मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सारे काही पहिले

जागु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आयुष्यातील काही पहिले क्षण सुखद अनुभवाचे सारे धन बाळाचं पहिल पाऊल मोठेपणाची लागलेली चाहूल आयुष्यातील पहिला पाऊस कागदी होडीची केलेली हौस कडाडलेली पहिली विज आईच्या मिठीला बिलगलेले काळीज पहिला दिवस शाळेचा गंध दरवळणार्‍या कोर्‍या पुस्तकांचा घडलेली पहीली मैत्री घरापलीकडील ती दृढ नाती झालेल पहिल दु:ख रडून रडून मिळालेल सुख प्रेम पहिल जुळलेल मन कुठेतरी हरवलेल प्रेमाचा पहिला स्पर्श भावनांशी भिडलेला संघर्ष सारे काही सुखद पहिले फक्त आठवणीत राहणारे पुन्हा परत न येणारे.

वाचने 1417 वाचनखूण प्रतिक्रिया 1

क्रान्ति 08/04/2009 - 21:08
कडाडलेली पहिली वीज आईच्या मिठीला बिलगलेले काळीज खूप खूप खास! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com