मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निनावी नगर

जागु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एक नगर असावं निनावी तेथे कुणी न राजा न राणी मानवतेची जात असावी समानतेची साथ असावी रुपया नाणी नसो व्यवहारी असो माणूसकीची देणी घेणी अनाथ आश्रमे तेथे नसावी वृद्धाश्रमेही ओस पडावी कायद्याची वाट नसावी मंदीराला हाक असावी एकात्मतेची असो दिवाळी स्वार्थाची पेटावी होळी प्रेमाची बरसात असावी मायेची पालवी फुटावी पौर्णिमा येथेच खिळावी अमावस्येला जाग न यावी.

वाचने 2369 वाचनखूण प्रतिक्रिया 7

सँडी Tue, 04/07/2009 - 13:05
छान जमलीये! आवडली. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

नरेश_ Tue, 04/07/2009 - 18:03
मनातील भावना सुरेखपणे शब्दबद्ध केल्यात. एखादी गोष्ट आठवायला प्रथम ती विसरावी लागते ;)

सूहास Tue, 04/07/2009 - 18:06
मानवतेची जात असावी समानतेची साथ असावी अवा॑तरः एखाद्या गावात गेल॑ की ह्याची जाणीव होते.. सुहास

प्राजु Tue, 04/07/2009 - 21:02
मृगजळ म्हणतात ते हेच असावं. असो.. कविता खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मराठमोळा Tue, 04/07/2009 - 21:31
रामराज्याची कविता आवडली. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!