Skip to main content

प्रकटन

तू, फक्त हो म्हण

लेखक भारती यांनी शुक्रवार, 06/06/2008 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
तू, फक्त एकदाच हो म्हण आयुष्याचे तुझ्यासाठीच असतील सारे क्षण डोळ्यात उमटेल तुझ्या माझेच प्रतिबि॑ब प्रतिक्षण पण तू, फक्त एकदाच हो म्हण
Taxonomy upgrade extras

बीबी का मकबरा

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 06/06/2008 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आम्हाला आमच्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराचं फार कौतुक. प्रत्येकाला प्रत्येकाच्या शहरात अभिमान वाटावा अशा काही कलाकृती सतत आनंद देत असतात. ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा त्या पैकी एक.

बीवी का मकबरा

बालपण सदैव नटवायचं असतं

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 06/06/2008 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
उदय सप्रेंची शाळा ही कविता वाचली आणि तीनेक वर्षांपूर्वी जेव्हा छंदात कविता न लिहिण्याचा छंद होता तेव्हा लिहिलेली ही कविता सहजच आठवली.

(रोज वाढते महागाई -)

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 05/06/2008 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या महगाईला उद्देशुन- चाल - संथ वाहते कृष्णामाई ------------------------------------------------------ रोज वाढते महागाई.! जनतेवरच्या अन्यायाची जाणीव तिजला नाही! रोज वाढते महागाई.!! महा_गाई ही शासन निती, गतीगतीने सदा वाढती! फायदातोटा गणिती कल्पना,नाही तिज ठायी !१! रोज वाढते महागाई.!! कुणी रुपया म्हणती खोटा, चलनवाढीचा फुटता फुगा ! बाजाराची उतरुन धुंदी, हाती काही नाही !२! रोज वाढते महागाई.!! सतत वाढते सोने चांदी, गृह्कर्जही मागे नसती ! माणसांची ही व्हावी दैना , पगार कुचकामी? !३! रोज वाढते महागाई.!! आपला (कृष्णा काठचा) केळकर
Taxonomy upgrade extras

सुरस आणि चमत्कारिक

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 03/06/2008 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रीष्माच्या उग्र सहस्त्ररश्मींनी रुक्ष झालेल्या हिरण्यगर्भा मेदिनीला पर्जन्यधारांच्या सुखद आगमनाची चाहूल लागली होती. नैऋत्येकडून वाहणार्‍या शीतलक वातलहरी अधिकाधिक प्रबल होऊ लागल्या होत्या. राजमहालाच्या प्रवेशद्वारांवर आणि गवाक्षांवर असलेली कलाबतूपूर्ण रेशीमवस्त्रे वारंवार विचलित होत होती आणि महालातील सुवर्णदीपांमधील दीपशिखा पवनलुप्त होतात की काय असेच वाटत होते. निशापती महाराजांनी आपल्या हातातील द्राक्षफलांच्या गुच्छातील अखेरचे पुष्ट रसाळ फळ आपल्या ओष्ठांनीच अलग केले. त्यांच्या दंतपंक्तींची आणि कंठमण्याची सूक्ष्म हालचाल झाली.

हा भास म्हणु की ...

लेखक आनंदयात्री यांनी सोमवार, 02/06/2008 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, टु हिंजवडी ऑर टु कोथरुड फस्ट ?" असे ड्रायव्हरने विचारताच मांडीवरचा ल्यापटॉप बाजुला ठेउन त्याने समोर नजर टाकली, जवळ जवळ येणारा वाकडचा फ्लायओव्हर ओळखीचा वाटला पण आजुबाजुचा भाग मात्र आधी होता तसा मोकळा मोकळा अजिबात राहिला नव्हता. चकचकीत इमारती अन सुसाट जाणार्‍या गाड्या त्या फ्लायओव्हरची ओळख पुसट करत होत्या. विसएक वर्षात पुणे बरेच बदलले होते. "लेट्स हॅव ब्रेकफास्ट इन कोथरुड फस्ट !", तो कोरडेपणे उत्तरला.

आसपास

लेखक सन्जोप राव यांनी गुरुवार, 29/05/2008 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गंजकुर्‍हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले जरा चांदोबा, पुल जरासे, ऐसी सजली स्वप्ने भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गुलाल फेका, भले बहाद्दर, जिंकलास तू गड्या जुळले अपुले सूर, पिपाण्या ताशे अन चौघड्या दुज्या सुरांचे, हाणा त्याला, को
Taxonomy upgrade extras

गावित मास्तर

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 24/05/2008 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
"आपलं हस्तलिखित आता चांगलं तयार होत आलंय! तू बरेच श्रम घेतलेले दिसताहेत" आमचे मराठीचे देशमुख सर मला म्हणत होते... "होय सर! कथा, लेख, कविता सगळं जमलंय. आता मुखपृष्ठ ठरलं की झालं" "आणि तुझं संपादकीय?" "ते सुद्धा पुरं होत आलंय" "बरं, मुखपृष्ठाचं काय करणार?" "गावित मास्तरांनी काढलेलं एखादं चित्र टाकावं म्हणतोय" मी "तुला वाटतं तो चित्र काढून देईल?" "विचारायला तर काय हरकत आहे" "असं म्हणतोस? ठीक आहे, बघ विचारून! पण सांभाळून हो, दुर्वास आहे तो साक्षात!!" मला हसू आलं. देशमुख सरांनीही स्मित केलं आणि मला प्रेमळपणे म्हणाले, "तुला अगदीच मारायला उठला तर माझं नांव सांग!