Skip to main content

प्रकटन

स्वप्नातलं गाव ... !

लेखक संदीप चित्रे यांनी बुधवार, 16/04/2008 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! समुद्री गाज, पोफळी बाग कलती उन्हं सोनेरी झाक सोनेरी वाळूत हिरवा पडाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! कौलारू घर, दारी झुलाव पाण्यात दूर डोलतेय नाव ताजी म्हावरं पैशाला पाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! लाकडी घर, टेकडीवर गाव उतरतं छत .. काचेचा ताव गुलाबी थंडी धवल वर्षाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! न्हाली दव, ऊबदार सकाळ नेसूनि रंग ये….संध्याकाळ चंदेरी उधळण चांदण्या वाव स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव ! जगती कोण, चुकला धाव? मनी आपलं.. एक जपावं गाव स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ? स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
Taxonomy upgrade extras

नचिकेत्याचे आख्यान

लेखक ठणठणपाळ यांनी मंगळवार, 15/04/2008 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मला माहिती असलेली गोष्ट मी माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला अहे. लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.) नचिकेत्याचे आख्यान नचिकेत्याची गोष्ट कठ नामक उपनिषदात आढळते. नचिकेत्याचे वडील उद्दालक ऋषींनी एकदा विश्वजीत यज्ञाची तयारी केली होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे यज्ञ करणार्‍या ब्राम्हणांना गायी दान कराव्या लागत. उद्दालक ऋषींनी सगळ्या म्हातार्‍या झालेल्या आणि दूध आटलेल्या गायी देण्याचा सपाटा लावला. बापाची ही लबाडी नचिकेत्याच्या लक्षात आली.

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शनिवार, 12/04/2008 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
समजा तुम्हाला गायन वगैरे कलेत रस नसेल, तर एक थोडेसे हटके करीअर आहे त्याबद्दल मी सांगतो...

महात्म्याला आदरांजली.

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 11/04/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
Jyotiba Fule
आज भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि आद्य महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे समाजसुधारक श्री ज्योतीबा फुले यांची जयंती. त्यांना शतशः नमन. महाराष्ट्रात जेव्हा वाईट रूढींचा बोलबाला होता आणि सामाजिक कुरितींनी कळस गाठला होता तेव्हा त्या अंधारातून ज्योतीबांनीच महाराष्ट्राला व त्यायोगे संपूर्ण देशाला नवी दिशा दिली. त्याकाळात त्यांनी सुरू केलेल्या अनेक कार्यांपैकी एकेक कार्य करीत पुढे लोक मोठे बनत गेले.

थोडे असे, थोडे तसे

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 11/04/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला. एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार." खरोखरच चांगला विचार. तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला, एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या.

लोणचं..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 07/04/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
नाही हो... मी कोणत्याही लोणच्याची रेसिपी इथे देणार नाहिये. तेव्हा लोणचं प्रेमींनी इतके आनंदी होण्याचं काहिही कारण नाही. खरंतर, लोणचं हा विषयच असा आंबट, तिखट आणि चमचमीत आहे ना की नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लोणच्याबद्दल काही लिहिण्यासारखं असं विशेष नाही. पण तरीही लोणचं मला नेहमीच लोणच्यात म्हणजे कोड्यात टाकत आलं आहे. कारण,जर किती प्रकारची लोणची असतात असं विचारलं.. तर आंब्याचं, लिंबाचं, मिरचीचं, मिक्स भाज्यांचं.... अशा अनेक प्रकारची लोणची असतात. पण लोणच्याचे प्रकार किती असं विचारलं तर... ते ही अनेक आहेत. म्हणजे, महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, पंजाबी, राजस्थानी, काश्मिरी.. आंध्राकडचे..

इप्रसारण.कॉम येथे कादंबरी वाचन- प्राजक्ता पटवर्धन

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 02/04/2008 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल पासून दर गुरुवारी अर्धा तास इप्रसारण. कॉम येथे प्राजक्ता पटवर्धन 'आवली' या तुकारामांची पत्नी आवली हिच्यावर लिहिलेल्या कादंबरीचे वाचन करणार आहेत. याविषयी अधिक माहिती http://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल. (तुकयाची आवली- लेखक- सौ मंजुश्री गोखले मेहता प्रकाशन, पुणे ) त्या कार्यक्रमावर, त्या कादंबरीवर आणि आवलीविषयी मिसळपावकरांना असणार्‍या माहितीची देवाण घेवाण करता येथे यावी म्हणून ही चर्चा सुरु केली आहे. प्राजुला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा.

अनोखे वंशवृक्ष

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 02/04/2008 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्‍यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा. मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.