Skip to main content

आयुष्य

लेखक जयवी यांनी मंगळवार, 01/04/2008 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य म्हणजे काय असतं देवाने जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं....? खरं तर.... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं माणूसपण जोपासायचं असतं दुसर्‍यांना हसवत स्वतःही फुलायचं असतं पहाटेच्या दवबिंदूत नहायचं असतं प्राजक्ताच्या मोत्यांना टिपायचं असतं रातराणीच्या झुळुकांनी मोहरायचं असतं चंद्राच्या साक्षीनं बहरायचं असतं निसर्गाच्या श्रीमंतीत वावरायचं असतं स्वतःचं राजेपण स्वतःच घडवायचं असतं मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं. जयश्री अंबासकर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7849
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया