:खाच्या घरी एकदा जमली होती पार्टी दारु बीरु पीऊन अगदी झींगली होती कार्टी... दु:ख म्हणाले " दोस्तानों! बिलकुल लाजू नका इतके दिवस छ्ळल म्हणून राग मानू नका! मनात खूप साठल आहे काहीच सुचत नाही माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय आता राहवत नाही...
Taxonomy upgrade extras

जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 10/01/2008 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
WorldPersonalities वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू? मी ओळखलेले: महात्मा गांधी चार्ली चॅपलीन बीथोवन हिटलर सद्दाम हुसैन बिल क्लिंटन ब्रुसली अल्बर्ट आईन्स्टाईन अब्राहम लिंकन यासर अराफात मेरीलीन मॉन्ऱो जॉर्ज बुश आणखी जमल्यास लिहीन पुढे... (चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

शब्द!

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 03/01/2008 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
हास्य.. एक चिरंतन हास्य.. हास्यच आणेल तुजला समीप माझ्या कळू देऊ नकोस जाणे तुझे कारण तेच आणेल पाणी डोळ्यात माझ्या दुनियेने घालविली रया नवे पर्व सुरू करूया आजच्या आज... प्रियतमे... तुजला नेहमी असेच वाटे माझे हरेक शब्द असती खोटे.... खरंतर... शब्द आणि केवळ शब्दच गं... आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी गोड शब्द असोत तुझे चिरंतन कर त्यांना तू मजला अर्पण अन् माझा जीव आहे तुझी साठवण प्रत्येक प्रसंगी असो माझीच आठवण तुजला नेहमी असेच वाटे माझे हरेक शब्द असती खोटे.... खरंतर.... शब्द आणि केवळ शब्दच गं... आहेत माझ्याजवळी... शिरावया तुज हृदयमंदिरी शब्द आणि केवळ शब्दच गं... आहेत माझ्याजवळी...

जुळल्या सुरेल तारा...

लेखक नंदन यांनी सोमवार, 31/12/2007 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातला हा प्रसंग आज अचानक यूट्यूबवर भटकताना सापडला. 'थकले रे नंदलाला' आणि 'बाई मी विकत घेतला श्याम' ही दोन्ही सुरेख गाणी या प्रसंगात आहेत.

तूच नव्याने घडशील काय

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 31/12/2007 07:28 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या वर्षातील नवे तराणे येत्या वर्षी उरतील काय?
गेल्या वर्षी निसटून गेले क्षण नव्याने मिळतील काय?

गेल्या वर्षातील दिवस जे सार्‍यांसाठी झिजलास
स्वत:साठी एक दिवस यावर्षी तरी तू उरशील काय

जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय

तिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोस
तिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील काय

आरशात हे रोज स्वतःला चोरून तू रे पाहतोस
मग गर्दीच्या या डोळ्यांना सांग बरे तू दिसशील काय?

Taxonomy upgrade extras