Skip to main content

प्रकटन

आधुनिक कृष्ण

लेखक काळा_पहाड यांनी गुरुवार, 08/05/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माचे भोग भोगांसाठी जन्म आईच्या दुधातुन भोगांकडे स्त्रवणे मातेची ममता अन् बापाचा धाक पाळणाघरातल्या कृष्णाला यशोदेची हाक दिवसा यशोदा अन् रात्री देवकी वसुदेव की नंद सगळाच आनंद रंगतो रोजच कृष्ण-देवकी भेटीचा प्रयोग सुटीच्या दिवशी यशोदेला वियोग ना झोपेला अंगाई ना भुकेला लोणी जन्मला कृष्ण गातो नर्सरीची गाणी वाघीणीच्या दुधावर गोमुत्राची शिंपवणी कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी जग एक बाजार बाजारात कृष्ण 'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न यशोदेला सोडुन कृष्ण मथुरेला येई देवकीला विसरुन कंसाचा होई कंस आणि कृष
Taxonomy upgrade extras

व्योमक्षेमं वहाम्यहम्

लेखक हेरंब यांनी गुरुवार, 08/05/2008 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे. आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री!

भारतीय संस्कृती आणि अमेरिकन पोरी.......

लेखक काळा_पहाड यांनी बुधवार, 07/05/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आयपीएलच्या टी२० ने म्हणे प्रोत्साहनपर नाचायला अमेरिकेतुन पोरी मागवल्या. आल्या तेव्हा काय अवस्था होती बिच्चाय्रा पोरींची!! करायला काम नाही. खायला अन्न नाही. ल्यायला कपडे नाहीत. अरारा. लई वंगाळ वाटलं बघा जीवाला. गेले दोन चार दिवसात मातुर परिस्थितीत बराच पडलाय म्हणायचा ! पोरी कशा आंगभर कपडे नेसुन नाचू लागल्यात. बरं वाटलं. तरी म्हटलं माझा भारत देश एवढा कद्रू कधीपून झाला जो पाहुण्या पोरीबाळींना चोळी लुगडंबी देईना झाला. भारतीय संस्कृतीचा जयजयकार असो.......... तोमीनव्हेच

पुरोगामी!(एक छोटिशी गोष्ट)

लेखक मन यांनी बुधवार, 07/05/2008 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
"आई-बाबा फारच मागं लागले आहेत.रोज रोज मागे लागुन नवीन नवीन स्थळं दाखवतात. साला लग्न मला करायचय्,पण घाइ ह्यांनाच आहे. मी ही ह्यांच्या दबावाला बळी पडलो तर नावाचा सुधीर साठे नाही . आपण आपल्या मर्जीनच पोरगी पाहणार. साला रोज रोज तिथुन इतक्या लांबुन भारतातुन फोन करतात आणि विषय काय्,तर "काय ठरवलस्?कधी पहायची?" छ्या. ह्यांचा फोन असा खाली ठेवला नाही ,तोच लक्ष लॅपटॉपच्या (चल संगणक्=लॅपटॉप?) स्क्रीन कडे(स्क्रीन=पडदा?) गेलं.

समर्पित हो

लेखक काळा_पहाड यांनी सोमवार, 05/05/2008 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
यशाच्या वाटेकडे डोळे लावुन बसू नकोस आजच्या कुवतीचा अभिमानी होऊ नकोस. स्वप्रतापे स्वबळे तू अवघेचि जिंकुन घे जिंकण्यासाठी जिंकण्याची अभिलाषाही जिंकुन घे. प्रकांड हो प्रबुद्ध हो चंड हो प्रचंड हो प्रकर्षाने प्रारब्धावर तुच तू प्रसन्न हो. प्रकाशाचा पुंज हो तेजाची मुर्त हो भोवतीच्या तमसावर ज्योतिर्मयी शर हो. स्वतंत्र हो समृद्ध हो समर्थ हो सनाथ हो अंगीकृत कार्याला सर्वस्वी समर्पित हो.
(सदासर्वदा) तो मी नव्हेच
Taxonomy upgrade extras

जहाल नेत्याचे अंतरंग

लेखक हेरंब यांनी रविवार, 04/05/2008 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
जहाल नेते भाषणे करुन लोकांची माथी भडकवत असतात. पण त्यांच्या मनांत वेगळेच असते. बाकी कवितेतच वाचा. समतेचा टिळा लावून सर्वांशी खेळा स्वतःला मात्र वगळा ॥ आश्वासने मोहात मिसळा स्वप्नांचा फुलवा मळा प्रत्यक्ष मदत मात्र टाळा नुसताच वाजवा खुळखुळा ॥ शिव्यांनी जाळा टीकेने डागाळा स्वतःला मात्र संभाळा ॥ जातपात उगाळा काढा बाहेर कोथळा भावनांशी खेळा वाहू द्या जखम भळभळा ॥ पण काढला जर कोणी गळा तर म्हणावे बाळा ऽ ऽ तुझ्यासाठीच सोसतोय या कळा ॥
Taxonomy upgrade extras

समर्पण..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 02/05/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिया तुझ्या प्रितीमध्ये हृदय माझे गुंफले, रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी आज तिचे देहभान, सागरातच गुंतले.. रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली, त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... - प्राजु