Skip to main content

प्रकटन

तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे तुलनात्मक पद्धतिने आयुष्य जगणे हा एक मानवि मनाचा गुणधर्म आहे.. दुसर्‍याच्या जीवनाशी आपली तुलना करीत ते एक तर सुख मानतात वा दुःखी होतात... काहि मुली आपण मैत्रिणींच्या मनाने जाड आहोत हा विचार करीत अस्वस्थ होतात.. तर सहका~याची गाडी जुन्या मॉडेल ची व माझी लेटेस्ट म्हणून काहि आनंदित होतात.. अशी माणसे आपणास कायम भेटत असतात..व काहि वेळा आपण हि तसेच वागत असतो.. बाह्य गोष्टींची तुलना करताना बरेच वेळा आपल्या आयुष्याची नेमकि किंमत काय? आपण काय मिळवले याचे मुल्य मापन करण्याची क्षमताच आपण हरवुन बसतो...व बाहे्रच्या गोष्टीवर आपला काहिच कंट्रोल नसल्याने एक हतबलतेची भावना येते...

धनेश्वर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
धनेश्वर भीतीवर खिळा ठोकत असतात मुलगा विचारतो -बाबा आमच्या कॉलेजची २ दिवस महाबळेश्वरला ट्रिप जाणार आहे -मित्र मैत्रिणी आहेत मी जाऊ का? धनेश्वर स्टूलावरून खाली उतरतात व खुर्चीवर बसतात व अचानक हातातली हातोडी कपाळावर मारतात त्यांच्या या विचित्र वागण्याने मुलगा घाबरतो व विचारतो अहो बाबा काय झाले असे का केले ? त्यावर बाबा म्हणतात -अरे विशेष काही नाही -जुना प्रसंग आठवला -तुझ्या वयाचा असताना आमची पण सहल महाबळेश्वरला गेली होती -छान थंडगार वातावरण होते -रात्रीची वेळ होती -मला झोप येत नव्हती म्हणून मी व्हरांड्यातल्या खुर्चीवर वाचत बसलो होतो - अन तेव्हढ्यात शेजारच्या रूम मधून मधु साने आली अन म्हणाली खूप थ

तिरडी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यात सारे जमले होते राम मामा -वैशाली मामी त्यांची २ मुले -मधुकाका -वासंती काकू राधा मावशी आमरसाचा तुडुंब जेवण झालं होत राधाक्कां सार आवरा आवर केली मंडळी जमेल तशी मिळेल त्या जागेवर पडून घोरत होती गोदाक्का ने मोकळी जाग शोधली व जमिनीला पाठ टेकवली व घोरु लागली बाहेरून राम मामा आला त्यानं गोदाक्काला घोरताना पाहिलंत तिच्या भोवती डास घोंघावत होते त्याने बाजूला पडलेली नवी कोरे पांढरी चादर तिच्या अंगावर टाकली राधा मावशी बाजारात गेली होती तिने पूजेसाठी फुले हार बुक्का हळद कुंकू आणले होते आप्पा च वय ७७ आजारी असायचे गोद ला अंगावर चादर असलेली व्यक्ती बघता निराळाच संशय आला घरात मृत व्यक्ती असले की अश

पावभाजी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 12/03/2020 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
घरात पावभाजी चा बेत असल्याने जोशीकाकूंच्या लक्षात येतेकी पावाची लादी घेण्यास त्या विसरल्या आहेत लगबगीने त्या समोरच्या जनरल स्टोअर मध्ये गेल्या व पाव लादी व दुधाची पिशवी आदी किरकोळ खरेदी केली दुकानदाराने ते सामान पातळ प्ल्यास्टीक च्या पिशवीत भरले व काकूंना दिले बाजूलाच भाजेवाला असल्याने त्यांनी भाजी खरेदी केली व पिशवीत भरली व सॊसायटी कडे त्या निघाल्या वाटेत वजन जास्त झाल्याने प्ल्यास्टीक ची पिशवी फाटली अन पावाची लादिने जमिनीकडे झेप घेतला पण जोशी काकूने चपळाईने पाव पडू दिला नाही अन सारे सामान छातीशी पकडत घर गाठले - मात्र यावेळी पावभाजीचा बेत असल्याने जोशी काकूंनी न विसरता पिशवी नेली अन सामान आणल

कृतघ्न -4

लेखक बाप्पू यांनी मंगळवार, 10/03/2020 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 आता पुढे.... किसन्याने रामदास चा तो अवतार बघितला आणि त्याची घाबरगुंडी उडाली. जवळच्या विहिरीतून पाणी आणून तो रामदास च्या तोंडावर शिंपडू लागला. रामदास ला थोडीशी शुद्ध आली, पण बोलण्यासाठी कंठ फुटेना. घशातून फक्त पाय पाय असा पुसटसा आवाज येत होता. त्याच्या पायातील त्राण गेले होते.

मेरा कुछ सामान...

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 09/03/2020 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
1 कविता वाचून तू म्हणालास, पण त्या संध्याकाळची तिरपी किरणं राहिली की लिहायची! राहणारच ना रे?? मुठीत घट्ट पकडून ठेवलीत मी ती! 2 तिरपी किरणं राहिली, तुझ्या चित्रामधली तिरपी रेघ राहिली.. अन् ती छोट्टीशी तिरपी काच पण राहिली.. अश्या तिरक्या कल्पना कुणाला सुचतात का? तिरपागडीच तू... 3 जगजीतची गझलसुद्धा राहिली.. कुठली होती रे ती??

मुंगूसाची गोष्ट- भाग २

लेखक मायमराठी यांनी शनिवार, 07/03/2020 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
।। मुंगूसाची गोष्ट २ ।। ज्यांचे मांजे दिसत नाहीत अशा माना डोलावणाऱ्या पतंगांनी भरलेलं निळंशार आकाश पाहिलंय का? आणि मांजे दिसलेच तरी ते धरणाऱ्यांचे हात दिसत नाहीत. कोणीतरी फिरकी धरतं कोणीतरी उडंची ( पतंग हातात धरून लांब जाऊन योग्य वेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन जागच्या जागी उंच उडी मारून हातातला पतंग आभाळात उडवणे) देतो; कोणीतरी कटलेल्या पतंगाला गोळा करायला धावतं. एकंदरीत पतंगाची पूर्ण काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. तर आम्ही एकत्र कुटुंबातले पतंग आसपासच्या सगळया अंगणात आणि आभाळात बागडत बागडत मोठे झालो.

कृतघ्न -3

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 05/03/2020 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 आता पुढे - ‌घरातील वातावरण आता बदलत होत. रामदास ला देखील याची थोडीफार जाणीव झालेली होती, इतके वर्ष घरातील प्रत्येकाच्या सुख दुःखाची काळजी घेणाऱ्या आणि कुटुंबावर आलेले प्रत्येक संकट लिलया पेलणाऱ्या माउलीच्या विरोधात आता घरातील च काही लोकं छुपा मोर्चा उभारत होते. ज्या सुना माउलीने घरात वाजत गाजत आणल्या होत्या त्याच सुनांनी आता माऊलीच्या विरोधात आपल्या नवऱ्याचे कान भरले होते.

करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 04/03/2020 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
करोना विषाणू हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे. COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे. यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो.

चारित्र्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2020 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रियांच्या चारित्र्याला समाज जेव्हढी किंमत देतो त्या कैक पट जादा किंमत पुरुषाच्या चारित्र्याला देत असतो . समाज तुमच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करत असतो लफ़ंग्या -बाई बाटलीचा नाद -खोटे बोलणे हे चारित्र्य असलेल्या पुरुषाला समाजात किंमत नसते -समाज किंमत देत नाही मित्र व जवळचे जरी त्याची रंगेल -दिलदार -रसिक आदी कौतुक करत असले तरी त्याला घरी नेणं टाळतात एम आय डी सी ला एक असा रसिक सर्वगुण संप्पन मित्र होता चांगली कमाई होती मजा चालू असायची एकदा दिवस फिरले -व्यवसायात असे कायम होत असतेच २ लाख रु ची अर्जंट नड उत्पन्न झाली माझ्याकडे आला अन पैशाची मागणी केली मजकडे त्या वेळी इतके खुले पैसे नव्हते मी त