Skip to main content

प्रकटन

दिल हैं छोटासा, छोटीसी आशा..

लेखक आजी यांनी बुधवार, 08/04/2020 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊन चालू आहे. तो कदाचित वाढेल अशा बातम्या येताहेत. किंवा अंशतः हटेल.देशाचा काही भाग सील केला जाईल,काही भाग मोकळा ठेवला जाईल असंही बोललं जातंय. दिवसागणिक रुग्ण वाढताहेत. म्रुतांचा आकडा वाढतोय.बरेचसे भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर झालेत. रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स,नर्सेस इतर स्टाफही कोरोनाला बळी पडतोय.व्ही आय पी लोकांच्या घराच्या आसपासही कोरोना शिरलाय. इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आय सी यूत आहेत. राणी एलिझाबेथ, प्रिन्स चार्लस् क्वारंटाईन झालेत. रोजच्या अशा बातम्या वाचून सुन्न व्हायला होतंय.न्यूजपेपर बंद झालेत. टीव्हीवर फक्त कोरोनाच्याच बातम्या.

वन वर्ल्ड: टुगेदर ॲट होम!

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 07/04/2020 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
करोनाविरोधातील लढ्यात जिवाची बाजी लावणारे आरोग्य सेवक, आणि या आघाडीतील प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आम्ही थाळ्या वाजविल्या, टाळ्या वाजविल्या आणि दिवे-पणत्या लावून त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. असे काही केल्याने करोनाची महामारी नष्ट होणार नाही हे माहीत असूनही देशातील तमाम जनता यामध्ये सहभागी झाली, तर अनेकांनी विरोध व्यक्त करीत पंतप्रधानांची खिल्ली उडविली. या कार्यक्रमांवरून देशातील समाजमाध्यमांच्या जोडीने प्रसारमाध्यमांमध्येही वैचारिक द्वंद्व जुंपले असताना, जागतिक आरोग्य संघटनेने अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

माणुसकीची कसोटी!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 05/04/2020 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
माणुसकीची कसोटी ! रिकी मनॅलो नावाचा एक धर्मगुरू सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला. वातावरण स्वच्छ होते. हवेत चांगलाच गारठा होता. अशा वातावरणात सकाळचा फेरफटका आणखीनच सुखद होतो. रिकी स्वमग्नपणे रस्ता कापत होता... आणि अचानक मागून एक ट्रक रोरावत आला... त्याच्या अगदी शेजारी येताच ट्रकचालकाने ब्रेक दाबला. ट्रकचा वेग संथ झाला... आता रिकीच्या पावलाच्या वेगाने ट्रक त्याच्या बाजूने पुढे सरकत होता. क्षणभर त्याच्या मनाचा थरकाप झाला. त्या गारठ्यातही त्याला घाम फुटला, आणि त्याने वेग वाढविला. पण ट्रकला मागे टाकून पळणे शक्यच नव्हते. ट्रकनेही वेग वाढविला.

अनय

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 03/04/2020 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
अनय "नको जाऊस राधे! माझ्यासाठी नाही म्हणत ग मी... तुझ्यासाठीच सांगतो आहे.... नको जाऊस त्याला निरोप द्यायला." "निरोप द्यायला जाते आहे; हे कोणी सांगितलं तुला अनय? थांबवायला जाते आहे मी." "तुला वाटतं तो तुझं ऐकेल?" "तुला वाटतं नाही ऐकणार न? बघू, कोण बरोबर ठरतं." असं म्हणून राधा धावत घराबाहेर पडली. तिला लवकरात लवकर वेस गाठायची होती. तिचा शाम गोकुळ सोडून निघाला होता. आताच आलेल्या नंदिनीने तिला तसं सांगितलं होतं. खरतर राधेचा यावर विश्वास नव्हता बसला. पण नंदिनी ही राधेची एकुलती एक मैत्रीण होती जी राधेचं मन समजू शकत होती. त्यामुळे ती काहीतरी खोटं सांगेल असं राधेला वाटत नव्हतं.....

वीर चक्र

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 01/04/2020 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
वीर चक्र हि एक कहाणी आहे वीराची त्याच्या स्वतःच्या तोंडून ऐकलेली. १९९१ मध्ये मी एम डी करायला ए एफ एम सी मध्ये गेलो. तेथे आम्हाला असलेले सहयोगी प्राध्यापक(associate professor) कर्नल एन एन राव ( नळगोंडा नरसिम्ह राव) यांच्या खोलीच्या बाहेर पाटी होती COL N N RAO कर्नल एन एन राव Vr C , SM वीरचक्र सेना मेडल (associate professor) सहयोगी प्राध्यापक ते आमच्यासाठी व्याख्याते शिकवणारे प्राध्यापक आणि (थिसीस)प्रबंधासाठी माझ्या मित्राचे मार्गदर्शक (गाईड) होते त्यामुळे त्यांच्या खोलीत रोज जाणे येणे असेच.

रिक्षा आणि सरकार!

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 31/03/2020 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात, पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे लक्ष एखाद्या संकटाचा सामना करण्यावर केंद्रित झालेले असतानाच असे कसे घडले असेही अनेकांना वाटून गेले. त्यावरही कडी म्हणजे, या घटनेत नेमके काय नष्ट झाले असा, जुन्या घटनेत अधोरेखित झालेलाच सवाल पुन्हा एकदा पुढे आला.

शैलेंद्रच्या निमित्ताने...

लेखक मायमराठी यांनी रविवार, 29/03/2020 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते.

जगण्याला आधार हवा!

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 28/03/2020 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक जिल्ह्याच्या वेशीवर तात्पुरत्या निवारा शेडस उभाराव्यात व परिस्थिती धोकादायक नाही याची खात्री होईपर्यंत त्यांना तेथे आश्रय द्यावा. त्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबवावी. असे केल्यास तात्पुरते आयसोलेशन कॅम्प तयार होतील. गावेही सुरक्षित, गावकरीही सुरक्षित आणि स्थलांतरास निघणारे नागरिकही सुरक्षित राहतील. यंत्रणेवर ताण पडेल, पण अपरिहार्य परिस्थितीत तो गृहितच असतो. त्यालाच डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतात!आ

लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी !

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 26/03/2020 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेली ३० वर्ष मी घरुन काम करतोयं त्यामुळे जे लिहीलंय तो सगळा स्वानुभव आहे. लॉक्ड इन ही आयुष्यातली एक अपूर्व संधी आहे. कोणतीही घटना ही कायम वस्तुस्थिती असते, तिच्याकडे जो संधी म्हणून पाहातो त्याचं आयुष्य उजळतं, जो आपत्ती म्हणून बघतो त्याला फक्त वेळ कधी संपते याची वाट बघावी लागते. ' जीवन म्हणजे इतकी वर्ष ' अशी अत्यंत चुकीची धारणा आयुष्यात कोणताही बदल घडू देत नाही, कारण जीवन म्हणजे ' एक दिवस गुणीले काही हजार वेळा ' असा हिशेब आहे. थोडक्यात ज्याला आयुष्यात रंग भरायचेत त्याला आजच्या चोवीस तासांच काँपोझिशन बदलायला लागतं.